अमेरिकेत बर्याच ग्रोसरी स्टोर्मधे बदामाचे पीठ मिळते. ते मी एकदा उत्साहाने आणले आणि आता त्याचे काय करू म्हणुन ते फ्रीझर्मधे २ महिने तसेच राहीले. मातोश्रींच्या सल्ल्याने ते कणिक भिजवताना थोडे घालून वापरले तर त्या चपात्या मला फार आवडू लागल्या छान खुसखुशीत होतात.
मी नेहेमी घरात बदाम्/पिस्ते/काजूची पावडर करून कतली करायचे पण ती बरेचदा रवाळ लागायची. मग एकदा धाडस करून ह्या पिठाची करून पाहिली आणि चक्क नीट जमली. आज परत केली तर ती पण नीट झाली. म्हणुन प्रमाण वगैरेसाठी लिहुन ठेवतेय तर मैत्रिनवर का नको? मग इथेच लिहिते!