लाल भोपळ्याचा हलवा लाल भोपळ्याचा हलवा साहित्य: अर्धा की भोपळा, 200 ग्रॅम खवा, पाऊण वाटी साखर, वेलची पावडर अर्धा चमचा, केशर काड्या, बदाम काप, बेदाणे, तूप तीन चमचे. कृती: भोपळा किसून घ्या. कढईत तूप तापत ठेवा. त्यात भोपळ्याचा कीस परता. पाच मिनिटं परतून झाल्यावर साखर मिक्स करा. खवा घाला. वेलची पावडर, बेदाणे घाला. दहा मिनिटं मंद गॅसवर परतत रहा. तूप सुटू लागलं की गॅस बंद करा. बदाम कापांनी सजवा. भोपळ्याचा हलवा उपासाला चालतो.पाककृती प्रकार: आजचा प्रसाद: Read more about लाल भोपळ्याचा हलवाLog in or register to post comments