कारली स्वच्छ धुवून कोरडी करून घेऊन पातळ चकत्या कापायच्या. त्याला मीठ चोळून लगेच (पाणी सुटलं की तेलात तडतडतात) तेलात सोनेरी लालसर रंगावर कुरकुरीत तळायच्या किंवा चिकाटी असेल तर शॅलो फ्राय करून कुरकुरीत करून घ्यायच्या. चिरताना मी एकीकडे खूप टण्ण्या बिया असतील त्या काढून टाकते. बाकी कडूपणा अजिबात कमी करायला जायचं नाही. तेलातही थोडी मध्यम आच ठेवायची.
याचं आणखी एक वेरिएशन म्हणजे चकत्या आणखी अर्ध्या चिरून घ्यायच्या, आणि बटाटे पण सळ्या चिरून घ्यायचे. दोन्हीची किंचित जास्त तेल घालून भाजी परतून घ्यायची. हळद मीठ घालून. यात मात्र कारली कुरकुरीत होत नाहीत.