साहित्य-
संत्र्याचा रस 1 वाटी
बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी २ वाट्या
दोन वाट्या साखर
सगळं एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवा. जरा पातळ मधासारखी कन्सीस्टन्सी आली की गॅस बंद करा. गार होईपर्यंत जाम अजून आळेल.
माझ्याकडची संत्री आणि स्ट्रॉबेरी दोन्ही वाईट आंबट होते. त्यामुळे एवढी साखर घालूनही आंबटगोड चवच आली आहे, पूर्ण गोड नाही झालाय जाम. अर्थात ही आंबटगोड चव फार छान लागतेय.
संत्र फार आंबट नसलं तर थोडं लिंबू पिळा.