काल सीमेवर काल सीमेवर संपला श्वास होता किती निर्धास्त माझा देश होता किती सहज म्हणतो आम्ही बंड करा रे दावणीवर जुंपलेला त्यांचा जीव होता एकत्र बिकत्र जमून अचानक सुजाण झालो निमित्त त्याचेही वेडा हुतात्मा होता परजल्या आम्ही चवचाल लेखण्या पण खरी कृती करणारा जवान योद्धा होता पुन्हा रमून जाईन गुलछबु आयुष्यात माझ्या कळणारही नाही शेजारी कसाब होता अंजली मायदेव 19/2/2019 Keywords: काल Read more about काल सीमेवरLog in or register to post comments