(आजी मोड ऑन)
तहान लाडू
तर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत ! मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड! पांढर्या मातीचा फुफाटाच फुफाटा ! पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं. लिंबाखालची आंथरुणं गोळा करा रे,दातं घासा रे, दूध प्या रे आणि मग गंगेला आंघोळीला हकलायला जावं तर पोरं माझ्यापुढं १०० पावलं उड्या मारत !