बालकथा - सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग "हुर्रे!! उद्यापासुन शाळेला सुट्टी!!!" शाळेच्या बसमधुन उतरताच सायु अाणि मित्रमंडळी नाचायलाच लागली. "ए, उद्या सकाळपासुनच बागेत खेळूयात," चिनू म्हणाली. "तू उद्यापासुन खेळणार? अाम्हीतर बाबा अात्तापासुनच खेळणार, " तिला चिडवत अादी म्हणाला. "अाधी घरी जाऊन बॅग तर ठेवूयात," निहाने सांगितले. तशी नाईलाजाने सगळे अापापल्या घरी निघाले. इतक्यात सायूला अाठवलं, "ए अाज संध्याकाळपासुन स्केटींगचा क्लास चालू होणार अाहे ना? मला करायचंय स्केटींग. तुम्ही येणार अाहात ना?" Keywords: बालकथासायुच्या गोष्टीलेख: कथा Read more about बालकथा - सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींगLog in or register to post comments