ऑगस्ट २०१५ - पाऊस

रिमझिम रिमझिम...

मी इतक्या उत्साहाने पावसाचे फोटो टाकायला आले आहे हे पाहून मलाच हसू येतंय! Heehee कारण मी राहते दुष्काळी भागात. दक्षिण कॅलिफॉर्नियामध्ये. आमच्याकडे मोजून आठवडाभर पाऊस पडत असेल.. वर्षभरात. :thinking: तोही वरील शीर्षकाप्रमाणे रिमझिमच. कधीच मुसळधार नाही. ह्याच वर्षी जरा जुलै मध्ये देखील पाऊस होण्याचे चमत्कार झाले आहेत. अर्थात अजुन साऊथ साईडला. माझ्या एरियात, वेस्ट हॉलिवुडमध्ये नाहीच.

तर म्हणूनच की काय, माझ्याकडे इथल्या पावसाचे बरेच फोटो आहेत. कारण कौतुक ना. आकाशातून पाणी पडले खाली की मी फोटो काढायला तयार! अजुन पुष्कळ सापडतील. पण सध्या हे सापडले तेव्हढे अपलोड करते. :)

सृजनाच्या वाटा: 

बदनाम पावसाळा

IMG_20150609_172430_0.jpg

IMG_20150609_172342_0.jpg

IMG_20150611_145933.jpg

किती योजने धावतो, वाहतो
उरातले जडशीळ , साहतो

कुठे ना कोणी मजसी अडवतो
न झाड, न वल्लरी; शोधितो फिरतो

कडाका उन्हाचा, चढे उष्ण पारा
न सावली उरी , ना वाही गार वारा

पाहतो कधीचा, कोरडाच माळरान

सृजनाच्या वाटा: 

ऑगस्ट २०१५- पाऊस

पाऊस आला पाऊस आला
आई सोड ना गं बाहेर मला
पक्ष्यांचा किलबिलाटही झाला
बोलवती ते मला

रिमझिम रिमझिम
पडती थेंब टपोरे
छतावरी त्यांची थाप रे
मला घालती जणू साद रे

हिरवागार हा सभोवार निसर्ग
होईना मुळी पाण्याचा विसर्ग
एक ते कुंपणाशी तळे साचले
माझे जहाज पाण्यावाचून तळमळे

सर्दी पडश्याची का करते तू काळजी
चिमणी घेते का कधी अडुळसा अन तुळशी
भिजेन मी पावसात जराशी
वाहून जातील पुटे फुकाची

पाऊस आला पाऊस आला
आई सोड ना गं बाहेर मला

सृजनाच्या वाटा: 

पाने

Subscribe to ऑगस्ट २०१५ - पाऊस
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle