बा ची हाळी ऐकता बरोबर जवळ जवळ झाडावरून खालीच पडला हनुमंता. अंगणातलं पेरूचं झाड म्हणजे त्याच्या साठी एक घरंच घरच होतं- जिथं तो त्याच्या बा आणि त्याच्या बाच्या कटकटीपासून सुरक्षित राहू शकत होता.
हणम्यातला 'म' म्हणेपर्यंत जर बाच्या समोर उभं राहिलं नाही की दिसेल त्या काठीने बा त्याला सोलून काढायचा.
'चिंचा पाडून ठेवल्यात. पोती रचून ठेवलीत. लाकडाच्या ढलप्या फोडून सरपण गोळा करून ठेवलं. आता काय काम राहिलं बरं?', असा विचार करतंच करतच हणम्या बाच्या समोर धडपडला.