aakash darshan

neowise comet धूमकेतु

हाय मुलींनो, आम्ही खूप वेळा आकाश दर्शनाला जातो.
काल आणि आज अमावस्या त्यामूळे सध्या रोज दिसणार्‍या.. आणि नशिबाने माझ्या घरातुन पण रोज दिसणार्‍या धुमकेतुला सिटीलाईट पासून लांब जाऊन बघायचं ठरवल होत. त्यातले काही फोटो शेअर करते. आकाशगंगेचा पण एक शेअर करते.
काल हे बघताना बाकी शनी, गुरु, मंगळ सारखे ग्रह आणि अगस्ती, ध्रुव वैगरे तारे, बरीच नक्षत्र, आणि इंटर नॅशनल स्पेस स्टेशन हे नेहमी आकाशात दिसणारे हिरो बघितलेच.
पण खूप दिवसांनी अन्ड्रोमिडा ( आपल्या सगळ्यात जवळची दुसरी गॅलेक्सी जिला मराठी मध्ये देवयानी नाव आहे) तीआणि आकाश गंगा दिसली.
पहाटे तिनला घरी आलो तरी मंतरलेल वाटत होत मला :)

Keywords: 

Subscribe to aakash darshan
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle