Leafy Vegetables

रेड स्विस चार्डाची भाजी

रेड स्विस चार्डची जुडी/जुड्या- गरजेप्रमाणे, फोडणीचं साहित्य- तेल, हिंग, हळद, मोहरी. हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ.

रेड स्विस चार्ड गरजेप्रमाणे आणून पानं, देठं स्वच्छ धुवून दोन्ही बारीक चिरावीत. पसरट आणि मोठ्या पॅनमध्ये तेल घालून हिंग, हळद, मोहरीची फोडणी करुन त्यात हिरव्या मिरच्या आणि लसणीच्या चकत्या किंवा ठेचलेला लसूण परतावा. त्यावर चिरलेला चार्ड आणि देठ घालून परतून झाकण घालून वाफ काढावी. गच्च शिजवायची गरज नाही तसंच चार्ड पटकन शिजतो. मीठ घातलं की झाली भाजी तयार.
इतर पालेभाज्यांसारखीच ही पण भाजी शिजल्यावर चोरटी होते.

पाककृती प्रकार: 

Subscribe to Leafy Vegetables
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle