एक अत्यंत अभिनव प्रकार. एकदम सोपा, स्वयंपाकघरात सहज सापडणार्या वस्तूंपासून बनवलेला आणि तरीही सर्वस्वी अनोखा. पाहुणे मंडळींना त्यांच्यादेखत डेझर्ट बनवून देऊन खुश करा.
साहित्य : आलं, दूध, साखर
प्रमाण : असं काही खास नाही. अंदाजे.
कृती : आलं किसून एका बारीक गाळणीत घालून पिळून घ्या. हा आल्याचा रस बाजूला ठेवा. आता दुध उकळवा. ते गार करत ठेवा. साधारण उकळत्या दुधाच्या पाऊणपट तपमान झाले की त्यात आवडीप्रमाणे साखर घालून विरघळवा.
आल्याचा रस छोट्या छोट्या काचेच्या अथवा चिनीमातीच्या वाट्या/बोल्स मध्ये घालून त्या वाट्या जरा गोल फिरवा म्हणजे आतून सगळीकडे रस लागेल.