लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
३ किलो मोठ्या कैर्या.[लाडु कैरी ,हापुस कैरी चालेल्.शक्यतो आतुन कडक व पांढरी पाहुन घ्यावी.]
ही अशी मोठी लाडु कैरी .एकुण ७ कैर्या होत्या.
मी सरसकट ३ किलो कैर्या आणुन त्याचा फु.प्रो. वर एकसाथ किस केला व या किसाचा छुंदा व मोरांबा दोन्ही केले त्यामुळे एकाच ठिकाणी या दोन्हीची कृति लिहीत आहे.दोन्हीचे साहित्य वेगवेगळे दिले आहे.
३ किलो कैरीचा साले काढुन केलेला एकुण किस ७ वाट्या झाला आहे..
कैरी सालासकट बारीक चिरायची, कांदाही बारिक चिरायचा. शक्यतो पांढरा कांदा असेल तर बेस्ट. मग दोन्ही एकत्र करुन त्यात मिठ, तिखट (सढळ हाताने), कच्च तेल, जरा साखर टाकून हाताने कालवायचं. हवा असल्यास त्यात केप्रचा तयार लोणचं मसालाही घालायचा. तो घातला तर तिखट कमी टाकायचं. फोडणी द्यायची नाही. हे एकत्र मिश्रण दोन दिवस बाहेर आणि फ्रिजमधे जास्त टिकतं. अफाट यम्मी लागतं. पोळीच्या रोलमधे घालून तर बेस्ट. मी नाचणी किंवा ज्वारीच्या भाकरीवर चांगलं डावभर टाकते आणि संपवते.
साहित्यः ४ लोणच्याच्या राजापुरी कैर्या, २ चमचे मोहोरीची डाळ, कैरीच्या तासाच्या निम्मा गूळ किंवा आवडीप्रमाणे, २ चमचे तेल(फोडणीसाठी), पाव चमचा मेथ्या पावडर, पाव चमचा हळद, पाव च. हिंग
कृती: कैरीचा तास म्हणजे काय ते प्रथम पाहू. लोणच्याच्या राजापुरी कैर्या जर ४ असतील तर या कैर्या नेहेमीच्या लोणच्यासाठी कापून घ्या. या राजापुरी कैर्यांना गर खूप असतो. त्यामुळे फोडी करताना अगदी कोयीजवळून खरडून न घेता फोडी करा. या फोडींचे नेहेमीच्या पद्धतीने लोणचं करा.