कृष्ण मेघ सावळा

मेघकिनारा..

काळोखाच्या गहिऱ्या गर्भि.. पहाट-अंकुर हळूच रुजावे
रम्य ऋतूंचे रम्य सोहळे.. क्षितिजावरती उजळून यावे

उन्मन मंगल शाश्वत सुंदर.. तेजोमय अन अथांग अंबर
अंतरातल्या गाभाऱ्यातून.. चैतन्याचे मधुर नाद-स्वर..

सारून सारे तिमिर दूर मग.. नव विश्वाचा सूर्य दिसावा...
तेजोमय दश-दिशदिशातून.. सखा श्रीहरी व्यापून यावा..

मोरपंखी परिससस्पर्श..मेघसावळ्या मनास व्हावा
कृष्णमयी स्वर्णीम स्पर्शाने ..मेघकिनारा उजळून यावा..

-कल्याणी

Keywords: 

Subscribe to कृष्ण मेघ सावळा
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle