गोंगुरा म्हणजे आंबाडी. भारतात असताना लहनपणी, भाकरीबरोबर बर्याच वेळा आंबाडीची भरपूर लसूण घालून केलेली चटणी खाल्लेली, किंवा भाताबरोबर, तांदळाच्या कण्या घालून केलेली पळीवाढ भाजी पण खाल्लेली, पण ईथे आल्यावर काही वर्षापूर्वी पहिल्यांदा पॅरेडाईस बिर्याणी रेस्टॉरन्ट मध्ये आंध्र स्टाईल गोंगुरा चिकन खाल्लं आणि लव अॅट फस्ट बाईट झालं. पण घरी कधी करून बघितलं नव्हतं. अशात कधीतरी युट्युब वर इकडून तिकडे उड्या मारताना, फीड मध्ये दिसलं आणि मग १०-१५ वेगवेगळे विडियोज बघून, थोडं improvise केलं आणि अफाट झालं. म्हणून इथे लिहून ठेवतिये. प्रमाण वैगरे अनदाजानेच.