September 2022

घटस्थापना माझ्या मनातली

घटस्थापना माझ्या मनातली:
मैत्रिणींनो नवरात्रोत्सव सुरू होतोय, घरोघरी घटस्थापना होईल. अनेक मैत्रिणी आटापिटा करून कुलाचार जपण्याचा प्रयत्न करतील. हे करताना एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो तुम्ही आनंदी तर घर आनंदी त्यामुळे तेवढंच करा जेवढं तुम्हाला मनापासून करावंसं वाटतंय, शारीरिक दृष्ट्या झेपतय!

Keywords: 

तृणखोल चा धडा क्रमांक २

अजून अडीच तासांचा रस्ता आहे असा साधारण अंदाज तिथल्या बोलण्यावरून आला होता. वाटाड्या काहीच सांगत नव्हता. पटपट पाऊलं उचला, घोडे घ्या म्हणत होतो ते ऐकलं नाहीत वगैरे बडबड करत होता. एकतर त्याचा accent त्यातून वाटाड्या म्हणून करायच्या गोष्टींचा काहीच अंदाज नसणे, जवळ पाणी टॉर्च वगैरे साध्या गोष्टी पण न ठेवणे, ज्याला गरज असेल ( माझ्या मैत्रिणीला शुगर आहे बरीच तिला थोडा आधार लागत होता अधून मधून. ) त्याला सोडून दुसऱ्याच लोकांशी गप्पा, सगळ्यात पुढे चालत राहणे आणि मागे वळून न बघता झपाझप आमच्या बरंच पुढं जाऊन थांबणे वगैरे चालू होते.

Keywords: 

तृणखोलचा धडा क्रमांक ३ - गंगबल च्या वाटेवर..

रात्रभर प्रचंड अस्वस्थ झोप. भास आणि जागेपणा यांच्या सीमेवर कुठं तरी. त्यातून ams ( acute mountain sickness) साठीची गोळी घेत असल्यामुळे पोटाची वाट लागली होती. अस्वलं येतात हे रात्री माहिती नसल्यामुळे आणि टॉयलेट टेन्ट सेटअप केला नसल्यामुळे "पलीकडच्या झाडीत" रात्री दोन तीन वेळा तरी जावं लागलं डोक्याला टॉर्च बांधून. त्यातून शूज चिक्क भिजलेले. Socks तर फेकून द्यावे इतके खराबझाले होते. waterproof shoe covers नेलं होतं. तेच socks वर चढवून जायचं बाहेर. ही सगळी कसरत इतकी वैतागवणी होती. पण टेन्ट खराब होऊ नये आणि बाहेर आपली कुल्फी होऊ नये यासाठी हेच ऑप्शन होते.

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle