साहित्यः
ग्रिल्ड चिकन साठी: चिकन ब्रेस्ट पीसेस दोन किंवा तीन. मॅरिनेड साठी अर्धी वाटी तेल, मीठ, ताजी मिरेपूड मिक्सड अर्ब्स किंवा किमान रोझमेरी व थाइम. पाप्रिका/चिली फ्लेक्स, लसूण पाकळ्या सोललेल्या तीन
पास्ता: फेटुचिनी किंवा फुसीली, शेल, मॅकरोनी ह्यापैकी एक. अर्धे पाकीट डिरेक्षन नुसार शिजवून घ्यावे व झाकून ठेवावे. गरम पाण्यात एक चमचा तेल व अर्धा चमचा मीठ घालावे म्हणजे पास्त्याला चांगली चव राहते.
अल्फ्रेडो सॉस साठी: मीठ मिरेपूड चवीनुसार, एक बारीक चिरलेला कांदा, सोललेल्या दोन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा मैदा, एक मोठी वाटी दूध. किंवा हाफ नि हाफ किंवा फुल क्रीम, बटर एक तुकडा, स्टिक असल्यास १/३ स्टिक. चीज आव्डीचे माझ्याकडे अमूल चीजच होते पण चेडर किंवा मॅक आणि चीज मध्ये जे सूटेबल चीज घालत असाल ते एक मोठा चमचा किसून. पार्मेजानो चालेल पण मोझरेला नको. सॉस मध्ये नीट मिसळले पाहिजे.
कृती:
सर्वप्रथम चिकन ब्रेस्ट जरा लाटण्याने दाबून फ्लॅट करून घ्यावे. मग एका एअर टाइट डब्यामध्ये
मॅरिनेड चे तेल, फ्रेश अर्ब्स, मीठ मिरेपूड आणि लसूण ठेचून व चिली फ्लेक्स घालून मिस्ळून घ्यावे आ वडत असल्यास एक छोटा चमचा लिंबूरस घालावा. ह्यात चिकन ब्रेस्ट्स घालून नीट कव्हर करावे व डब्याचे झाकण लावून अर्धा तास ठेवावे. हे रविवारी फ्रिज मध्ये सुद्धा ठेवून देता येते. वर्क्डेज ला रात्री गडबडीत डिनर करताना उपयोगी येइल.
मी फूड हॉल मध्ये माउंटन सॉल्ट व पिंक पेपर असे मिक्स आणले होते बारका डब्बा त्यातले खलून घेउन वापरले. वेगळी छान चव येते.
आता पास्ता शिजवून घ्या. व चाळणीत काढून घेउन वरून झाकण ठेवावे.
आता ग्रिल पॅन गॅस / इंडक्षन कुक टॉप वर ठेवा. डब्यातले चिकन त्या ग्रिल पॅन वर उपडे करा.
मध्यम आचेवर चिकन दोन्ही साइडने चांगले ग्रिल करून घ्या. पाच ते सात मिनिटे लागतात. सोडून दुसरे काम करू नका नाहीतर चिकन काळपट होईल. गोल्डन ब्राउन ग्रिल रेषा चिकन वर उमटायला हव्यात व बाकीचे मॅरिने ड पण जळू नये. खरपूस भाजून घ्यावे. मध्ये सुरी खुपसून चिकन शिजलेना ते चेक करोन घ्या. ग ग्रिल झाले की व्हाइट कलरचे होईल. हे झाकण ठेवून बाजूला ठेवा. मुले आजू बाजूला असल्यास त्यांना न भाजेल असे दूर ठेवा. ग्रिल पॅन हीट पकडून ठेवतो त्यामुळे चिकन गरम राहते.
आता सॉस करायला घ्या. जाड बुडाचा पॅन घ्या. एक मोठा चमचा तेल घ्या व बटर पण घाला.
ऑलिव्ह ऑइल चालेल पण मी साधे सफोला किंवा सन ड्रॉप लाइट ऑइल वापरते. ह्यात लसूण फ्लेक्स घालून परतून घ्या. ब्राउन व्हायला नको इतकी हीट मीडिअम असली पाहिजे. आता कांदा घाला व परतून घ्या. ह्यात आता मैदा एक चमचा घाला व खमंग परतून घ्या. मैद्याचा कच्चा वास गेला पाहिजे. आता एक वाटी दूध घाला. तुम्ही दूध प्लस हाफ निहाफ किंवा फुल क्रीम वापरू शकता.
हीट मीडिअमच ठेवा नाहीतर गडबडीत सॉस जळेल. आता नीट हलवून घ्या. व हलवतच राहा. मिश्रण
हळू हळू घट्ट होईल. आता ह्यात किसलेले चीज घाला व चवी पुरते मीठ मिरेपूड घाला. पास्त्यात आधी मीठ घातले आहे. व चिकन मध्ये पण मीठ आहे. त्यामुळे संभाळून मीठ घाला नाहीतर सॉस खारट होईल. आता सॉस तयार झाला. एक मिनीट हल्के बुड बुडे येउद्या. मग उकडलेला पास्ता घाला. सॉस मध्ये मावेल इतकाच घाला. अर्धा छोटा चमचा फ्रेश लिंबू रस सॉस मध्ये घाला. उरलेला डब्यात ठेवा मग सलादला वापरता येइल.
आता आपल्या डिशेस तयार झाल्या. प्लेटिंग करू.
ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट तुकडा पोळपाटावर किंवा स्वच्छ प्लेट मध्ये ठेवून त्याचे शार्प सुरीने किंवा उलथन्याने डायगोनल तुकडे करा. अर्धा इंच रुंदी चे असले पाहिजेत. आता डिनर प्लेट मध्ये पास्ता गरम गरम घ्या. व चिकन ब्रेस्ट खाली उलथने किंवा पिझा सर्वर घालून एका झटक्यात उचलून पास्त्यावर ठेवा. वरून अगदी हल्के अर्ब्स स्प्रिंकल करून सर्व्ह करा. वरील प्रमाणात दोन लोकांना मेन कोर्स होईल. बरोबर ब्रुशेटा स्टार्टर स्प्रिन्ग सलाद सर्व करू शकता. चिल्ड व्हाइट वाइन घेउ शकता. किंवा स्प्राइट.
सोर्सः रेसीपी यूट्यूब वर उपलब्ध आहे. सर्च मारल्यास लगेच मिळेल. मी फारसे देशीकरण केलेले नाही. अमूल गोल्ड दूध वापरले आहे. फ्रेश क्रीम घरी ठेवत नाही. मला साय आवडते खायला. काल रविवारच्या लंच साठी बनवले होते. ११ वाजता विडीओ बघितला बाय १२.१५ आमचे जेवण तयार होते. :P :winking: