Productivity improve करण्यासाठी tips-
1. कामांची यादी करणे. प्रत्येक कामासमोर किती वेळ लागेल किंवा किती वेळात करायचे याचा tentative plan करणे.
हे सर्वांना जमेल असे नाही. जर तुम्हाला प्रत्येक गोष्टींचं दडपण येत असेल तर वेळ लिहायची गरज नाही.
2. आपल्याला काम करायला कोणती वेळ जास्त productive आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे plan करा.
काहींना भल्या पहाटे उठून केले की लवकर आणि चांगली होतात कामं. काहींना रात्री उशिरा जागून करायला आवडतं.
3. काम सुरू करण्या आधी हलका व्यायाम, brisk walk, sit ups, push ups, वणवण :P,running, पूजा, झाडांना पाणी देणे यातलं काहीही किंवा सर्व केले तरी चालेल.
या सर्वातून positive energy मिळून आपल्या कामात तिचा उपयोग होईल असे पाहणे.
4. पुरेशी झोप, विश्रांती घेणे.
आपल्याला किमान 6 ते 8 तास झोप आवश्यक आहे.
5. लगेच करण्यायोग्य एखादे काम असेल आणि थोडा वेळ हाताशी असेल तर लगेच कामाचा फडशा पाडावा. जास्त विचार करत वेळ काढत बसु नये.
ही आईची tip.
6. आपले आरोग्य चांगले maintain करावे.
यासाठी annual checkups, त्या साठीचे reminders येतील.
7. एक cutoff time ठेवून त्या वेळेस फोन, internet, tv etc. Off करणे.
यात emails आणि मैत्रीण पण येणार :ड
8. एक वेळेचा chunk घेऊन सलग काम करणे.
एखादं काम करताना पुन्हा पुन्हा उठावे लागत असेल तर ते बाजूला ठेवणे उत्तम.
9. जरी no. 8 मध्ये सलग लिहिले असले तरी ठराविक वेळानंतर break is must.
यात coffee प्या, कुणाशी मस्त गप्पा मारा.
10. कामाच्या पुढे करायची वेळ नोंदवली असली तरी करायच्या आधी मनाचा कौल घ्या.
Go easy on yourself, but take care of priorities.
11. जी गोष्ट mandatory पण redundant आहेत त्या automate किंवा delegate करता येईल का ते पहावे.
Along came Polly मधल्या hero सारखं रोज अंथरूणं काढत घालत बसू नये. :P
12. Remove the clutter.
This includes your desk, email, software, stuff, books, dresses and of course negative minds!
13. Priorities can be changed.
Go easy on yourself.
14. शक्यतो काम पूर्ण करूनच उठा.
जर काम विभागले असेल तर आजचा भाग पूर्ण करायचं बघा.
15. कामाचा plan कागदावर उतरवून बघा.
कधी कधी कामाचकामाचा algorithm कागदावर उतरवतांना काही दुर्लक्षित मुद्दे लक्षात येऊ शकतात.
16. रात्री झोपताना झालेल्या कामांची यादी बघायला अजिबात विसरू नका. :)
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सर्वात तुम्हाला रोज जे करायला आवडतं ते करायला विसरू नका!