सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी रे होळी, पुरणाची पोळी हे नेहमीचंच आहे, पण आज उठल्या उठल्या ही नवी मस्त रेसिपी दिसली म्हणून इथेही सांगतेय.
इच्छूकांनी लाभ घ्यावा :)
साहित्यः
१. कंडेन्स्ड मिल्क - साधारण २०० ग्रॅम किंवा अर्धा टिन
२. दूध - २ कप
३. क्रीम (फेटलेले) - २ कप
४. जिलेटीन - १ टीस्पून
ठंडाई पेस्टसाठी:
१. भिजवून सोललेले बदाम, पिस्ते, काजू/सोललेल्या कलिंगड बिया - प्रत्येकी सात आठ
२. खस (वाळा) इसेन्स - १ टीस्पून
३. बडीशेप - २ टीस्पून
४. वेलदोडा पूड - १ टीस्पून
५. खसखस - १ टीस्पून
६. जायफळ (किसून) - १ टीस्पून
७. पांढरी मिरी - १ टीस्पून
कृती:
१. ठंडाई पेस्टसाठी दिलेले साहित्य वाटून घ्या. गंधासारखी पेस्ट व्हायला हवी.
२. दोन कप दूध पातेल्यात ओतून गॅसवर उकळू द्या. उकळी आल्यावर गॅस बंद करा. त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि ठंडाई पेस्ट घालून नीट ढवळा.
३. आता हे मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये ओतून रूम टेंपरेचरला आल्यावर, अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा.
४. मिश्रण फ्रीजबाहेर काढा. थोड्या दुधात जिलेटीन विरघळवून ते तयार केलेल्या मिश्रणात ओता. त्यातच फेटलेले क्रीम घालून नीट ढवळा.
५. तयार मिश्रण काचेच्या जरा बसक्या ग्लासेसमध्ये ओतून तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवा.
६. सेट झालेले ग्लास बाहेर काढून वर थोडे बदामाचे काप पसरा.
अगदी हलका, फ्लफी ठंडाई मूस तय्यार! Rock the Holi Party!! :partee:
स्रोतः मिल्कमेड स्वीट डिलाईट्चे फेसबूक पेज