मंगलाष्टक मुंजीतली
प्रथम वंदूया गजाननाला
पांडूरंगा अन् सप्तश्रुंगीला
बटू सजला उपनयनाला
कृपाशिष तुमचे देवा, लाभो कार्याला
शुभ मंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ।
ज्ञानाचा गिरवी पाठ बटू
पित्यास मानून गुरू
मातेच्याही संस्कारांचे,
मोल नको विसरु
ज्ञानार्जनाचे महत्व सांगतो, व्रतबंध सोहळा
शुभमंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥
स्वावलंबन अनुसरण्यासी
बटू अपुला सज्ज जाहला
झोळीमध्ये सद्गुणांची
भिक्षा तुम्ही घाला
स्वशिस्तिचे महत्व सांगतो, व्रतबंध सोहळा
शुभमंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥
मंगलाष्टक लग्नातली
प्रथम वंदूनी गजाननाला
लक्ष्मीकेशव, योगेश्वरीला
शुभ मंगल बोला, आज हो शुभमंगल बोला |
मंगलतोरण दारी बांधले
सनई चौघडे वाजू लागले
जन्मांतरीची खूण सांगत बांधीयला शेला
शुभ मंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥
स्वागत करण्या आई बाबा
सोबत असती वहिनी दादा
अभिष्टचिंतन करण्या करिता
आप्तेष्टांनी मंडप सजला
शुभ मंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥
विवाहघटिक समीप आली
अमेय मधुरा उभी राहीली
घेउनिया वरमाला
शुभ मंगल बोला, आज हो शुभमंगल बोला
भाच्याच्या मुंजीनिमित्त आणि मामे भावाच्या लग्नानिमित्त रचलेली ही मंगलाष्टके आहेत. आवडली असल्यास यात कुलदेवता नाव आणि वर वधूचे नाव बदलून तुम्ही वापरु शकता