मंगलाष्टके मंगलाष्टक मुंजीतली प्रथम वंदूया गजाननाला पांडूरंगा अन् सप्तश्रुंगीला बटू सजला उपनयनाला कृपाशिष तुमचे देवा, लाभो कार्याला शुभ मंगल बोला, आज हो शुभमंगल बोला । ज्ञानाचा गिरवी पाठ बटू पित्यास मानून गुरू मातेच्याही संस्कारांचे, मोल नको विसरु ज्ञानार्जनाचे महत्व सांगतो, व्रतबंध सोहळा शुभमंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥ स्वावलंबन अनुसरण्यासी बटू अपुला सज्ज जाहला झोळीमध्ये सद्गुणांची भिक्षा तुम्ही घाला स्वशिस्तिचे महत्व सांगतो, व्रतबंध सोहळा शुभमंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥ मंगलाष्टक लग्नातली प्रथम वंदूनी गजाननाला Keywords: लग्नमुंजमंगलाष्टके Read more about मंगलाष्टकेLog in or register to post comments