मंगलाष्टके

मंगलाष्टके

मंगलाष्टक मुंजीतली

प्रथम वंदूया गजाननाला
पांडूरंगा अन् सप्तश्रुंगीला
बटू सजला उपनयनाला
कृपाशिष तुमचे देवा, लाभो कार्याला
शुभ मंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ।

ज्ञानाचा गिरवी पाठ बटू
पित्यास मानून गुरू
मातेच्याही संस्कारांचे,
मोल नको विसरु
ज्ञानार्जनाचे महत्व सांगतो, व्रतबंध सोहळा
शुभमंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥

स्वावलंबन अनुसरण्यासी
बटू अपुला सज्ज जाहला
झोळीमध्ये सद्गुणांची
भिक्षा तुम्ही घाला
स्वशिस्तिचे महत्व सांगतो, व्रतबंध सोहळा
शुभमंगल बोला, आज हो शुभमंगल बोला ॥

मंगलाष्टक लग्नातली

प्रथम वंदूनी गजाननाला

Keywords: 

Subscribe to मंगलाष्टके
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle