कूल मॉम (शतशब्दकथा)

आज इथल्या एकसे एक सरस शतशब्दकथा वाचल्या.
मागे कधीतरी इथेच प्रतिसादात लिहिलेली माझी शतशब्दकथा, आज वेगळा धागा काढून इथे देतेय.

---------------------------------------------------------------------------------
कूल मॉम

"अभ्या, चल उशीर झालाय आधीच. आपण काय या ऱोहनसारखे लकी थोडीच आहोत? त्याची मॉम एकदम कूल आहे. आपलं आहे का तसं? घरी प्रवेशताच प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जावं लागतंय आपल्याला रोज, वीट येतो अगदी."

अभि आणि जितुचा हा नेहमीचा, मैदानात खेळतानाचा ठरलेला डायलॉग, रोहन कायमच हसत ऐकायचा. क्वचित दुजोराही द्यायचा, "हो आहेच माझी मॉम एकदम कूल. नाही विचारत मला उशीरा येण्याचं किंवा कमी मार्क्स पडल्याचं कारण".

"ग्रेट यार, आम्हाला भेटायचंय एकदा तुझ्या मॉमला ".

ठरल्याप्रमाणे ऱोहन घेऊन आला आपल्या मित्रांना मॉमला भेटवायला, तिच्या खोलीत.

प्रत्येक शरीरक्रिया मशीन्सच्या सहाय्याने करत,आढ्याकडे एकटक बघत, तब्बल तीन वर्षे ती या हॉस्पिटलमध्ये होती 'कोमात'....शांत, स्तब्ध !!..

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle