माझे बाबा उत्तम फुलांच्या रांगोळ्या काढतात.
दिवाळी, गणपती, आम्ही भारतात सुट्टीसाठी जातो तेंव्हा आमच्या स्वागतासाठी , नाती पहिल्यांदा घरी आल्या त्यावेळी , सुनेचं डोहाळजेवण ह्या आणि अशा अनेक वेळी घरी काही छोटं-मोठं कार्य असेल तेंव्हा अतिशय उत्साहाने बाबा दारात रांगोळी काढतात.
ज्या दिवशी रांगोळी काढायची असेल त्या दिवशी पहाटे उठून मार्केट यार्ड मध्ये त्यांच्या आवडीची फुलं आणायला जातात. आणि मग सगळी फुलं, पानं घेऊन दारात ५-६ तास बसून रांगोळी काढतात.
सगळे विचारतात कि तुम्हाला एवढी मस्त डिझाइन्स कशी सुचतात तर ते म्हणतात कि मी एकदा रांगोळी काढायला बसलो कि आपोआप सुचत जातं. खूप रमतात ते ह्या मध्ये.
त्यांच्या ह्या उत्साहाचं आम्हाला सगळ्यांना, आमच्या नातेवाईकांना , बिल्डिंग मधल्या लोकांना खूप कौतुक वाटतं . त्यांनी काढलेल्या काही रांगोळ्या इकडे शेअर करते.
माझे बाबा : वय वर्ष ७२