फुलांच्या रांगोळ्या

माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या

माझे बाबा उत्तम फुलांच्या रांगोळ्या काढतात.

दिवाळी, गणपती, आम्ही भारतात सुट्टीसाठी जातो तेंव्हा आमच्या स्वागतासाठी , नाती पहिल्यांदा घरी आल्या त्यावेळी , सुनेचं डोहाळजेवण ह्या आणि अशा अनेक वेळी घरी काही छोटं-मोठं कार्य असेल तेंव्हा अतिशय उत्साहाने बाबा दारात रांगोळी काढतात.

ज्या दिवशी रांगोळी काढायची असेल त्या दिवशी पहाटे उठून मार्केट यार्ड मध्ये त्यांच्या आवडीची फुलं आणायला जातात. आणि मग सगळी फुलं, पानं घेऊन दारात ५-६ तास बसून रांगोळी काढतात.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

Subscribe to फुलांच्या रांगोळ्या
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle