चिकन राईस/पुलाव

अतिशय सोपी, विना कटकटीची रेसिपी आहे ही. मुलांना खूप आवडते. बर्‍याचजणी करत असतील पण इथे रेसिपी दिसली नाही म्हणून लिहून ठेवते.

कोणताही लाँगग्रेन तांदूळ १ वाटी ( अर्धा तास आधी स्वछ धुवून निथळत ठेवायचा)
बोनलेस-स्कीनलेस चिकन १२५-१५० ग्रॅम
थोड्या दह्यात मीठ, हळद, तिखट घालून १/२ तास मॅरिनेट करत ठेवायचे.
१ छोटा कांदा बारीक चिरून
१ छोटा टोमॅटो बारीक चिरून
आलं-लसूण पेस्ट १ चमचा
तूप २ छोटे चमचे
जीरे
धने-जीरे पूड १-१ चमचा
लाल तिखट आवडीप्रमाणे
थोडीशी हळद
गरम मसाला/आवडीचा कोणताही मसाला १ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला पुदिना (असल्यास, आवडत असल्यास)
मीठ

कृती
कृती अशी काहीच नाही. तूप गरम करायचे, जीरे घालायचे, कांदा जरा हलका ब्राऊन होइपर्यंत परतायचा, आलं-लसूण पेस्ट परतायची, टोमॅटो घालून परतायचे. त्यातच धने-जीरे पूड, हळद, तिखट, गरम मसाला,कोथिंबीर आणि पुदिना घालून परतायचे. जरा तूप बाजून सुटले की मॅरिनेट केलेले चिकन आणि तांदूळ घालून ५-७ मिनिट नीट परतायचे. दुपटीपेक्षा जरा कमी आधणाचे पाणी आणि मीठ घालून भात शिजवायचा.
मी चक्क इथेपर्यंत करून राईस कुकरला लावून टाकते भात.
रात्री करून सकाळचा डिलेड टायमर लावला की डबा भरणे एवढेच काम.

बरोबर कोणतेही दह्यातले रायते किंवा नुसता दहीकांदा पण छान लागते. चिकनचा स्वाद भातात छान उतरतो.
मुलाला डब्यात हा राईस, प्लेन योगर्ट आणि मग ब्रोकोले, बेबी टोमॅटो, एखादे फळ असे दिले की सकाळच्या गडबडीत १० मिनिट मधे डबा तयार असतो.

या आठवड्यात केला की फोटो टाकेन.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle