त्यानंतरचे दिवस - ६

परसों उजाडला. आज क्लास नव्हता. मी ऑफिसातून घरी येऊन तयार होऊन अंकितने सांगितलेल्या वेळी खाली गेले. तो आलेला होताच.
" जस्ट आलास?"
" नाही. पंधरा मिनिटं झाली. "
" अ‍ॅम सो सॉरी. तू लौकर पोचणार हे सांगितलं असतंस तर मी लौकर आले असते. पण तू कसा सांगणार? तुझ्याकडे माझा नंबर नाहीय ना."
" माझ्याकडे आहे तुझा नंबर. आणि मी ठरवून लौकर आलो. "
" वेट वेट. तुझ्याकडे माझा नंबर आहे? पण माझ्याकडे नाहीय तुझा नंबर."
" तुला हवा तेंव्हा सांग ना. मी देतो. "
" वाव! नंबर होता तर मेसेज का नाही केलास कधी?"
" कधी करायला हवा होता?" स्माईल करत तो म्हणाला.
" अरे जेंव्हा आपण पहिल्यांदा बाहेर गेलो त्यानंतर. म्हणजे तुला वाटलं नाही मेसेज करावा असं?"
" वाटलं ना. पण मी तुझा नंबर तुझ्याकडून नव्हता घेतला ना. आपण नंबर एक्सचेंज नव्हते केले. म्हणून. "
" हं"
"बसतेस? पोचलो की देतो माझा नंबर तुला"
मी मागे बसत असताना तो हळू आवाजात म्हणाला ,
" आय डिडंट वाँट टु फ्रीक यु आऊट बाय पॅनिक टेक्स्टींंग. मला घाई पण नाहीय रसा. हे शॉर्टलिव्ड नाहीय माझ्यासाठी. ये एक ऐसे मिलनेका दौर. इसे एंजॉय करते है|"

"हम्म्म. लौकर का आलास?"
"इट इजंट राईट टु मेक अ लेडी वेट. "
कूल. नाहीतर आमचे टीममेटस आणि मित्रमैत्रीणी. बहुतेकदा मीच वेळेवर पोचते. आणि अर्थातच एकटीच पोचलेली असते.
हे असं कुणीतरी पिक करणं , वाट पहायला न लावणं रादर कुणीतरी वाट पहात असणं हे मस्त होतं. अक्की पण यायचा मला घेऊन जायला. पण ते फार कॅज्युअल होतं. तो पण उशीर करायचा नाहीच पण हे असं ठरवून लौकर पोचणं नाही. आम्हाला दोघांना वेळेबद्दल ओसीडी होता. त्यामुळेच.
बाकी गृपमधल्या दोन तीन जणानी काही वेळा असं पिक अप ड्रॉप केलं होतं पण त्यानंतर अगदी सटल बदल जाणवायचे त्यांच्यात की मी कायम टाळलं अक्की सोडून कुणाबरोबर जाणं.
आम्ही एका स्टारबक्स पाशी पोचलो.
" स्टारबक्स?" मी न रहावून म्हणाले.
" हो सॉरी आज इथेच बसू या. म्हणजे बोलता येईल. प्लीज "
" हो रे. चालेल. " मी हसून म्हणाले.
आज आम्ही जास्त बोललो. हेच करियर ऑप्शन्स का निवडले, पुढं काय करायचंय वगैरे.
पुन्हा त्या आकर्षणाच्या लाटा आल्या आणि गेल्या. किती ड्रीमी आहे हे सगळं. चांगलं काहीतरी घडत असेल तर किती पटकन घडायला लागतं.
बाळाच्या पहिल्या पावलासारखे क्षण टेक्नॉलॉजीने कायम कैद करून ठेवावेत वगैरे आयडियल इच्छाना पिल्लं कशी सुरुंग लावतात तसे हे रोज गोल्ड क्षण. स्लो मोशन फक्त मुविज मधे. प्रत्यक्षात घडताना आपण आनंदाने फ्रीझ झालेले असतो बहुतेक किंवा कुठल्या तरी तिसर्‍याच अत्यंत नॉन इस्श्यु मधे बुडलेले असतो. तेंव्हा काही समजतं, काही त्यावेळी रजिस्टर न होता पास होत रहातं. मग सगळं झाल्यावर मेंदूला नॉर्मल क्वांटीटि मधे ऑक्सिजन पोचण्याइतके आपण नॉर्मल झालो की जाणवतं सगळं. त्यातला ऑसमनेस, युनिकनेस, खूप खास असणं.
तर महत्वाच्या मॅच्युअर गप्पांमधे आयुष्यातली महत्वाची माणसं आली आणि गेली, अचीवमेंटस हाय करून गेल्या, काही न आवडलेले
विसरावेसे वाटणारे प्रसंग येऊन "येतोच परत थोड्या दिवसांनी" असं न मागितलेलं आश्वासन देऊन गेले.
पुढची डेट तर क्लासच्या पार्किंगमधेच झाली. आपाप्ल्या रथांवर बसून गप्पा मारत राहिलो आम्ही. गप्पा तरी किती विस्कळित!
किती रँडम सीक्वेन्स मधे. ऑलमोस्ट अ‍ॅज अ‍ॅबसर्ड अ‍ॅज लाईफ.
ऊंचे पेडोकी कतारे, आंब्याची फळं लगडून जमिनीला नाक लावणारी , बुटकी वाटणारी झाडं, नानीके आंगन मे रखी खटीयापे गुजरी गरमीयोकी राते, आजोबांची बैठक, चाचा के पेहलवानीका अखाडा, सुंदर हस्ताक्षरासाठी मिळालेलं आयुष्यातलं पहिलं पेन, सेवन्थ में जब पहली बार क्लास में फर्स्ट आया तब बुआने दिया हुआ पह्ला वॉच, माझं मुलांशी खूप कंफर्टेबल नसणं, लाईफ में फर्स्ट टाईम पसंद आयी हुई स्कूलकी लडकी असं खूप काय काय!
आम्हालाच फक्त त्यातला कॉमन थ्रेड माहीती होता.
मग त्यानंतर एकदा उशीर झालेला तर आमच्या सोसायटीच्या गार्डनमधल्या बेंचवर बसून गप्पा.
दिवस भराभर उडून जात होते. आणि माझा गिल्ट वाढत होता. ही इतकी महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात चाललेली आणि शिबानी आणि अक्कीला अजून मी काही सांगितलंच नव्हतं. का? डोंट नो. माझी मलाच खात्री नव्हती का अजून ? अशी तर मी किती अट्रॅक्ट झाले होते त्याच्याकडे. आधी कुणाला सांगू? मला यांचे अप्रुवल्स हवेत का? मी इतकी वीक आहे का? वॉट अ‍ॅम आय इवन थिंकिंग?
इतक्यात माझा वाढदिवस आला. आता मॅनेज करणं मुश्किल आहे. मित्रमैत्रीणी काहीतरी प्लॅन करणार आणि अंकित पण.
आदल्या दिवशी मी शिबानीला म्हटलं, " मला तुला काहीतरी सांगायचंय."
"प्रेमात पडलीस की काय?"
" हाऊ डु यू नो शिबानी?" मी सॉलिड दचकले. गम्मत म्हणजे ती पण दचकली.
" सगळ्यात अनलाईकली पॉसिबिलिटी म्हणन खरं तर चिडवत होते तुला. तर खरंच निघालं. नाव सांग पटकन आणि सगळंच सांग खरं तर "
" आता सगळ्यात अनलाइकली माणसाचं नाव गेस कर बरं मग."
" तुझा बॉस. "
" ई ई ई. काहीही "
" अक्की"
" माय फुट"
" खरं सांगू? सगळ्यात लाईकली पॉसिबिलिटी? " ताई फुल मुडमधे होत्या.
" सांगा"
" तो येडपट गाडीला फुलं लावणारा, पोनिटेल डुड. " ती हसायला लागली.
मी स्तब्ध.
" थर्ड गेस हॅज टु बी राईट." तिला सगळी मज्जाच वाटत होती बहुतेक.
" यु आर राईट शिबानी . कसं कळलं तुला ? " मी एकेक शब्द सावकाशिने उच्चारत म्हणाले.
आता ती स्टन्ड.
" आर यु सिरियस रसा? का आता तूच लेग पुल करतेयस माझे?"
" नाही ग. खरंच. म्हणजे ओके. नॉट एक्झॅक्टली लव लव अ‍ॅज सच. पण आम्ही खूप आवडतो एकमेकांना. "
" रसा, काय आवडतंय तुला नक्की? म्हणजे तो मुल्गा चांगला असेल नो डाऊट. पण मी इमॅजिनच नाही करू शकत आहे की तो तुझ्या टाईप आहे."
" टाईप काय अगं. आम्ही फार पटकन बाँड झालोय. वादळ यावं आणि एखाद्या रोपट्याला मुळापासून उखडून न्यावं तसं आणि तरी त्या रोपट्यानं भिरभिरत त्या वादळामागेच फिरावं तसं झालंय माझं. "
" ओके लुक. धिस इज साऊंडींग क्वाईट चिजी. इतकं सोपं आहे असं भिरभिरणं तुझ्या सारख्या सॉर्टेड मुलीने?"
मी शिबानीकडून ही अपेक्षाच केली नव्हती. म्हणजे ती इतक्या परखडपणे इतकं निगेटिव मत मांडेल असं वाटलंच नव्हतं मला.
" सोहराब किती इंटरेस्टेड होता तुझ्यात . तू कन्सिडर पण नाही केलंस त्याला. " सोहराब तिचा टीममेट. आम्ही एका पेंटिंग वर्क्शॉपला भेटलो होतो. छान होता तो मुलगा . पण दिलमे कुछ हुआ ही नही तर काय करू मी?
" आणि अनुज तर प्रपोज करणार होता तुला." अनुज हिचा स्कूलफ्रेंड. पुण्याला आला होता तेंव्हा आम्ही हँग आऊट केलं होतं एकत्र. कूल होता. पण क्लिक नाही झालं खरंच.
" बरं माझे मित्र सोड. तुझे स्वत:चे मित्र पण आहेत की चांगले चांगले. जरा पॉझिटिव साईन दिलं असतंस की लगेच बात बन जाती| "
"नोप बेब. जर तर ला काय अर्थ आहे. बात बन रही है| बस बात बनानेवाला कोई और है| "
" हम्म्म. ओके. पण तो जो काय प्रकार केला त्याने तो मला जाम सिली आणि बर्‍यापैकी क्रीपी वाटलाय. नक्की हे फक्त आकर्षण नाहीय ना रसा? एकदा अक्कीशी बोल ना" शिबानी जरा लो वाटत होती. मला वाटलं होतं ती मला चिडवेल, आमची गोष्ट विचारेल. तर ताई सेकंड ओपिनियन घ्यायला सांगत होत्या.
" हो त्याला पण सांगणार आहे आजच . "
" हम्म.. " असं म्हणत शिबानी उठली आणि रूमकडे निघाली.
" आणि तरी परत एकदा, कितीही अनलाइकली असो, व्हाय नॉट अक्की ऑन अर्थ?" परत वळत म्हणाली.
" बीकॉज ही इजंट द वन. "
" मग हा आहे?"
" नाही महिती मला. पण हा होऊ शकतो."
" ओके " परत खाली बसत शिबानी म्हणाली , " एक गोष्ट सांग अशी त्याच्याबद्दल जी या आधी कुठल्याच मुलात नव्हती. "
हा फारच बालिशपणा होत होता. पण असं म्हणाले असते तर माझ्याकडे उत्तर नाही असं झालं असतं.
" ओके. खूप आहेत. पण एक सांगते जी मला खूप आवडते. तो कमंडींग आहे ग. मला थोडं अथोरितेतिव असलेलं आवडतं मुलांनी. ज्या कॉन्फिडन्स ने वागलाय ना तो आत्तापर्यंत ते खूप मस्क्युलिन वाटतंय मला. आम्ही परवा भेटलो ना, तेंव्हा मी जरा लो नेक टॉप घातलेला. त्याने मला खूप शांतपणे समजावलं की हे नाही छान वाटत आहे. तू साधीच गोड दिसतेस. लो नेक टॉपने मी फक्त चुकीच्या मुलांचं लक्ष वेधून घेतेय. आणि मला आवडलं हे. आय मीन दुसर्‍या कुणीही हे सांगितलेलं मी इमॅजिन नाही करु शकत. पण ही अथॉरिटी आवडली मला त्याची."
" ही अथॉरीटी आहे? पझेसिवनेस आहे हा. रसा, प्लिज थिंक अ लॉट. कसलेही निर्णय घ्यायची घाई करू नकोस. "
"हो गं बाई. मी काय लगेच लग्न नाही करत आहे. "
" करू पण नको निदान तीन महिने तरी. मी नसताना कशी करशील?"
" वॉट?"
" मी साईटवर चाललेय दहा दिवसांनी तीन महिन्यांसाठी. आणि मला तुझी काळजी वाटतेय." शिबानी म्हणाली.
" ओह शिबानी मी मिस करेन तुला खूप. "
" हम्म. नीट रहा काय? आणि डोंट गेट प्रेग्नन्ट. शरीराने पण नको आणि मनाने पण ." डोळा मारत ती म्हणाली. तरी पण तिची काळजी मला दिसत होती स्पष्ट.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle