त्यानंतरचे दिवस - ७

अक्कीला पण सांगायचं होतंच. आता शिबानीची रीअ‍ॅक्शन बघून जरा भीती वाटत होती. पण उशीर करून अजून वाट लागली असती.
म्हणजे चिडला नसता तो. सम हाऊ मलाच फार विचित्र वाटलं असतं ते. त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सगळ्यात आधी त्याने मला सांगितलं होतं.
हे त्याने मला स्पेसिफिकली सांगितलं नसलं तरी मला माहिती होतं ते.
"अक्की. " मी आनंदाने म्हणाले. बरेच दिवस झाले होते व्हिडिओ call करून.
" कशीयेस स्पॅरो? "
"मी मस्त आहे. तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण त्याआधी तू पटकन तू कसा आहेस ते सांगून घे. कारण मला वेळ लागणार आहे. "
"कूल. मी मजेत आहे. नथिंग स्पेशल. आता पटकन सांग. काहीतरी भारी दिसतंय. प्रेमात पडलीयेस?" फुस्स! हे दोघं सेम आहेत. म्हणूनच मला जवळचे आहेत बहुतेक.
"हो"
"पटापट सांग सगळं"
मग मी त्याला बऱ्यापैकी रामायण सांगितलं. शिबानीला सांगितलं त्याहून डिटेल मधे.
"ह्म्म्म" मोठा पॉज.
" हम्म्म काय फक्त ? बोल ना. "
" काय बोलू? विचार करतोय"
"अरे म्हणजे काय वाटतंय तुला?"
" रसा, तुला हा मुलगा पूर्ण आवडलाय? "
" पूर्ण ? म्हणजे? एखाद्या माणसात जरासं आवडण्यासारखं काय असतं? "
" असतं की. बर्‍याच गोष्टी असतात जराशा आवडणार्या. म्हणून प्रत्येक वेळी तो माणूस पूर्णच आवडेल असं नसतं. "
" ओके." यावर काय बोलावं मला सुचेना.
" मी असं का म्हणालो माहीतिय का ? कारण तू मला काय वाटतंय याचा विचार करतेयस. असला विचार मनात येणं म्हणजे बहुतेक आपल्यालाच आपल्या निर्णयाबद्दल शंका आहे असं असतं. "
" अरे ! कसला निर्णय ? अजून काहीही निर्णय घेतला नाहीय आम्ही. फक्त आम्ही एकमेकांना आवडतो इतकंच. आणि जवळच्या मित्रांना ते सांगावं वाटणं , त्यांनी पण आप्ल्यासाठी खूष असणं यात कसली शंका ? मी तुला हे खूप दिवसांनी सांगितलं असतं तर चाललं असतं ?" मी चिडून म्हणाले.
शिबानी आणि अक्की दोघं मला सेम फील देतायत.
" ओके ओके. चिल. मी तिथं असतो तर बरं झालं असतं आत्ता. तू उशिरा सांगितलेलं अर्थातच चाललं नसतं. पण इट डजंट मीन कि मला वाटतंय ते मी बोलू नये. सो देर आय अ‍ॅम. "
" ..."
"बरं ते सगळं सोड तू खुश आहेस ना?"
" हो" मी म्हणाले.
" खुश आहेस का फक्त अट्रॅक्टेड आहेस?"
" अक्षय! "
"अरे! मी तिथं नाहीय ना. जे मला तुला न विचारता स्वतः ऑब्झर्व करून कळलं असतं ते आता तुला विचारावं लागणार आहे. "
" हं"
" हं काय? सांग ना. इज इट हॅपिनेस ऑर अट्रॅक्शन? "
" दोन्ही!"
मग इमोशन्स वर अजून थोडी बडबड, काही ऑड प्रश्न यानंतर..
" काही गोष्टी जरा odd वाटतायत. पण आम्ही मुलं काहीही madness करू शकतो प्रेमात पडलो की. सो त्याला थोडा डिस्काउंट देऊ शकतो. " फायनली अक्की म्हणाला.
" उपकार झाले फार." मी म्हणाले.
" मिस यु स्पॅरो."
" मिस यु अक्स! "
झालं.
अक्की जवळ नव्हता, शिबानी चालली होती. मला हुरहूर आणि का कोण जाणे पण थोडासा रिलिफ दोन्ही वाटत होतं.
मी विचार करत बेडवर पडले होते, इतक्यात मेसेज टोन वाजला.
चक्क अंकितचा मेसेज, " बिझी?"
" नॉट फॉर यु. " कुठं शिकले मी हे ?
" कुठं आहेस ?"
" घरीच"
" रसा..."
" ह्म्म्म"
" यु नो हाऊ बॅडली आय वाँट टु किस यु राईट नाऊ ?"
माय गॉड! मी उठून बसले ताडकन. परत दोनदा वाचला तोच मेसेज. रोमांच, धडधड, कानात एक वेगळीच वॉर्म्थ, स्पाईन मधे विजा सगळं एकाच वेळी.
परत मेसेज टोन, " चिडलीस?"
शक्स! मी अजून त्याच्याच मेसेज बॉक्स मधे. येताक्षणी मेसेज ला दोन ब्लु टिक्स.
" बोल ना !" पुन्हा ब्लु टिक्स.
काय बोलणार होते मी? त्याचे सावळे , लहान मुलासारखे प्लम्प, कोरीव ओठ आठवले होते आणि वाट लागली होती.
आणि या कसरतीसाठी त्याला खूप वाकावं लागलं असतं आणि मला टाचा उंच कराव्या लागल्या असत्या. या विचाराने जरा आवेग कमी झाला.
माझ्या चेहर्‍यावर हसू उमटलं. इतक्यात धाडकन दार उघडत शिबानी आत आली.
" अक्कीशी बोल हां काय आज." मॅडमनी ऑर्डर सोडली. मी घाईने मोबाईल बंद केला.
" हे काय आत्ता त्याच्याशी बोलूनच बसले होते"
" काय म्हणाला?"
खरं तर तो साधारण ती म्हणाली तसलंच म्हणाला होता . पण तरी दोघीनी बेडवर पडून , पाय खाली सोडून सिलिंग न्याहाळत साग्रसंगीत गप्पा मारल्या.
" कूल आहे यार हा किती! तू एक मूर्ख आहेस . वीर नसता ना मेरी लाईफमे , तर मी नक्की पटवलं असतं याला. " उसासा टाकत ती म्हणाली.
" ह्म्म्म्म"
" मी इथं नसले तरी मला सगळे अपडेट्स मिळत राहायला हवेत, कळलं ना? " परत ऑर्डर!
"होय शरलॉक. " मी म्हणाले.
" आणि प्लिज अक्कीशी पण बोलत रहा काय ! तू त्याला कमी कॉल करतेस हल्ली. "
" काही पण! तोच बिझी अस्तो. असाईनमेंटस, मित्र आणी ती बया. "
" ह्म्म.. लकी बया. " पुन्हा उसासा.
" शिबानी, ती मुलगी चांगली आहे तशी. अ‍ॅकेडेमिक आहे, सिन्सियर आहे. बोर आहे पण तेच बरं आहे. आता मी विचार करते की एखादी बिची , बायकर चिक टाईप असती तर किती बोर झालं असतं ते "
" वा वा, प्रेमाने मॅच्युअर केलंय तुला. चक्क अक्कीच्या गर्लफ्रेंडची स्तुती . "
" ह्म्म्म"
मग एक मोठा सायलन्स दोन मिनिटांचा.
" आर यु येट टु किस ईच आदर? " अचानक उठून बसत शिबानीने विचारलं.
Oh fish! तो मगासचा मेसेज. आणि मी उत्तरच नवतं दिलं अजून. मी पण उठून बसले.
" उं हुं " मी कशीबशी म्हणाले.
" अगं हो की नाही?"
" ना ही . आणि प्लॅनिंग चाललं होतं तितक्यात तू आलिस ना डिस्टर्ब करायला. " मी हसत म्हणाले.
" गुड. काही घाई नाहीय. कळलं ना. निवांत रहा. लेट द वाईन लिंगर ऑन द टंग. गो स्लो. " इतर वेळी मी हसले अस्ते पण आत्ता ट्रिकी होतं सगळं.
काही न बोलता पण माझं काय झालं ते तिला कळलं. डोक्यावर टपली मारून ती गेली.
मी घाईने मेसेज बॉक्स उघडला.
"इट्स ओके इफ यु आर नॉट रेडी रसा. आय कॅन वेट. फॉरेवर! " तो ऑनलाईन नव्हता.
शिबानी येण्याआधी मी नुसतं " ह्म्म" असा मेसेज करणार होते. पण आता बातोने अलग मोड ले लिया था | आता नवीन उत्तर द्यायचं होतं.
पुन्हा त्याचा विचार. किस फक्त ओठांचा थोडाच असतो?
त्याचे हात माझ्या पाठीवर, माझे त्याच्या मानेवर. म्हणजे आधी मिठी की आधी किस? की किसमधे विरघळत जाणारी मिठी? आणि त्याचवेळी त्याच्यात विरघळत दिसेनाशी होणारी मी? आणि बंद डोळ्यांआड दिसेनासा होणारा तो.
उफ्फ!
" आय डोंट थिंक आय कॅन वेट फॉरेवर ! " मी उत्तर लिहीलं. एका क्षणात तो ऑनलाईन आला. ब्लू टीक्स आल्या. आणि नो आन्सर. फोन तसाच हातात असताना मला झोप लागली.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle