रंग माझा वेगळा- भाग -३
त्यानंतर दिवसभर निधीला ऑनलाईन जायला वेळच मिळाला नाही इतकी बिझी इतकी बिझी . सारंगचे दोन तीन मेसेज येऊन गेले पण तिला बघायला वाचायला त्याला उत्तर द्यायला वेळ कुठेय. आणि हा सारंग कशाला मेसेज करतोय कशाला डोकं खातोय असही वाटून गेलं. अरे बाबा झालं ना तुझ्या मनासारख मग आता काय आहे ? . नीट आनंद घे ना जे काही मनासारखं होतंय त्याचा . निधी आणि सारंग ची डायव्होर्स ची केस कोर्टात चालू होती . पण हा सारंग ना . आता कशाला मेसेज करतोय म्हणून ती वैतागली होतीच . ऑफिस मध्ये इतकं काम कि विचारायची सोय नाही . घरी गेली आणि जेवण करून जरा टीव्ही बघत बसली आणि झोपून पण गेली दुसऱ्या दिवशी पण तेच . ऑफिस मध्ये परत सणकून काम होतच होत. पण तिला आवडायचं ते . डोक्यात कसलेच विचार यायचे नाही ना सारंग ना कोर्ट ना अर्ग्युमेंट्स . नको नको झालं होत . कधी एकदा संपणार असं झालं होत . दुसरा दिवस पण तसाच गेला आणि त्याच्या पुढचा दिवस जवळ जवळ तीन दिवस ती प्रचंड बिझी चा होती चवथ्या दिवशी थोडी सवड मिळाली आणि ती ऑनलाईन झाली खरी आणि लगेचच विराज च्या रडक्या साईन्स . धाय मोकलून रडत होता .
"बापरे अरे झालं काय ? " म्हणून तिने मेसेज केला तर पाचच मिनिटात हजर
मग चार दिवस होतीस कुठे ? अरे किती वाट पहिली तुझी. होतीस कुठे ग . खूप जड गेलं मला
त्यात काय रे एवढं . रोज रोज थोडीच येते मी
यायला पाहिजे तुला . येत नाही म्हणजे काय?
अरे हे काय ? इतकं रागवायचं नसत काही
रागावलो नाही काही . पण काळजी वाटली काय झालं काय ?. खूप जड पण गेलं
बर बोल काय तें झटपट बोल
असं नसत काही . चार दिवसांनी आली आहेस तू आणि झटपट काय ? . एक सांग तुला हॉरर मुव्ही आवडतात का ग ?
हो आवडतात पण इतक्या रात्री तू का आठवण काढतोस त्याची ? तिला थोडं विचित्रच वाटलं
असच ग . उगीचच . मला आवडतात पण एकट्याने बघायला नाही . दोन तिघे तरी पाहिजेत किव्वा गॅंग
हो रे पण आता नको ना हॉरर मुव्ही ची आठवण काढू
निधी आता तू आणि मी एकत्र असतो ना तुला घट्ट पकडून मुव्ही बघितला असता. मला तशी भीती वाटते ग
निधी एकदम चमकली "अरे हा असं काय बोलतोय ?" . ती एकदम सावध झाली .
"ओये तू परवा बोललास ती तुझी यूएस ची मैत्रीण रागवेल ना माझ्यावर"
चल कशाला रागावेल ? तिला बॉय फ्रेंड आहे . कशाला रागवेल?
"विचार काय आहे याचा?". तिनी बोलणं पटकन संपवून टाकलं आणि ती ऑफलाईन झाली पण मनातून थोडी धास्तावलीच. "अरे असं काय तो बोलतो तुला घट्ट पकडून मुव्ही बघितला असता म्हणे . अरे काय हे ?. हे काय चाललय . बरोबर आहे ना तो . आपण व्यवस्थित व्यक्तीशी बोलतो आहोत ना "म्हणून तिच्या डोक्याचा नुसता कल्ला झाला .डोकं भणाणूनच गेल
काही नाही उद्या त्याला सांगायलाच पाहिजे "अरे माझं लग्न झालंय . भले डायव्होर्स कोर्टात चालू असेल पण अजून झालेला नाही . असं काय बोलतो तो . काय आहे त्याच्या मनात ? " तिने ठरवले उद्या त्याच्याशी काय ते बोलून टाकायचे . त्याला आपले मॅरीड स्टेटस सांगून टाकायचे आणि त्याला हे पण सांगायच कि हे असं काही बोलायचं नाही विचित्र . मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि मला काही पर्सनल प्रश्न पण विचारू नको . मी उत्तर देणार नाही . मान्य असेल तर बोलत जाऊ नाहीतर आत्ताच संपवून टाकूया हे बोलणं . असा विचार करता करता निधीचा डोळा कधी लागला ते तिला समजलंच नाही .