रंग माझा वेगळा - भाग शेवटचा
आयुष्य खूप छोटं आहे*
*हां हां म्हणता मृत्यू येईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चताप होईल*
सकाळ सकाळी विराजने पोस्ट टाकली . अगदी सकाळ सकाळी
वा क्या बात है . तिने अंगठा दाखवला . आणि सकाळच्या कामाला लागली. आज सुट्टीचा दिवस रविवार . मस्त मजेत आळसाचा दिवस . खूप वेळ मेसेजवर बोलण्याचा दिवस .नेहमी प्रमाणे रविवारच आवरून वगैरे दुपारचा साडेअकरा -बारा वाजत तिने मेसेज केला
"मस्त चारोळी पाठ्वलीस रे सकाळ सकाळी "
." हो मुदामूनच तुला खुश करायला "
"थांब हा जरा मी गिरनार ग्रीन टी घेऊन येते . तुझ्यासारखा हॉट आणि स्वीट . मग माझ्याशी बोल"
"चालेल "- विराज
"हा बोल . मग आज काय प्लॅन ?"
ताबडतोब विराजने एका मुलीचा फोटो पोस्ट केला
"काय रे पोतडीतून एक एक फोटो काढत असतो . थोड्या थोड्या दिवसांनी ."
" ओळख" -विराज
थोडा वेळ निधीने निरखून बघितलं आणि अंदाज पंचे म्हणाली " होणारी बायको "
"तस बऱ्यापैकी ओळखलस पण वाक्यरचनेत थोडीशी चुकलीस "
"म्हणजे रे ?"
"माझी होणारी बायको नाही . माझी बायको "
निधी शॉक्ड . " काय तुझी बायको ? " हो "
अरे काय हे ?
जे म्हणालीस तेच .
"अरे मग इतके दिवस मजे मजेत काय वाट्टेल ते बोलत होतास माझ्या बरोबर "
"मजेत नाही काही मनापासून . तुला खुश करण्यासाठी . तुझ्या खुशीसाठी"
"अरे असं काय विराज . मला तुझ्या वागण्याचा काही थांगपत्ताच लागत नाहीये"
"एवढं काय त्यात माझी बायको आहे हि ".
"अरे मग इतके दिवस कुठे होती ?"
"तिच्या माहेरी"
"किती दिवस ? किती महिने ?"
" आठ नऊ महिने"
"तुझं वय तरी काय विराज"
"चोवीस "
बायको . किती वर्षांपासून आहे हि?
गेले दोन वर्ष. अग मी जैन आहे . मागेच नव्हतो का तुला बोललॊ ? मी जैन आहे म्हणून . पण माझी मॉम मराठी आहे . आमच्यात लग्न जरा लवकरच होतात
"आणि त्यातले आठ नऊ महिने माहेरी ?"
"हो"
"मग आता ?. परत येणार आहे का ?"
"असं वाटतंय . म्हणजे . नक्की नाही . पण येईल बहुतेक"
निधी म्हणाली " माझा विश्वासच बसत नाहीये विराज . हे काय आहे ?
"जे तुला बोललो ते."
"तरीच तू तुझ प्रोफाइल पिक्चर लावत नव्हतास."
"एक्झॅटली . नाहीतर मुली खूप मागे पडायच्या आणि माझं तर लग्न झालय"
निधीच डोकंच चालेनास झालं ." आणि माझ्याशी तू मस्त मजेत वागत होतास. जणू काही काहीच घडलं नाही . बर तू तुझं आयुष्य सगळ्यांकरता ओपन आहे म्हणत म्हणत नेमकी हि मुद्याची गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस"
"मग काय डिंडोरा पिटू ?"
निधी काहीच बोलली नाही.
थोड्यावेळाने बोलली
" काही भांडण ?"
त्याने नुसताच अंगठा दाखवला" हो"
निधीने मेसेज केला "काय बोलू रे ? थोड्यावेळाने बोलली "विराज तुझ्या बेडरूम मध्ये जाऊन मला फोन करशील ? "
विराज हो म्हणाला . "कधी करशील ? दुपारी जेवण झालं कि ?
नक्की कर मी वाट पहाते ". निधीला काहीच सुचत नव्हतं " काय आणि कसे बोलत होतो आपण इतके दिवस मस्त मजेत "
आता काय बोलू ?
विराज चा फोन वाजला आणि कधी नव्हे ते निधीच्या छातीत धडधडायला लागलं अगदी पहिल्या वेळी त्याच्याशी फोन वर बोलली होती तसच . पण या वेळी तिनेच सांगितलं होत कॉल करायला
" हॅलो . हा बोल ". -विराज
" काय बोलू रे विराज . पण तू हे काही बरोबर वागला नाहीस"
"म्हणजे ?"
"तू हें तुझं लग्न झालं आहे - बायको आहे हे माझ्यापासून लपवून ठेवलस हे '
" मगाशीच बोललो होतो तेच बोलतो निधी मग मी काय ओरडून सांगायला पाहिजे होत ?. हो मला बायको आहे पण ती माझ्याबरोबर राहत नाही असं ? . हा आम्ही दोघे एकत्र राहत असतो तर सांगणं माझी जबाबदारी होती . पण आम्ही एकत्र रहात नव्हतो निधी . अजूनही रहात नाहीयोत . अजूनही ती आली नाहीये घरी . मग मी काय करायला पाहिजे होत ? " .
" ते मला काही समजत नाही . पण झालं हे काही बरोबर झालं नाही . अरे जो पर्यंत हि गोष्ट तू झाकून ठेवली होतीस तो पर्यंत आपलं मैत्रीचं नातं किती बिनधास्त होत . फ्रेश होत . आणि आता तू सांगितल्या पासून तुझ्या पण लक्षात येतंय का बिनधास्त बोलणारा तू एकदम मोजून मापून बोलतो आहेस . कोणीतरी तुला पाठून खेचत असल्यासारखं . . बोलण्यातला बिनधास्त पण हरवलाय तुझ्या . मग अस नातं काय उपयोगाच ? असं नात जपण्यापेक्षा आपण ते इथेच संपवून टाकलं तर ? तुझी बायको येईल तेव्हा येईल पण आता मला पण तुझ्याशी बोलतांना मोकळेपणा वाटणार नाही रे ." निधी एका दमात पटापट बोलून गेली
विराज काहीच बोलला नाही . त्याची मूक संमती होती का ?
थोड्यावेळाने तो बोललाच " निधी थोडा विचार कर. घाईगडबडीने निर्णय घेऊ नको . अजूनही आपण बिनधास्त बोलू शकतो "
"पण मी नाही रे ". निधीने पटकन उत्तर दिल . "विराज मला तू खूप हर्ट केलस .मला खूप त्रास दिला आहेस तू आणि त्याची शिक्षा द्यायचेय मला स्वतःहून . आज पासून सगळ्या सोशल मीडिया वर फेसबुक /व्हॉट्स अप/ इंस्टाग्राम आणि ट्विटर सगळ्यावर तू तुझे स्वतःचे फोटो लाव. सगळ्यांनी बघू दे तुला बिनधास्त . जर का मुली पाठी पडल्या तर त्यांना हक्काने सांग माझं लग्न झालाय . बायको आहे मला .त्यात काय ? घाबरतोस कशाला ? कोणी पाठी पडेल म्हणून ? आणखीन काय बोलू ? ठेवते फोन . ठेऊ का ? "
विराजने नुसताच हुंकार भरला आणि तिने फोन ठेऊन दिला . दिवस तसाच गेला सुना सुना .
दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी तिने त्याला मेसेज केला
"नात्यांच अस्तित्व हे अत्तराच्या कुपी प्रमाणे असत विराज . जोपर्यंत नात्यात काही गोष्टींची झांकाझांक असते तो पर्यंत त्या नात्याला दरवळ असतो पण एकदा का झाकलेल्या गोष्टी उघड झाल्या कि नात्यांचा सुरेख वास उडून जायला सुरवात होते. आणि हाती उरत रंग हींन -वास हींन नात्याचं कलेवर . जे वास हींन तर असतंच असत पण अस्तिव हींन पण असत . ते फरफटत पुढे नेण्यात काहीच मतलब नसतो . कारण कुठे थांबायचं हे कळायलाच हवं असत.
थांबायचं कुठे हे कळायला हवं .विराज .
संपत आलं नातं की वळायला हवं ..
चालतच राहतो आपण निरंतर
कळतच नाही किती जवळ यावं
किती राखावं अंतर
सीमा तोडणं हा स्वभावच रेषेचा
हव्यास उगाच हा दोष आशेचा
मागे फिरण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं
थांबायचं कुठे हे कळायला हवं .. !
सुजा