आठवणी

आठवणी

पाऊस बरसुनी गेला अन आठवणींच्या सरी उलगडल्या,
सर मोत्याचा तुटुनी मोती सरसर गळावे, तश्या आठवणी मनभर ओघळल्या.
काहींनी मन झाले रेशीम रेशीम
हासू त्या गाली देऊन गेल्या,
काहींनी गिरवला त्या मोहकवेळा
जसा साजनच परत बिलगूनी गेला.

काहींनी झरली आसवे, अपमान दडवलेले त्या पुन्हा वर घेऊन आल्या.
काही होत्या धारदार तीक्ष्ण, काळीज चिरत राहिल्या ... काळीज चिरत राहिल्या,
काहींनी जागवल्या त्या विरह वेदना पुन्हा..
उकलून खपल्या जखमांच्या, पुन्हा त्या भळभळू लागल्या, पुन्हा त्या भळभळू लागल्या.
पडता फिरून ऊन, दुःख कमी होईल का?
खपली त्या जखमांवरती पुन्हा आता धरेल का ? पुन्हा आता धरेल का?
जीव तीळतीळ तुटतो माझा, श्वास अडकतो आता
सय येते ज्यांची सारखी, फिरुनी ते पुन्हा येतील का? येतील का ?

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle