रूपेरी वाळूत - १७

बंद काचा आणि सुरू असलेल्या एसीमुळे तिला अचानक थंडी वाजू लागली होती. त्यात नेमका हा उघडे हात आणि मोठ्या गळ्याचा कुर्ता! आवडता असला तरी तो आज घालायचं सुचल्यामुळे तिने  स्वतःला मनातल्या मनात चार शिव्या घातल्या.  काचेवरून ओघळणाऱ्या पाण्यामधून तिला बाहेरचे काहीच धड दिसत नव्हते.

"आपण कुठे आहोत नक्की?" तिने दंडावर फुललेल्या काटयावरून हात फिरवत विचारले.

"लेझी रॉक." तो समोरच्या काचेवर आतल्या उष्णतेने जमलेले धुके तळहाताने निपटत म्हणाला.

"हम्म, पाऊस थांबेलसा वाटत नाही.." थंडीने ती जरा शहारली.

"तुला थंडी वाजतेय का? मी नेमकं आज जॅकेट आणलं नाही. पाऊस थोडा कमी होईपर्यंत असंच बसावं लागेल." बोलताबोलता त्याने तिच्याकडचा एसी वेंट बाजूला वळवला.

तिने ओढणी अजून गुंडाळून घेत मान हलवली.

"हम्म मग सांग." तो तिच्याकडे वळून बसत म्हणाला.

"असं कसं स्वत:बद्दल सांगणार? पुलीस क्वेश्चनिंग वाटतंय हे!" ती त्याच्याकडे बघत म्हणाली.

"म्हणजे रँडम.. काहीही सांग." तोही काही न सुचून म्हणाला.

"देन.. लेट्स प्ले थ्री थिंग्स. यू नो थ्री थिंग्स राईट?" ती जरा उत्साहाने म्हणाली.

"शाळेत खेळलो आहे पण डिटेल्स आठवत नाहीत." तो आठवायचा प्रयत्न करत होता.

" ते सर्कलमध्ये टर्न बाय टर्न खेळायचो पण आपण दोघेच आहोत तर एकमेकांना विचारुया. मी काहीही शब्द म्हणेन, तर तुझ्या त्या शब्दाने आठवणाऱ्या तीन गोष्टी मला एक्स्प्लेन करून सांगायच्या. नंतर तुझी टर्न"

"साऊंड्स इझी." त्याने मान हलवली.

"ओकेय.. सो हॉबीज."

"रीडिंग. मला मोस्टली नॉन फिक्शन वाचायला आवडतं. सायन्स, फायनान्स आणि मोस्टली रिअल लाईफ स्टोरीज.
पेंटिंग, एकेकाळी मी खूप वॉटरकलर्स करत होतो पण गेल्या कित्येक वर्षात विसरून गेलोय. पण लोकांची पेंटिंग्स बघायला आवडतात.

आणि पतंग! आय लव्ह काईट फ्लाईंग!" तो खांदे उडवत म्हणाला.

"ट्रू?" तिने आश्चर्याने भुवया उंचावत विचारले.

"ट्रू!" तो सिरियसली मान हलवून पुढे म्हणाला."ओके. मग ही सेम उत्तरं तू पण दे."

"हम्म हॉबीज.. ऍक्चुली मला ऍनिमल्स सगळ्यात जास्त आवडतात. ममाने मला पेट्स कधीच ठेऊ दिले नाहीत." ती काचेतून समोर बघत नकळत केसांमधून हात फिरवत म्हणाली.

"ब्लेस हर!" त्याने म्हणताच तिने रागाने वळून पाहिले.

"मेबी म्हणूनच मोठेपणी मी मुद्दाम व्हेटर्नरीला गेले." हे मोठ्याने सांगून ती पुढे बोलत राहिली. "बाकी काही खास हॉबीज नाहीत.. डुडलिंग आवडतं, हायकिंग, ट्रेकिंग आवडतं, डान्स आवडतो, वाचायला आवडतं पण फक्त फिक्शन! आणि आय हेट ड्रेसिंग अप. घरी राहून जुन्या कपड्यात लोळायला आवडतं."
खूपच बोललो वाटून ती गप्प झाली.

"ओके, ह्याच्यावरून पुढचा प्रश्न. काय आवडत नाही?" त्याने विचारले.

"जास्त ऍटीट्यूड दाखवणारी माणसं!" तिने नाक मुरडले. "माहिती आहे, पुढे." तो पापणीही न लववता म्हणाला.

"पुढे.. प्राण्यांना त्रास देणारी माणसं. इथे भ्रष्टाचार, पल्युशन वगैरे सांगत नाही, इट इज obv. एमसीपीज आणि अब्यूजीव लोक.

"लिस्ट संपणार आहे की नाही?" तो पुटपुटला.

"संपली. संss पली. युअर टर्न."

"अति बोलणारी माणसं!" तिला दात दाखवत तो म्हणाला. तिने तोंड वाकडं केल्यावर तो पुढे बोलू लागला."मेसी रूम्स आणि घरात पाळलेले प्राणी!"

तिने नाक मुरडून समोर बघितले तेव्हा पाऊस जरा जरासा ठिबकत होता. "प्लीज आता बाहेर जाऊ, ऑक्सिजन संपला आता." तो उत्तर देईपर्यंत ती दार उघडून बाहेर पडली.

कड्याखाली उधाणलेल्या समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा पावसाच्या बारीक थेंबांबरोबर शिडकावा तिच्या चेहऱ्यावर बसला. एव्हाना काळ्या ढगांमधून सूर्य तोंड दाखवू लागला होता. पायाखालच्या खरखरीत काळ्या कातळात ठिकठिकाणी नितळ पाणी साचलेले खड्डे, त्यांच्या कडेने उगवलेले पोपटी गवत आणि त्यात उमलणारी अगदी बारीक गुलाबी, पिवळी रानफुले दिसत होती. कडा समुद्राच्या दिशेला जिथे संपतो त्याच्या थोडा अलिकडे पांढराधोप, मधेमधे आडवे लाल पट्टे रंगवलेला आणि वरच्या निमुळत्या टोकाखाली फिरता दिवा असलेला दीपस्तंभ उभा होता. दिव्याच्या खाली काळे नक्षीदार गज लावलेली वर्तुळाकार बाल्कनी होती.

"पलाशss लाईट हाऊस??" ती एक्साईट होऊन ओरडली.

गॉगल डॅशबोर्डवर ठेऊन तो बाहेर आला. "हम्म दोन महिने बांधकाम सुरू होतं. अजून त्याचं फॉर्मली ओपनिंग व्हायला वेळ आहे. सध्यातरी इथे कोणी येणार नाही."

गाडीमागे जाऊन त्याने सॅक काढून पाठीला लावली. किंचित उन्हात भुरभुरता पाऊस चुकवत लाईट हाऊसच्या दिशेने पळत जाणाऱ्या नोराकडे बघत तो चालायला लागला. ती लाईटहाऊसच्या दारापाशी जाऊन थांबली. समोर तिच्या दिशेने तो आरामात भिजत चालत येत होता. व्हाईट स्नीकर्स, ग्रे जीन्स आणि व्हाइट टीशर्टमध्ये त्याचे लांब पाय आणि ब्रॉड खांदे उठून दिसत होते. चेहऱ्यावर एका बाजूने उन्हाची तिरीप पडल्यामुळे त्याचे ग्रे डोळे आज सोनेरी दिसत होते आणि किंचित भिजलेल्या केसांवर सोनेरी छटा आली होती. ती नकळत जास्तच मन लावून निरीक्षण करत होती. त्याने तिच्यापासून थोड्या अंतरावर येताच खिशातून फोन बाहेर काढला आणि पटकन तिच्यावर रोखून फोटो क्लिक केला. डोळे मोठे करून तिने 'हे.. स्टॉप' ओरडायच्या आधीचे तिचे विस्फारलेले डोळे आणि विलग झालेले ओठ फोटोत बरोब्बर कॅप्चर झाले.

"आपल्याला थोडे फोटोज पण लागतील. फॉर द 'शो' यू नो!" त्याने डोळा मारला.

तिने फक्त त्याच्याकडे रोखून पाहिले. "से चीज" म्हणून जवळ जाऊन तिच्या डोक्याला गाल टेकवत तिच्या खोट्या गोड स्माईलशी स्पर्धा करणारं चार्मिंग स्माईल देत त्याने फोन वर धरून एक सेल्फी काढला. आतल्या वरवर जाणाऱ्या गोलाकार जिन्यातून ते वरच्या बाल्कनीत पोचले तेव्हा बाहेर लख्ख उजेड पसरला होता. हवेत गारठा असला तरी पाऊस थांबला होता. रेलिंग धरून तिने समोर पाहिले तर आडवा पसरलेला फेसळता उधाणलेला समुद्र आणि आकाशात अजून विचित्र आकारांच्या काळ्या करड्या ढगांमधून चमकणारा सूर्य होता. "ब्यू ss टीफुल.." ती वारा तोंडावर घेत म्हणाली. तो रेलिंगला पाठ टेकून शेजारी तिच्याकडे बघत होता.

"लेट्स स्टार्ट अगेन.." त्याने हातातली सॅक भिंतीलगत ठेवली. तिने त्याच्याकडे बघून मान हलवली.

"फूड?" त्याने विचारले.

"कोंकणी, जंक आणि इंडियन चायनीज! आय लव्ह इंडियन चायनीज."

"हू डझन्ट!" तो किंचित हसल्याचा भास झाला.

"हूह! पहिल्यांदाच माझी काहीतरी गोष्ट पटली असेल तुला! युअर टर्न."

"आईच्या हातचं काहीही, हेल्दी फूड म्हणजे सॅलड्स स्मूदीज वगैरे आणि चॉकलेट!"

चॉकलेट!? ती मोठ्याने हसली. त्याने सो व्हॉट! म्हणून खांदे उडवले.

अजून थोडा वेळ वेगवेगळ्या गोष्टी बोलून झाल्यावर तिला उभं राहून कंटाळा आला. "खाली बसूया का? पाय दुखायला लागले आता." त्याने उत्तर द्यायच्या आत ती मागच्या भिंतीला टेकून पाय लांब करून बसली. खाली सिमेंटच्या धुळीत बसायच्या विचाराने तो जरा विचारात पडला, शेवटी सॅकमधले दोन तीन टिश्यू भिंतीजवळ पसरून तो त्यांच्यावर बसला. तिने ओठ दाबून हसत मान हलवली. "फाईव्ह स्टार!" ती त्याच्याकडे न बघता पुटपुटली.

"मोका?" त्याचा आवाज आल्यावर तिने मान वळवून पाहिले तर त्याच्या हातात दोन वाफाळते ट्रॅव्हल मग्ज होते. ओह! तिने मनातल्या मनात त्याला नावं ठेवल्याबद्दल स्वतःला चापटी मारली.
थॅंक्यू! दोन्ही हातानी मग धरून ती जरा खजील होऊन म्हणाली.
"यम! हेजलनट!?"

"हम्म, रिसॉर्टचा स्पेशल ब्रू आहे."

"खरंच मस्त आहे." तिने मग पुन्हा तोंडाला लावला.

बराच वेळ एकमेकांच्या गोष्टी ऐकल्यावर सूर्य अस्ताला जाऊ लागला तेव्हा ते खाली उतरले.

"अम्म.. पलाश, ते फोटो प्रकरणाचं काही कळलं का?" त्याने गाडी सुरू केल्यावर तिने दबक्या आवाजात विचारलं.

"बऱ्यापैकी आयडिया आहे, थोडं कन्फर्म करणं बाकी आहे आता. डोन्ट वरी, लवकरच कळेल." तो तिच्याकडे बघून म्हणाला.

काचेबाहेर हेडलाईटच्या उजेडात मागे पडणारी काळीसावळी झाडे बघत तिने खोल श्वास घेतला.

"नोरा, आपण देवधर्म मध्ये आणायचा नाही असं ठरवलं होतं पण एक प्रॉब्लेम झालाय. अप्पा आणि आईचं म्हणणं आहे की लग्न झाल्यावर आपण जोडीने सत्यनारायणाची पूजा करायची आहे. एकदाच फक्त. म्हणजे जास्त काही नाही, तुला माझ्या शेजारी बसावं लागेल. पूजा मीच करेन. पण हे लग्न खरं वाटण्यासाठी खूप गरजेचं आहे. प्लीज.." त्याने भराभर बोलून टाकलं.

"बरं झालं तू विचारलंस.. मलापण एक गोष्ट विचारायची होती. ममाने तिचा वेडिंग गाऊन मी थोडे चेंजेस करून घालेन म्हणून जपून ठेवला आहे. मला लग्नात त्या गाऊनमध्ये पहायची तिची खूप इच्छा आहे. सो मी तुझं ऐकते, तू माझं ऐक. ओके?" तिने भुवया उंचावून विचारले.

"नो प्रॉब्लेम!" तो शांतपणे म्हणाला.

तिच्या घरासमोर गाडी थांबल्यावर तिची लहानशी सॅक उचलून तिने दार उघडले. त्याला तिच्याकडे बघताना बघून ती थांबली. "अ डेट एण्ड्स विथ अ गुडबाय किस!" तो तिरकस हसून म्हणाला.

"इन युअर ड्रीम्स!" धाडकन दार आपटून जाताजाता खिडकीत वाकून ती ओरडली.

"मोस्ट प्रॉबब्ली!" तो हळूच म्हणाला.
ओठ घट्ट मिटून मागे न बघता ती भराभर चालू लागली. तो तसाच थांबून हसत होता.

ttd_1509865201m1-01.jpeg

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle