रूपेरी वाळूत - २७

"गार्गीss' शर्वरीच्या हाकेने गार्गी धडपडत उठली आणि पलाश हळू जा म्हणेपर्यंत दुडदुडत दाराबाहेर पडली. उघड्या दारातून सॉरीss ओरडून शर्वरीने पुन्हा दार बाहेर ओढून घेतले. सगळ्या आवाजांनी जाग येऊन नोराने डोळे उघडले तेव्हा तिला सगळ्यात आधी हलकासा ब्लॅक ओपीयमचा सुगंध जाणवला. मान जरा हलवल्यावर ती त्याच्या कुशीत घुसून झोपल्याचे लक्षात येताच ती हात पाय उचलून ताडकन बाजूला सरकली.

"मला आधी का उठवलं नाही?" त्याच्याकडे न बघता तिने विचारले.

"शो टाईम!" वहिनीला दारातून दिसलो आपण." तो सरळ म्हणाला.

"हुंह, तूच चान्स मारला असशील." तिने नाक फुगवले.

"हॅलो! मी माझ्याच बाजूला आहे. तूच येऊन माझ्या अंगावर हात पाय टाकून झोपली होतीस. सो आय थिंक, चान्स तूच मारत असशील!" तो डोकं तिच्याकडे वळवून म्हणाला.

ती फरशीवर पाय आदळत उभी राहिली आणि भराभर ब्लॅंकेट घडी घालून ठेऊन बाथरूममध्ये घुसली. बेसीनसमोर उभी राहून तोंडावर थंडगार पाण्याचे हबके मारल्यावर कुठे तिचं वाढलेलं टेम्परेचर कमी झालं. आरशात बघून ब्रश करता करता तिच्या नाकातून दोन थेंब ओघळले. चेहरा जरा खाली केला की नाकातून पाणी येत होतं. तिला आठवलं की मिनूच्या लग्नापासून तिला ऑन अँड ऑफ अशी सर्दी होतीच. ईक्स! ही सर्दी कधी थांबणार आहे म्हणत तिने टिश्यूने नाक पुसले.

दिवसभर गार्गीमागे पळून आणि वहिनीच्या गप्पा ऐकून खूप दमायला झालं. पाच साडेपाचला वहिनी गार्गीला घेऊन गेल्यावर दोघेही सोफ्यावर अक्षरशः कोसळले. दुपारचं जेवण खूप जास्त आणि उशिरा झाल्यामुळे संध्याकाळी भूक नव्हतीच. थोडावेळ टीव्हीवर टॉम क्रुझला काचेच्या बिल्डिंग्जवरून बंजी जम्प करून इकडे तिकडे जाताना बघून  नोराने मोबाईल हातात घेतला, सोशल मीडिया फिरून झाल्यावर पुन्हा सुक सुक करत तिने  हातातला नॅपकिन नाकावर दाबून डोकं मागे टेकलं. सर्दीबरोबर हातोडा मारल्यासारखे डोके ठणकत होते.

"यू ओके?" त्याने टीव्हीचा आवाज कमी करत विचारले. "हम्म, सर्दी आणि डोकं दुखतंय खूप.." ती पुटपुटली. तो फोन उचलून किचनमध्ये गेला. फोनवर काहीतरी सांगून त्याने गॅसवर पाणी उकळत ठेवले. उकळत्या पाण्यात चिमूटभर हळद आणि एक आल्याचा तुकडा किसून घातला. पाणी दोन मोठ्या मगमध्ये गाळून बाहेर घेऊन आला. "पी" तिच्यासमोर मग ठेवत तो म्हणाला. "हे काय आहे?" नाक वाकडे करून, संशयाने मगमध्ये बघत तिने विचारले. "हळद आणि आलं आहे, बरं वाटेल तुला."

थँक्स म्हणून किंचित हसून तिने मग तोंडाला लावला. मध्येच थांबून तिने त्याच्याकडे बघितले. "पण तू का पितो आहेस हे?"

"तुझा बग मला ट्रान्सफर होऊ नये म्हणून!" तो मिश्कीलपणे म्हणाला.

तिने फक्त डोळे फिरवले.

--

जाग आली तेव्हा ती सोफ्यावरच होती फक्त अंगावर फ्लीसचे मऊ ब्लॅंकेट पांघरलेले होते. तिने फोन उचलून वेळ बघितली. ओह, तीन तास झोप! म्हणून तिने हात उचलून आळस दिला. तो दिसला नाही तेव्हा तिने नाक पुसून त्याला हाक मारली. तो किचनच्या दारातून डोकावला. "दोन मिनिटं थांब." त्याचा आवाज आला. ती तशीच स्वतःला ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून घेऊन पडून राहिली.

त्याने बाहेर येऊन तिच्या पाठीमागे दोन उश्या लावून बसवलं आणि हातात मोठा वाफाळता पसरट सूप कप ठेवला. नुसत्या गरम वाफेनेच तिला बरं वाटलं. "म्म.. वास मस्त येतोय. काय आहे?" ती दोन्ही हातात गरम कप धरत म्हणाली.

"चिकन लेमन सूप. ग्रीक रेसिपी. श्रेडेड चिकन, एग सॉस, पास्ता सगळं आहे त्यात. उद्याच ठणठणीत होशील." त्याने ट्रेमधून आपला कप उचलला.

"गुड. थँक्स." तिने चमचा उचलून खायला सुरुवात केली. "तू बनवलंस हे?"

"फक्त गरम केलं. रिसॉर्टच्या मेन्यूमध्ये आहे, वेटर घेऊन आला होता." तो चमच्यावर फुंकर मारत म्हणाला.

सूप पिऊन झोपायला गेल्यावर ती वॉर्डरोबमधून कपडे काढायला गेली. "बरं नाहीये तर झोप इथेच. नंतर शिफ्ट करू सगळं." पलाश बाथरूममधून येत म्हणाला. तिनेही फार खळखळ न करता कपडे पुन्हा आत ठेवले. ब्लॅंकेट ओढून आडवं झाल्यावर तिने कुशीवर वळून त्याच्याकडे पाहिले, नेमका तोही कूस बदलून तिच्याकडेच बघत होता. ती किंचित हसली. "सो? आय गेस आय एम नॉट अ बॅड हजबंड!" तो म्हणाला.

"हम्म, नॉट अ बॅड हजबंड!" ती मान हलवत म्हणाली. तिच्या हसऱ्या डोळ्यांकडे त्याचे लक्ष गेले. तिचे बदामाच्या आकाराचे करवंदी डोळे आणि लांब डार्क पापण्या त्याला आधीपासून भुरळ पाडत होते. तिचं क्यूट छोटंसं टोकदार नाक.. त्याला तिची मुख्य आवडणारी गोष्ट म्हणजे ती जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा ती पूर्णपणे त्याच्याबरोबर असते. ती त्याची प्रत्येक गोष्ट ऐकते, लक्ष देते आणि त्याला कधीच कसल्या चुकीच्या कल्पना देत नाही.

हम्म.. तिला किस वगैरे करण्याचा मूर्खपणा टाळून त्याने तिच्यावरची नजर हटवली. नाहीतर त्याने नक्कीच किस केलं असतं आणि त्यानंतर घडणाऱ्या गोष्टी त्याच्या हातात राहिल्या नसत्या. पण त्याला काळजी होती आणि त्यांच्या नात्यातल्या सीमारेषा चांगल्या माहिती होत्या.  त्याने उठून दिवे बंद केले. खिडकीतून रस्त्यावरच्या दिव्याची एक तिरीप तिच्या केसांवर पडली होती.

"आता झोप येत नाहीये.." दोन तीनदा कूस बदलून ती पुटपुटली.

तो डोक्याखाली हात घेऊन छताकडे बघत होता. तो झोपलाय की जागा आहे ते समजत नव्हते. "सो.. टेल मी युअर स्टोरी!" त्याचा हळू कुजबुजल्यासारखा आवाज आला.

"स्टोरी? म्हणजे?"

"म्हणजे आपली प्रत्येकाची अशी एक गोष्ट असते. आपण जसे आहोत ते आपण जन्मल्यापासून कुठे, कसे राहतो आणि आपल्याबरोबर घडलेल्या घटनांमुळे असतो. एव्हरीथींग इज रिलेटेड. सो, नोराज स्टोरी." तो अजूनही वर बघत म्हणाला.

"ओह! स्टोरी तशी बोर आहे म्हणजे तुझ्याइतकी हॅपनिंग तर नाहीच." ती जीभ चावत म्हणाली. त्याने मान वळवून तिला एक लूक दिला. ती पुढे बोलायला लागली. "माझं लहानपण तुला माहितीच आहे. ममा आणि डॅडी बेकरीत बिझी असायचे. मला आणि मायाला ग्रॅन सांभाळायची. रादर नंतर ती इतकी म्हातारी झाली होती की आम्हीच तिला सांभाळायचो. मला प्राण्यांची आवड होती आणि मायाला गाड्यांची. त्याने बारावीच्या सुट्टीतच गॅरेजचा प्लॅन केला आणि काम सुरू केलं. मी बारावीत खूप अभ्यास केला. मला काही करून व्हेटर्नरीला ऍडमिशन मिळवायची होती. सीईटी चांगली झाली आणि फायनली मुंबईला नंबर लागला! आमच्या घरात फार काही मुली शिकलेल्या नाहीत, ममाला पण मी बेकरी सांभाळून लवकर लग्न करावं वाटत होतं. पण डॅडींनी मला सपोर्ट केला आणि मी परळच्या कॉलेजला पोचले."

"ओह, तू माझ्या खूप जवळ होतीस.." तो उद्गारला.

"गावात कितीही स्मार्टनेस दाखवला तरी मुंबईचं फास्ट लाईफ नवं होतं. माझा कॉन्फिडन्स खूप कमी झाला होता. त्यात नवे फ्रेंड्स, आजूबाजूला वावरणाऱ्या हॉस्टेलच्या मुली माझ्यापेक्षा खूप स्टायलिश आणि स्मार्ट होत्या. म्हणजे मला असं वाटायचं. तरीही मी स्वतःला त्यांच्यासारखं करायचा, त्यांचा अ‍ॅक्सेप्टन्स मिळवायचा प्रयत्न करत होते. अभ्यासाचा लोड तर होताच."

त्याला डोळ्यासमोर ती घाबरलेली, छोटीशी मुलगी दिसत होती. बघता बघता तिला घट्ट मिठीत घेऊन तू त्या सगळ्यांपेक्षा खूप स्पेशल आहेस हे सांगायचं होतं पण त्याने हात स्ट्रिक्टली डोक्याखाली ठेवले.

"मी सेकंड यरला होते तेव्हा केतन भेटला. तो माझ्या रूममेटच्या मैत्रिणीचा भाऊ होता. त्यामुळे जास्त भेटत गेला. ही वॉज फ्रेंडली आणि त्याची कंपनी आवडायची मला."

पलाशची बोटं ब्लॅंकेटमध्ये रुतली होती.

"ख्रिसमसला आम्ही त्याच्या घरी डिनरला गेलो होतो. त्याची फॅमिली छान होती. मग नंतर जेव्हा त्याने मला एकटी गाठून मी त्याला आवडते सांगितलं तेव्हा मी खूप खुश होते. मी लगेच ऍक्सेप्ट केलं. ही वॉज गुड लूकिंग, शिक्षण, नोकरी सगळंच छान होतं. बाकीच्या मुलींना बघून मलाही एक बीएफ असावा असं वाटत होतं" तिचा आवाज बारीक झाला होता. "सुरुवातीला मला खूप छान वाटत होतं पण आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना तो खूप फिजिकल, खूप पझेसिव्ह होता. मी कुठल्याच मुलाशी बोललेलं त्याला आवडायचं नाही. तरीही दोन वर्ष त्याने मला असंच कंट्रोल केलं. मी कायम त्याचं अप्रुवल मिळवायचा प्रयत्न करत होते, त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करत होते, पण नेहमी माझ्यातच काहीतरी कमी होतं." तिने थांबून एक खोल श्वास घेतला. त्याने तिच्या डोळ्यात बघून हातावर थोपटले. "तुला सांगायचं नसेल तर इट्स ओके.." तो हळूच म्हणाला.

"नाही मला बोलू दे. आय वॉन्ट टू गेट इट आउट ऑफ माय सिस्टम. बाकी कोणाकडेही मला हे बोलता येणार नाही." ती आवंढा गिळत म्हणाली.

"ही वॉज ट्राइंग टू गेट फिजिकल विथ मी. आय वॉज ओके अपटू अ लिमिट. बट इट वॉज नेव्हर इनफ फॉर हिम. त्याने मला खूपदा फोर्स करायचा प्रयत्न केला पण माझ्यात ते करायची हिम्मत नव्हती आणि मला जमतही नव्हतं. त्यावरून त्याने मला खूप छळलं. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. तो खूपदा मित्रांच्या फ्लॅटवर रहात असे. फायनली मी मनाची तयारी करून त्या फ्लॅटवर गेले तेव्हा लिफ्टमधून बाहेर येताच कॉरिडॉरमध्ये तो मला दिसला. दाराचे लॉक उघडताना तो एका मुलीला किस करत होता अँड शी वॉज ऑल ओव्हर हिम. तो दार उघडून तिला आत घेऊन गेला आणि दार बंद झालं. आणि मी! मी त्याच्याबरोबर फ्युचरचा विचार करत होते!"

"आधीही मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकू येत होत्या पण मी इग्नोर करत होते. त्यानंतर मी त्याला एकदाच भेटून त्याच्या सगळ्या वस्तू, गिफ्ट्स परत देऊन टाकली आणि माझं हॉस्टेल बदललं. त्याला पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात येऊ दिलं नाही." तिने श्वास सोडला. "नंतर सगळं सोपं होतं. मी स्वतःला जे चांगलं जमतं ते केलं, स्वतःला अभ्यासात बुडवून घेतलं! चांगले मार्क्स मिळवले, सरकारी परीक्षा दिल्या आणि सिलेक्शन झालं. पुढचं सगळं तुला माहीतच आहे." नकळत इतका वेळ तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता.

क्रमशः

Greek Chicken Lemon Soup with Orzo “Avgolemono” रेसिपी!
images (1)-01.jpeg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle