पलाश रिसॉर्टच्या किचनमध्ये शेफला उद्या येणाऱ्या गेस्टच्या फूड ऍलर्जीज आणि त्या टाळून करता येणारे पदार्थ यांची त्या गेस्टने दिलेली लिस्ट समजावून सांगत होता. तेवढ्यात मेसेजच्या आवाजाने त्याने फोन बाहेर काढला. नोराचा मेसेज? म्हणून त्याने पटकन उघडून वाचायला सुरू केला. Forgot to tell you that it's my parents 35th anniversary. We have to be there tonight. Could you be free by 7 pm? I am extremely sorry..
त्याने खोल श्वास घेऊन कपाळावरून हात फिरवला आणि लगोलग तिला कॉल केला.
'इतक्या' लवकर सांगितल्याबद्दल थँक्स! तो तिरकसपणे म्हणाला.
"आय नो.. आय एम सो सॉरी. मी खरंच विसरून गेले होते. आज आठवण करायला मायाने फोन केला तेव्हा आठवलं. डोन्ट वरी, मी गिफ्ट गेल्या महिन्यातच ऑनलाइन मागवलं होतं, ते रेडी आहे. तू प्लीज सात वाजता निघ, तिकडे साडेसातला पोचलास तरी चालेल." तिने पटापट सांगून टाकले.
"सात वाजता मी 'आपल्या' घरी येतोय आणि माझ्या बायकोला घेऊन तिथे जाणार आहे. लाइक अ गुड हजबंड!" ऊह! त्याच्या नेहमीच्या प्रोफेशनल रेशमी आवाजात आलेली किंचित पुरुषी जरब जाणवून तिच्या पोटात गुदगुल्या झाल्या.
---
तो गेटसमोर थांबला तेव्हा ती घर बंद करून अंगणातल्या खुर्चीत सेलफोन बघत बसली होती. थारचं फायरिंग ऐकू येताच तिने मान उचलून हसून त्याच्याकडे बघितलं. ती उठताच तिचे टोकाला किंचित कर्ल करून मोकळे सोडलेले केस, रोझ गोल्ड टिश्यूचा स्लिव्हलेस ब्लाउज, तिच्या सगळ्या कर्व्हजना लपेटलेली, एकाच वेळी नाजूक आणि हॉट दिसणारी पारदर्शक स्काय ब्लू ऑर्गन्झा साडी सगळं नजर न हलवता त्याने बघून घेतलं. हातात गिफ्टचा खोका धरून एका हाताने निऱ्या नीट करत ती गाडीकडे आली. दार उघडून ती आत बसताच त्याला तिच्या मस्काराने अजून गडद झालेल्या पापण्या आणि ग्लॉसी न्यूड लिपस्टिकने आणखी टपोरे झालेले ओठ दिसले. पदरावरच्या बारीक रोझ गोल्ड आणि गुलाबी फुलांच्या एम्ब्रॉयडरीखाली क्लीवेजची हिंट आणि तिथे स्थिरावलेलं थोडे काळे मणी आणि छोट्या शिंपल्याच्या आकाराच्या दोन वाट्या असलेलं नाजूक सोन्याच्या गोफाचं मंगळसूत्र होतं. मंगळसूत्र? तिने इथे राहायला आल्यापासून पहिल्यांदाच ते घातलं होतं. त्याच्या हृदयात काहीतरी कालवाकालव झाली.
त्याने पटकन नजर समोर रस्त्याकडे वळवली आणि गाडी सुरू केली. "ममा साडीच नेसून ये म्हणून मागे लागली होती. साडी ओके दिसतेय ना?" तिने कॉन्शस होत विचारले. "पायलने एकदाच शिकवली होती तशी नेसले."
"हम्म आय थिंक सो.. लूकिंग गुड." तो आवाज नेहमीसारखा ठेवत म्हणाला. खरंतर त्याच्या डोक्यात तिच्यासाठी कितीतरी चावट विशेषणं तरळून गेली.
ती मान हलवून गप्प बसली. तो नेहमीप्रमाणे त्याच्या सेमी कॅज्युअल खाकीज आणि क्रिस्पी व्हाईट शर्टमध्ये काही खास न करताही रुबाबदार दिसत होता. नोराच्या घरी पोचताच आतले आनंदी आवाज बाहेर ऐकू येत होते. गॅलरीत फोनवर बोलणाऱ्या इव्हाने गाडीतून उतरणाऱ्या नोरा पलाशकडे बघून जोरजोरात हात हलवले. पलाशने मागे जाऊन पस्तीस लाल गुलाबांचा भलामोठा बुके बाहेर काढला. "ओह वॉव, थँक्स!" नोरा उत्साहाने ओरडलीच. "चिल!" पलाशने हसत एका हाताने तिच्या कंबरेला वेढुन स्वतःकडे ओढले. त्याला चिकटून शॉक होत भुवया उंचावून तिने त्याच्याकडे बघितले. "हे लव्ह बर्डस, आता आत या लवकर!" वरून इव्हा ओरडली. "दॅट्स व्हाय!" तो मान तिरकी करत म्हणाला.
आत जवळचेच सगळे नातेवाईक होते. डॅडी डार्क सूट घालून गप्पा मारत होते आणि शेजारी ममा बनारसी साडी नेसून चमकत होती. गेल्या गेल्या पलाशने त्यांना शुभेच्छा देऊन बुके ममाच्या हातात ठेवला आणि तो मायाशेजारी जाऊन बसला. नोराने गिफ्ट डॅडींच्या हातात दिले. बॉक्स उघडल्यावर आत Together is a wonderful place to be लिहिलेली डिजिटल फोटो फ्रेम होती, त्यात त्यांचे विविध टप्प्यावरचे फॅमिली फोटो सरकत होते. ममाला कधीपासून हवा असलेला महागडा मेकअप सेट आणि डॅडींना बॅलंटाइन्स थर्टीचा बॉक्स काढून दिला. "हे ममाला पुढची सगळी वर्ष सहन करण्यासाठी." ती डॅडींच्या कानात म्हणाल्यावर ते खळखळून हसले. ममाने मायाकडे बघून बापलेक काय वेडे आहेत असा लूक दिला. मायानेही मान हलवली. केक वगैरे कापून झाल्यावर जेवताना डॅडींनी त्यांची नेहमीची ममाच्या प्रेमात पडायची स्टोरी सांगितली, ममा नेहमीप्रमाणेच लाजली. जेवणं होऊन सगळे बाहेर गप्पा मारत बसले. नोरा बहुतेक बाकी बहिणींबरोबर तिच्या खोलीत बसली होती. एव्हाना पलाशला कंटाळा यायला लागला होता. तो नोराला शोधायला उठून कॉरिडॉरमध्ये जाताच त्याला मागच्या वेळी तिथेच त्याच्या मिठीत अडकलेली नोरा आठवली. त्याच्या अंगातून उष्ण रक्ताची एक लाट उसळून गेली. तेवढ्यात कुणीतरी त्याच्या गुढग्यापाशी ट्रावझर धरून ओढली.
त्याने खाली बघितले तर प्रिन्सेस फ्रॉक घातलेली एक तीन चार वर्षांची गोड मुलगी होती. हां, कॅरन, इव्हाची मुलगी. "अंकल, मला सू आली" ती ओरडली. ओह नो.. "एक मिनीट मी तुला ममाकडे नेतो." तो आजूबाजूला बघत म्हणाला. "आता लगेच!" ती पुन्हा म्हणाली. तो घाईने तिला उचलून बाथरूमकडे घेऊन गेला. ती फक्त कमोडकडे बोट दाखवत होती. ओह, ओके! गडबडून त्याने तिला उचलून कमोडवर बसवले. बराच वेळ काय काय बडबड करून शेवटी ती झालं म्हणेपर्यंत नोरा तिथे पोचली होती. "ओह, अर्रर्र, सॉरी पलाश.." ती सगळी परिस्थिती बघून हसत त्याला म्हणाली. त्याने कसंबसं हसून टिश्यू तिच्या हातात दिले आणि पटकन बाहेर गेला.
सगळं आवरून कॅरनला इव्हाकडे सोपवून ती पुन्हा बाहेर आली तेव्हा माया हातवारे करून कुठल्यातरी कारबद्दल पलाशबरोबर बोलत होता. पलाशने निघुया का म्हणून खूण केल्यावर तिने मान डोलावली. सगळ्यांचा निरोप घेऊन निघाल्यावर गाडीत ते दोघेही शांत होते. आग दोन्हीकडे होती पण दोघेही तसं दाखवत नव्हते. त्याच क्षणी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन तिला मिठीत ओढायची पुन्हा पुन्हा वर येणारी इच्छा तो कशीबशी दाबून टाकत होता. घरी पोचताच त्याने स्लीव्हज फोल्ड केल्या आणि अर्धवट राहिलेलं काम संपवायला स्टडीत जाऊन बसला. पण खरं कारण तिच्यापासून लांब रहाणं होतं, तिच्या जवळ असताना तो स्वतःला कंट्रोल करू शकला नसता. तिने वर जाऊन उरलासुरला मेकअप पुसला, कपडे बदलले आणि ब्लॅंकेट ओढून बेडवर पडली. तिला अजूनही कमोडवर बसून बडबड करणारी कॅरन आणि तिच्यासमोर हातात टिश्यू पकडून उभा असलेला पलाश आठवून हसू येत होतं. घरी गेल्यापासून त्याची जवळीक, तिच्यावरून न हलणारी त्याची नजर आठवून तिला काही सुचत नव्हते. तिने शेजारी पाहिले तर पाण्याची बाटली रिकामी होती. ती उठून पाणी घ्यायला खाली निघाली, जाताजाता पलाशच्या खोलीचा दिवा बंद दिसला. खाली गेल्यावर स्टडीच्या दारातून उजेडाची तिरीप येत होती.
समोर उघडलेली फायनांशीअल्स पलाशच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हती. त्याने डोळे चोळून, आळस देऊन शर्टची दोन बटणे काढली आणि हाताने केस विस्कटून पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहिले. दीड वाजला होता तरी काम संपत नव्हते. तेवढयात दार ढकलले गेले आणि नोरा डोकावली. "मी येऊ का? तुला डिस्टर्ब होत नसेल तर.."
त्याने काही न बोलता होकारार्थी मान हलवली.
तिने हळूच आत येत दार लावले. त्याची नजर तिच्यावर खिळून राहिली होती. आज तिने पुन्हा तो वेडिंग नाईटवाला कॅमी आणि शॉर्ट्स घातल्या होत्या. पंचेस आणि हेडबोर्ड आठवून त्याचे कान तापले.
"मला झोप येत नाहीये." ती थांबत, थोडी थोडी पुढे येत म्हणाली.
त्याने लॅपटॉप स्क्रीन खाली केली आणि खुर्चीतून उठून पुढे येऊन डेस्कला टेकून बसला. त्याने हात स्ट्रिक्टली खिशात ठेवले नाहीतर ते काय करतील याची त्याला शंका होती.
ती हळूहळू अर्धवट भरलेल्या पुस्तकांच्या कपाटाकडे गेली. एकेका पुस्तकाच्या पाठीवर बोट फिरवत तिने नावं पाहिली. "हम्म नाईस कलेक्शन.." ती मधेच झोपाळू आवाजात म्हणाली.
तो ओठ दाबून हसत तिच्याकडे पहात होता. "नोरा? आर यू ओके?" त्याने विचारले.
"हम्म.. " तिने फक्त लांब श्वास सोडला.
ती झोपेतून उठूनही खांद्यावर विस्कटून वाहत्या केसांनिशी सुंदर दिसत होती पण त्याचा अर्धा टक इन राहिलेला, दोन बटन्स उघडा शर्ट आणि विस्कटलेले केस असा अवतार दिसत असणार.. त्याने केसातून हात फिरवला.
"तुझं काम अजून संपलं नाही?" तिने लॅपटॉपकडे बघत विचारले.
"अजून बराच वेळ संपणार नाही" तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.
"मी पाणी प्यायला आले होते.." हातातली पाण्याने भरलेले बाटली दाखवून तिने डेस्कवर ठेवली. तिचे ओठ किंचित थरथरले, त्याची नजर तिथेच स्थिरावली. त्याचा मनावरचा ताबा सुटत होता. तिच्या इतक्या जवळ असूनही लांब असण्याने त्याच्या सेल्फ कंट्रोलचा चुराडाच झाला होता. शेवटी खोल श्वास घेऊन तिने त्याच्या नजरेला नजर मिळवली. "सो वी डिड अ गुड जॉब."
" म्हणजे?" त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"म्हणजे परफेक्ट नवरा बायको असल्याची अॅक्टिंग."
तिला नक्की काय म्हणायचं आहे न उमजून त्याने फक्त मान हलवली. ती त्याच्या अजून जवळ फक्त दोन इंचावर आली. "मला काहीतरी ट्राय करायचं आहे. प्लीज असाच थांब.." तिचे शब्द त्याच्या ओठांवर फुंकर घालत होते. खिशातले त्याचे हात थरथरले. त्याने हात बाहेर काढून डेस्कचा काठ धरून ठेवला. तिने खालचा ओठ चावला आणि पुढे झुकली. "मी जस्ट.." ती पुढे काही बोलण्यापूर्वी त्याने त्यांच्यातले अंतर संपवून टाकले. त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात हलकेच किस करून ती मागे झाली.
तो चक्रावून बघत राहिला. पण तिचं जे काही चाललं होतं तो स्पेल त्याला ब्रेक करायचा नव्हता. तिने पुन्हा पाऊल पुढे टाकलं आणि आवंढा गिळत त्याच्या गालावर हात ठेवला.
"हे काय चाललंय नोरा?" त्याला आता अजिबात थांबवत नव्हतं. त्याच्याच कानांना त्याचा आवाज रफ वाटला. "प्लीज डोळे मीट, तू असं बघितल्यावर मी नर्व्हस होते. फक्त दोन सेकंद प्लीज.. " ती अलगद म्हणाली.
तिला उत्तर द्यायला त्याचे ओठ विलग होईतो तिचे ओठ तिथे येऊन पोचले होते. त्याने उत्तर देता देता डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. तिने डोळे आधीच मिटून घेतले होते. त्याच्या गालावरचा तिचा हात थरथरला आणि तिने चवडे उंचावून ओठ अजून खोलवर नेले. त्याने डोकं आणखी खाली झुकवलं आणि तिच्या नशेत डोळे बंद केले.
क्रमशः
नोराची साडी (ब्लाउज वेगळा आहे)
मंगळसूत्र (पण यात शिंपल्याच्या वाट्या आहेत)