पडद्याच्या फटीतून कोवळ्या उन्हाची तिरीप पलाशच्या डोळ्यांवर चमकल्यावर तो डोळे किलकिले करून कुशीवर वळला. शेजारी पाहिले तर बेड रिकामा होता. बाथरूमचे दार बंद होते. त्याने श्वास टाकत तिच्या बाजूच्या चुरगळलेल्या बेडशीटवरून हात फिरवला. त्याचा अजूनही कालच्या घटनांवर विश्वास बसत नव्हता आणि तो अजूनही आनंदात होता यावरही. तिने जे जे मागितलं ते सगळं त्याने तिला दिलं होतं. ही वॉन्टेड टू गो ऑन अँड ऑन. राउंड थ्री नंतर पहाटे कधीतरी त्यांना झोप लागली होती. नोरा वॉज अ फायर क्रॅकर! इट वॉज फायर, अंगातून ठिणग्या उडत होत्या. हवा तापली होती. तो प्रयत्न करूनही स्वतःला तिच्यापासून दूर करू शकला नव्हता.
कमॉन, डोन्ट बी सो एक्सायटेड नाऊ. धिस इज पॉइंटलेस. रात्र संपली, एक्सेप्शन क्लॉज संपला. बॅक टू स्क्वेअर वन! मग मी हे काय करतोय, प्रेमात वेड्या बिड्या माणसासारखा बेडशीट कुरवाळतो आहे! वेक अप पलाश, तुझं तिच्यावर प्रेम नाहीये, तसं प्रेम कुणावरच नाही आणि कधी करणारही नाही. लव्ह इज मेसी, कन्फ्युजिंग आणि मोस्ट ऑफ ऑल अनप्रेडीक्टबल. स्टॉप बीइंग ऍन इडियट आणि वाळूत किल्ले बांधणं बंद कर!
त्याच्या डोक्यात विचारांची रांग लागली, चिडचिड व्हायला लागली. आणि तो राग, हताशा चेहऱ्यावर दाखवूही शकत नव्हता.
तेवढ्यात नोरा अंगात त्याचा रोब आणि डोक्यावर टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर आली. "सो यू आर अप!" बेडच्या कडेला उभी राहून केस झटकून, पुसतापुसता ती म्हणाली. ऊफ! ऑरेंज ब्लॉसम आणि व्हनीलाचा एक ढग त्याच्या नाकापाशी विरला. तिच्या नितळ गळ्यावरून पाण्याचा एक थेंब खाली ओघळत कॉलर बोनवरून रोबमध्ये नाहीसा झाला.
शिट! त्याने पटकन दुसरी शीट कंबरेपर्यंत ओढून घेतली. डोन्ट बी सो ऑब्वीअस पलाश.. तिचं लक्ष नसू दे.
टू लेट. त्याची हालचाल तिच्या डोळ्यांनी टिपली.
"ओह यू आर रिअली अप!" ती ओठ दाबून हसत म्हणाली.
"इट्स नॉर्मल!" त्याने तिच्याकडे रोखून बघितले आणि बेडशीट लुंगीसारखी गुंडाळून तो बाथरूमकडे निघाला. तिच्या शेजारून जाताना रोबखाली दिसणाऱ्या तिच्या कातीव पोटऱ्या आणि नाजूक पावलांवरून लक्ष हटवताना त्याला मनाचा कण न कण निग्रह वापरावा लागला.
"लपवायची गरज नाही पलाश, मी ऑलरेडी सगळं बघितलंय!" अजूनही तिच्या चेहऱ्यावर हसू होतं.
"लपवत नाही, कव्हर अप करतोय. तुझ्यासाठी."
"माझ्यासाठी?" तिने भुवया उंचावल्या.
"म्हणजे तू न मिळू शकणाऱ्या गोष्टीसाठी जास्त एक्साइट होऊ नये म्हणून. डेझर्ट मेन्यूवर आहे पण तुला मिळणार नाही." तो जुना ऍटीट्यूड दाखवत म्हणाला.
"आय एम ओके विथ दॅट. मला काल भरपूर डेझर्ट मिळालंय. ती शुगर हाय बरेच दिवस पुरेल. थॅंक्यू!" ती हसतच उद्गारली.
"यू आर वेलकम!" तो बाथरूमच्या दारातून एअर इंडियाच्या महाराजासारखा नाटकीपणे कंबरेत वाकून म्हणाला.
आत जाऊन दार बंद केल्यावर थांबून त्याने खोल श्वास घेतला. स्वतःची मर्यादा आणि शहाणपण टिकवून फेज टू पार करणं त्याने विचार केल्यापेक्षा आता खूप कठीण दिसत होतं.
बाथरूमचं दार बंद होताच ती धपकन बेडवर बसली आणि एवढा वेळ रोखून धरलेला श्वास सोडला. सकाळी उठल्यावर शेजारी शांत झोपलेल्या पलाशकडे स्वप्नाळू डोळ्यांनी बघितल्यापासून ती स्वतःला सगळं खोटं सांगत होती. जसं त्याच्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके वाढत नाहीत, कालची रात्र तिच्या आयुष्यातली सगळ्यात हॉट, सगळ्यात रोमँटिक रात्र नव्हती, पुन्हा त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टी दोन दिवसांपूर्वी होत्या तश्याच होतील, एका रात्रीने तिच्यात काही फरक पडला नाही वगैरे वगैरे.
पण तिच्याकडे काही पर्यायच नव्हता. त्यांनी एकत्र मिळून एकच गोष्ट ठरवली होती आणि त्याने तिचे सगळे डिमांडस् पूर्ण केले होते, तिच्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता. इट वॉज अमेझिंग, शी वॉज सो हॅपी! आता पुन्हा त्यांच्यातले नियम ती तोडू शकत नव्हती. नोरा, डोन्ट कन्फ्युज सेक्स विथ लव्ह! त्याने आधीच स्पष्ट सांगितले होते. तिने पुन्हा विचार बदलला तर त्याला अजिबात आवडणार नाही.
पण तसं काही नव्हतंच, ती त्याच्या प्रेमात वगैरे नव्हती. ती स्वतःलाच सांगत होती. सकाळी जाग येताच त्याला झोपलेला बघणं - देखणा, उघडा, सेक्सी, केस विस्कटलेला, उशीवर पालथा पडून गालावर लांब पापण्या टेकलेला आणि त्याच्याबद्दल प्रेम न वाटणं कठीण होतं. त्याच्या जवळ गेलं तर अजूनही त्याचे हात उबदार असतील. त्याच्या कुशीत घुसून त्याच्या उष्णतेत विरघळून जायला तिला आवडलं असतं. त्याने तिच्या पाठीवर हात टाकून जवळ ओढलं असतं का? पण त्याला नको असेल तर.. त्याने तिला लांब ढकललं तर..
तिला नकार पचवता आला नसता. सो त्याच्या जवळ जाणं टाळून ती बाथरूममध्ये घुसली होती. थंड शॉवरखाली उभी राहून तिने अंगावर लूफा घासून घासून तिच्या त्वचेवरील त्याच्या सगळ्या आठवणी धुवून टाकल्या होत्या. तिच्या सगळ्या भावना आणि हे नातं खरं असल्यासारखं वाटणं पुसून टाकलं होतं.
बाहेर आल्यावर ती त्याला हवं तसं वागली होती. जसं काही कालची रात्र फक्त एकत्र केलेली मजा होती. त्याला बाकी काही अर्थ नव्हता. ती मन घट्ट करून नेहमीसारखी हसली, त्याला चिडवलं, त्याचं चिडवणं ऐकलं, त्याला ती लुंगी गुंडाळून जाताना बघून ती खरंच हसली. खरं तर त्याची ती शीट ओढून, स्वतःचा रोब फेकून, त्याच्याबरोबर ब्लॅंकेटमध्ये घुसायची तिला किती इच्छा होती ते तिने चेहऱ्यावर अजिबात जाणवू दिले नव्हते.
पण नाही, हे फक्त हार्मोन्स बोलत आहेत. फक्त हॅपी हार्मोन्स. ऑर्गॅजमनंतर असं प्रेम वाटणं, पार्टनरसाठी मन हळवं होणं नॅचरल आहे. कालच्या सगळ्या हार्मोन्सनी अजूनही सिस्टम ओव्हरलोड आहे. ती फॅन फास्ट करून खाली उभी राहिली.
---
तो जिना उतरून खाली गेला तेव्हा ती नेहमीची ब्लॅक जीन्स आणि शेवाळी सिल्की शर्ट घालून तयार होती. गॅसवर चहा उकळत होता आणि ती डायनिंग टेबलवर स्वतःची नखं न्याहाळत बसली होती. त्याने चहा गाळला आणि दोन कप आणून तिच्या समोर बसला. थँक्स म्हणून कप उचलून ती त्याच्याकडे बघून हसली. तिने बटर लावून पुढ्यात ठेवलेल्या ब्रेडपैकी एक उचलून त्याने एक घास घेतला.
"अम्म नोरा, सॉरी मी काल प्रोटेक्शन विसरलो.. इट वॉज ऑल सो सडन..
"डोन्ट वरी. आय एम ऑन अ पिल. टू रेग्युलेट माय पिरियड्स." ती चहा पिता पिता त्याचं बोलणं तोडत म्हणाली.
"हां ओके.. मी घाबरलो होतो की तीनपैकी एकदा तरी मी नक्की टार्गेट हिट केलं असणार" तो गालात हसत म्हणाला.
तिच्या तोंडातून चहा फुर्र उडाला. "ते काय डार्ट फेकल्यासारखं नाहीये! तुझ्या स्किलवर काहीच डिपेंड नसतं" ती हसता हसता म्हणाली.
"बट यू वर इम्प्रेस्ड विथ माय स्किल लेव्हल!" तो तिच्यावरून नजर न हटवता म्हणाला.
"ओके, तुझी स्किल्स, तुझा स्टॅमिना आणि परफॉर्मन्स टॉप नॉच होता." ती किंचित लाजून नजर खाली झुकवत म्हणाली.
त्याच्या चेहऱ्यावरचं हसू अजून मोठं झालं. "थॅंक्यू! आय परफॉर्म वेल अंडर प्रेशर. डेडलाईन क्रॉस करायची नव्हती."
हेह! तिने किंचित नाक फुगवलं.
"कमॉन! माझी घडयाळाशी स्पर्धा होती. मला सारखं वाटत होतं तू आता म्हणशील टाइम्स अप! एक्सेप्शन क्लॉज संपला आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा सुरू. म्हणून मी तुला शक्य तेवढं माझ्यात साठवून घेत होतो."
"अँड डिड यू?" तिने मिश्किलपणे विचारले.
"काय? मला हवी तितकी तू मिळालीस का?" त्याचे चमकते डोळे तिच्या डोळ्यांत मिसळले होते. "ऑनेस्टली, नो!"
तिच्या पोटात एकदम फुलपाखरांचा थवा उडाला.
क्रमशः