रूपेरी वाळूत - ३३

तो संध्याकाळी जरा लवकर घरी आला तेव्हा ती नव्या, मोठ्या चार फुटी टॅन्कमध्ये माश्यासाठी झाडं, गवत, दगड, गुहा वगैरे तयार करत होती. बेल वाजताच खाली जाऊन दार उघडलं तेव्हा त्याने समोर धरलेला गुलाबी जरबेरांचा गुच्छ तिच्या हातात दिला आणि तिच्या खुषीत आणखी भर टाकत दुसऱ्या हातातलं पार्सल उचलून दाखवलं. चायनीज! येय! म्हणत तिने फुलं नाकापाशी नेताच आत येत त्याने तिच्या गालावर ओठ टेकले. तिने डोळे मिटून खोलवर त्याचा सुगंध वेचून घेतला.

"पलाश डोन्ट ट्राय टू चार्म मी, ओके?" फुलं कोपऱ्यातल्या उंच फुलदाणीत ठेवत ती हसत म्हणाली.

"हाहा! अजून गरज आहे का?" तो खांदे उडवत जिन्यातून वर जाताजाता म्हणाला.

तिने त्याला तोंड वाकडं करून दाखवलं. डायनिंग टेबलवर त्याच्यासमोर बसून शांततेत त्याच्याकडे बघून जेवणं तिला शक्य नव्हतं. तिने रिमोट शोधून टीव्ही ऑन केला. नेटफ्लिक्सवर किम्स कन्वीनिअन्स सुरू केली. टेबलवर सूप बोल्समध्ये गरमागरम स्वीट कॉर्न सूप ओतलं आणि दोन प्लेटमध्ये चिकन चिली, चावमेन आणि मंचुरीअन राईस थोडा थोडा वाढून त्याची वाट बघत बसली. आज तिने मुद्दाम अतिशय गबाळा लांब, छातीवर लोळणारा गारफील्ड आणि त्याखाली Enemy of the state लिहिलेला पांढरा टीशर्ट आणि काळ्या थ्री फोर्थ स्लॅक्स घातल्या होत्या. तो नेहमीसारखा टीशर्ट - शॉर्ट्स घालून तिच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसला तेव्हा तिने त्याच्याकडे बघणे टाळले.

"किम्स? गुड!" म्हणत टिव्हीकडे पहात त्याने सूप बोल उचलला.

"पलाश, वीकेंडला मला पणजीत एक सेमिनार अटेंड करायचाय. उद्या दुपारी मी निघेन. सावंतवाडीला तालुक्यातले अजून तीन चार डॉक्टर्स येतील आणि तिथून आम्ही तीन वाजता इनोव्हा बुक केलीय, तिने जाऊ. सोमवारी परत."

"हम्म, म्हणजे आपल्याला साधारण एक - दीडला निघावं लागेल. मी तुला सावंतवाडीला सोडणार आहे." तो चमचा बोलमध्ये ठेवत म्हणाला. तिने नको म्हणायला तोंड उघडताच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. "नो आर्ग्युमेंट्स." तिने गुपचूप मान हलवली. जेवून, भांडीकुंडी आवरल्यावर परत ते सोफ्यावर येऊन बसले. टेबलवर पाय लांबवून त्याने सोफ्याच्या पाठीवर हात टाकला. तिने त्याच्यापासून किंचित लांब होत त्यांच्यातील अंतर वाढवलं आणि टिव्हीकडे लक्ष दिलं.

पुढचे दोन हलकेफुलके एपिसोडस् बघताना हवेतील कमी झालेलं टेन्शन टीव्ही बंद करताच परत आलं. दिवे बंद करून अंधारात जिना चढताना पलाश तिच्या मागे होता. तिला वाटत होतं की तो मागून हळूच तिच्या कंबरेवर हात टाकून तिला मिठीत घेईल, कानात तिचं नाव कुजबुजून म्हणेल की आज त्याला एकट्याला झोप येणार नाही. ती वर पोहोचली तरी तसं काहीच झालं नाही. तिने सरळ पुढे होऊन तिच्या खोलीचं दार उघडलं. "गुड नाईट!" मागून पलाशचा आवाज आला. "नाईट!" म्हणून ती आत जाऊन बंद दाराला टेकली. समोरचं दार बंद झाल्याचा आवाज आल्यावर तिने सुस्कारा सोडला.

बहुतेक आज तो तिची परीक्षा बघणार नाही.

ह्याने खरं तर तिला बरं वाटायला हवं होतं..

पलाशने बाथरूममध्ये जाऊन जोरजोराने ब्रश करून तोंडावर पाणी मारलं. टीशर्ट काढून बीन बॅगवर फेकला आणि ब्लॅंकेट ओढून रागाने काळोखात वर फिरणाऱ्या फॅनकडे पहात आडवा झाला.

'आय वॉन्ट हर, आय नीड हर.. आणि ती फक्त भिंतीपलिकडे आहे.' काय करावं त्याला कळत नव्हतं. ती काय विचार करत असेल? जाऊन दारावर नॉक केलं तर ती कशी रिऍक्ट करेल? आणि हे करण्याचं कारण काय सांगणार पलाश.. कुठल्याही खोट्या गोष्टीने हे लपणार नाही. तिच्या रूममध्ये गेलं तर तिला दोनच गोष्टी वाटतील, तो फक्त सेक्सचा विचार करतोय किंवा तो तिच्या प्रेमात पडतोय.. दोन्हीमध्ये जास्त वाईट काय हे त्याला ठरवताही येत नव्हतं. स्वतःवर चिडून पालथं पडत त्याने तोंड उशीत घुसवलं आणि उशीवरच दोन तीन गुद्दे मारले. परत तिच्याजवळ जायचं असेल तर काहीतरी सॉलिड रिझन हवा. त्याला काहीतरी सुचलं आणि तो पटकन उठला.

तिच्या दाराबाहेर जाऊन त्याने नॉक केलं. दार लोटलेलंच होतं. तिने ये म्हटल्यावर तो आत शिरला. तिने उठून बसत शेजारचा नाईट लॅम्प लावला. "काय?" तिची नजर त्याच्या उघड्या छातीकडे गेली.

"मी विचार करत होतो.. "

"कसला?"

त्याने केसांतून हात फिरवला. " आपल्यातल्या केमिस्ट्रीबद्दल."

"म्हणजे?" तिने त्याच्या डोळ्यात नजर मिसळली.

"म्हणजे काल इतकं जवळ येऊन आपण आता असं विचित्र टेन्शन, डिस्टन्स ठेवायला लागलो तर लोकांच्या लक्षात येईल. गणपतीच्या वेळी तर आपल्याला पाच दिवस घरी जाऊन रहावं लागेल, तेव्हा काही वेगळं नको वाटायला." तो जाऊन बेडच्या कडेवर बसत म्हणाला.

"पण.. आपल्या रूलचं काय?" तिने त्याच्या बेडवर टेकलेल्या हातावर फुललेल्या शिरांकडे डोळे नेत विचारलं.

"आय थिंक फेज टू पार करायला जास्त केमिस्ट्री हवी आणि ते आपल्यात असं टेन्शन ठेवून कठीण आहे."

ती हसली, "म्हणून तू आत्ता इथे आलास, केमिस्ट्री वाढवायला?!"

"ऑफ कोर्स! अजून काय?"

"माहीत नाही. तू सांग." तिने हातांची घडी घालून त्याच्या नजरेला नजर मिळवली.

त्याला हरायचं नव्हतं पण तिथून निघूनही जायचं नव्हतं.

"हम्म.. मेबी अजून एखादं कारण असेल." तिचे हसरे डोळे बघून त्यांचा कॉन्फिडन्स थोडा वाढला आणि तो किस करायला तिच्याकडे झुकला. "आधी कारण.." दोन बोटं त्याच्या ओठांवर ठेवत ती म्हणाली.

जोरात श्वास सोडत तो मागे झाला. "फाईन!"
तिने भुवया उंचावल्या. "मेबी काल रात्री.. तुझ्याबरोबर.. आय हॅड अ गुड टाईम." तो किंचित हसला.

"अजून?"

"अजून.. आय कान्ट स्टॉप.."

"कारण?"

"कारण, इट फेल्ट गुड!"

"हुंह!" तिने खांदे उडवले. "मग तू तुझ्या खोलीत जाऊन एकट्याने फील गुड कर. माझी काय गरज आहे" ती ओठ चावत म्हणाली.

"फाईन. आय एन्जॉय मेकिंग यू फील गुड." तो कपाळावर आठ्या पडून म्हणाला.

"का? डू यू लाईक मी?" तिच्या टपोऱ्या ओठांवर पुन्हा नितळ हसू आलं होतं.

"गॉड डॅम इट नोरा! तू.." त्याने मुठी आवळल्या. "आय वॉन्ट यू. ओके? हेच ऐकायचं आहे ना? मी तुझं दार वाजवलं कारण मी एकटा झोपलो होतो आणि मला तुझ्याशिवाय रहावत नव्हतं. डोक्यातून तुला काढून टाकता येत नव्हतं. आता तुला वाटलं तर मला इथून हाकलून दे, पण असं माझ्याशी खेळणं बंद कर. सो! डू यू वॉन्ट मी ऑर नॉट?"  तो जोरजोरात श्वास घेत म्हणाला.

उत्तर देण्याऐवजी तिने त्याच्या दोन्ही गालांवर हात ठेवून, त्याचा चेहरा जवळ ओढून त्याच्या ओठांवर अटॅक केला. "येस, आय वॉन्ट यू" काही सेकंद श्वास घ्यायला थांबून त्याच्या ओठांवर फुंकर मारत ती कुजबुजली. "पण.. मला तुझ्याशी खेळायला आवडतं."

तिच्या पलीकडे एक पाय टाकत तो ब्लॅंकेटमध्ये घुसला. गुढगे टेकून बसत त्याने गादीवर तिची मनगटे धरून ठेवली आणि तिचे ओठ ताब्यात घेतले. " यू आर मेकिंग मी लूज माय माइंड!"

हसत तिने त्याच्या गळ्यापाशी तोंड लपवले आणि खोलवर श्वास घेतला. "गॉड... यू स्मेल गुड.."

"काय?" त्याने तोंड उचलून तिच्याकडे पाहिले.

"काही नाही. आय थिंक आपण कॉन्ट्रॅक्टचे काही क्लॉज म्युच्युअली बदलू शकतो."

त्याने खाली वाकून हसत तिच्या नाकाच्या शेंड्यावर ओठ टेकले. "गुड!"

रात्रभर तो तिच्या बेडवर होता आणि ह्यावेळी जाग आली तेव्हा ती त्याच्या कुशीत लपेटलेली होती. खिडकीच्या काचेवर बारीक पाऊस वाजत होता. त्याने तिच्या विस्कटलेल्या रेशमी केसांत तोंड खुपसून खोलवर श्वास घेतला आणि तिच्या डोक्यावर ओठ टेकले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle