"ऊंss कोण आसा काय दवाखान्यात?" पांदीतल्या गावकराच्या गडयाने रस्त्यात बैलगाडी थांबवून हाक मारली.
कीबोर्डवर पळणारी नोराची बोटं थांबली. ती पीसीसमोरून उठून दरवाज्यात आली.
"अरे डॉक्टरीण बाई! तुम्ही केंना आयलात? बरें मां?" तिला बघून गडी लगेच खाली उतरला आणि हौद्यातून एक भुरे, गुबगुबीत वासरू उचलून आत घेउन आला. अंगणात बांधल्यावर वासरू मान टाकून मलूल पडून राहिले. "होss " म्हणत तिने वासराचे निरीक्षण केले.
"रमेशss" तिने मोठ्याने हाक मारली तरी पडवीच्या सावलीत, बाकड्यावर डुलकी लागलेला रमेश ढिम्म हलला नाही.
"ऱ्हाव, हाव पळेंता.." म्हणत गडी पडवीत गेला आणि त्याने रमेशला धरून गदागदा हलवले.
"तेन्ना गोरो मरताहा, दृष्टावलो सो गमता. यौव म रें." "काय.. काय.." ओरडत तो उठून बसला. नोराला वासराशेजारी अंगणात उभी बघून, त्याने घडीची लोखंडी खुर्ची उघडून दिली.
"म्हैनो पुरो झालो नी? किवान?" वासराचा इन्फेक्शन झालेला पाय उचलून बघत त्याने विचारले. "क्षतां नाय.."
"अरे! नीट खुरात पळय. माका हेंना पळयता." खुर्चीतून नोराने म्हटल्यावर त्याला खुरातली गॅप दिसली. जखम स्वच्छ करून,आतल्या किड्यांना औषध घालून मारलं. एक सुती चिंधी अँटिसेप्टिक औषधात भिजवून त्या छिद्रात सारली.
"सामको पॅक कर, गॅप नुको" नोराने सांगितल्यावर त्याने सुरळी अजून आत दाबली. "आता तो आपलो येल्लो बाटलेचो स्प्रे हाड."
"ह्येका कित्या राखलं? कंडम भुरगो, पिसो जाणा." गडी रमेशला आत जाताना बघून म्हणाला.
"दवाखान्यात सोरों लावणा नाय आणि सांगकामी गोम्या म्हणान चलता." ती म्हणाली. "हां! हो तुजो स्प्रे. दिवसातून दोन वेळा अप्लाय करपाक जाय, मागीर चिलट लागणा नाय आणि घाय ड्राय जातलो."
"फी किती?"
"अडीचशे. मेडिसीनां दोनशे आणि फी पन्नास."
पैसे देऊन फुरफुरणाऱ्या वासराला उचलून तो घेऊन गेला. ती उठून पुन्हा पीसीसमोर बसली. खुर्ची मिटून मागोमाग रमेश आला. "मॅडम, चाय जाय?" खुर्ची भिंतीला टेकून ठेवताना त्याने विचारले. "मावशींची चाय माका नुको" तिने टेबलावरच्या थर्मासकडे इशारा केला. "तू डब्बल चढव नी जागो ऱ्हव!" तो जरा शरमून हसला आणि बाहेर गेला.
तिने हसून पुन्हा स्क्रीनकडे नजर वळवली.
---
हाऊसकीपिंगवाले रोजच्याप्रमाणे ते दोघे बाहेर असताना येऊन पूर्ण घर स्वच्छ करून गेले होते. रोज तिच्यासाठी ठराविक यादीप्रमाणे आजाऱ्यांचा स्वयंपाक करणाऱ्या कूकला आज सुट्टी होती. जेवणखाण होऊन नोरानेच सिलेक्ट केलेला 'मार्ली अँड मी' बघता बघता तिने त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन डुलकी काढली.
"हेय! नॉट फेअर, मला तुझ्या आवडीची मुव्ही बघायला लागली आणि स्वतः झोपलीस!" एन्ड क्रेडिट्स आल्यावर त्याने खांद्याला हलवून तिला जागं केलं.
"सॉरी! मी पेशंट आहे, यू नो!" ती ओठ चावून हसत उद्गारली.
"हम्म.. चला झोपायला जाऊया.." दोन्ही हात डोक्यावर ताणून आळस देत तो म्हणाला.
"इतका बोर झालास?"
"बोर नाही, मुव्ही छान होती. मी दमलोय."
ती रेलिंगला धरून हळूहळू जिना चढून वर गेली, तो मागे होताच. वर तिच्या खोलीच्या दारात पोचल्यावर ती भिंतीला टेकून जरा घुटमळली.
"आजचा दिवस छान होता. स्पेशली तुझ्याबरोबर कूकिंग करायला मजा आली."
"सोबत? कूकिंग मी एकट्याने केलंय! तू फक्त ओट्यावर बसून मी चिरलेल्या गाजर, काकडी, उकडलेले बटाटे आणि अंड्यांवर डल्ला मारलास!" त्याने तिच्या स्टाईलने नाक उडवलं.
"पण ते तूच मला भरवत होतास!"
"त्याहून जास्त तू चोरून खाल्लंस. एनीवे, खाते आहेस तर पोटात जाऊदे म्हणून मी गप्प बसलो." तो हसला. "एकतर मी तुला चेंज म्हणून मऊ, हेल्दी रेसिपी शोधून शोधून कोरियन डिश बनवल्या.."
"हाहा, ऑम्लेट रोल्स ठीक आहेत पण बाकी नावं तर काय भारी होती बिबीम बाप, गरम जिम" ती खो खो हसत सुटली.
"गेराम! गेराम जिम!" तो हसता हसता म्हणाला. "श्श, जास्त हसायचं नाहीये."
"हे आपण नेहमी करू शकतो, म्हणजे वीकली एकदा वगैरे. कपल गोल्स, यू नो! " ती शांत होत म्हणाली.
"काय? मी कूकिंग करणार आणि साहित्य तू चोरून खाणार?
"पण मी माझ्यातले खारे शेंगदाणे शेअर केले की नाही!"
"हम्म.."
"पण चव खरंच मस्त होती. थँक यू."
"एनी टाईम.." त्याची नजर ती चावत असलेल्या ओठांवर स्थिरावली.
शांततेत काही क्षण ते एकमेकांकडे बघत राहिले. "मला माहिती आहे, मी झोपल्यावर तू उठून तुझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपतोस." ती त्याच्या डोळ्यात खोलवर बुडून म्हणाली.
"हम्म. कारण तुला माहिती आहे."
"गुड नाईट" म्हणून तिने मोजून तीन सेकंद त्याच्या गालावर ओठ टेकले आणि आत जायला वळली. त्याने तिचा हात धरून अलगद पुन्हा स्वतःकडे वळवले. तिचे गाल ओंजळीत धरून त्याने कपाळाला कपाळ टेकवले. "कसला विचार चाललाय?"
तिने लांब श्वास सोडला. "आय रिअली वॉन्ट यू.."
त्याच्या भुवया वर गेल्या, तिने अचानक कबूल केल्यामुळे पोटात खड्डा पडला.
"आपलं लग्न तर झालं पण आपण ना प्रॉपर डेटवर गेलोय, ना आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकत, सगळं बॅकवर्ड सुरू आहे आणि हे सगळं मला जाम फ्रस्ट्रेट होतंय!" ती पुढे बोलत राहिली.
"सो, यू वॉन्ट टू हॅव सेक्स विथ मी?" त्याची रेकॉर्ड अजून तिथेच अडकली होती. सो ह्या बाबतीत ते सेम पेजवर होते तर. त्याने नकळत तिच्याकडे अजून एक पाऊल टाकले. तिची पाठ भिंतीला टेकली.
"रिअली, रिअली बॅड!" ऐकून त्याच्या छातीतली धडधड वाढली. त्याने डोकं झुकवून ओठ तिच्या कानापाशी नेले. "टेल मी, हाऊ बॅड.." तो कुजबुजला.
ती त्याच्या ओठांपासून लांब झाली पण तिच्या हातावर आलेला काटा त्याला दिसलाच. त्याला कॉपी करत तिने हात त्याच्या गळ्यात टाकले आणि कानापाशी जात कुजबुजली. " मला शब्दात सांगता येणार नाही, पलाश."
त्याला अचानक जाणवलं की एवढ्या मोठ्या घरात ते दोघेच असले तरी ते जागा पुरत नसल्यासारखे वागत होते. एकमेकांच्या कानात कुजबुजत होते जसं काही त्यांचं म्हणणं कुणीच ऐकू नये..
त्यांच्या इच्छा कुणालाच कळू नयेत. फक्त दोघंच, त्यांना एकमेकांना कुणाशीच शेअर करायचं नव्हतं.
त्यांना फक्त एवढंच हवं होतं.
नोरा आणि पलाश.
त्याचे तिच्या कंबरेभोवतीचे हात अजून घट्ट झाले. ती डोकं भिंतीला टेकून अजूनही कानात बोलत होती. "पलाश, आपण कुठे जात असताना तू माझ्या कंबरेवर किंवा खांद्यावर हात ठेवला तर माझ्या अंगावर गूजबम्पस् येतात. तुझ्या नुसत्या स्पर्शाने." तिच्या पाठीवर विसवलेल्या त्याच्या हाताची मूठ वळली आणि मुठीत तिचा लूज टीशर्ट गोळा झाला. तिचे हात मानेवरून त्याच्या केसात शिरले. किस करता करता दार उघडून तो तिला आत घेऊन गेला. शेवटी तो श्वास घ्यायला थांबल्यावर तिने छातीवर डोकं टेकलं.
"सर्जरीपासून किती महिने?"
"हुंह?" तिने मान उचलून वर पाहिलं.
"किती महिने?" त्याचा आवाज घोगरट आला.
"तीन. अजून झाले नाहीत." तीने श्वास टाकला.
"सो, यू नो." बेडवर आडवं होऊन तिला कुशीत घेत तो बोलत राहिला. "मी तुझ्याजवळ आहे, कायम. अजून फक्त थोडाच वेळ नोरा.."
"प्लीज.."
"नाही"
"पलाश!"
"नाही."
तिच्या केसांवर हनुवटी टेकून त्याने तिचा सुगंध नाकात भरून घेतला आणि स्वतःला कसंबसं शांत केलं.
क्रमशः
मालवणी/कोंकणीसाठी नेहमीप्रमाणे जाईजुईची मदत झालेली आहे, थँक्स जाजू :)
पलाशने रांधलेले कोरियन पदार्थ:
१. Bibimbap (Mixed Veggies With Rice)
२. Geram Jim (Fluffy Egg Stew)
३. Gyeranmari (Korean Omelette Rolls)