रमेशला औषधांची लिस्ट देऊन तिने तालुक्याच्या दवाखान्यात पाठवले. रिकामं बसण्यापेक्षा कपाटातून इसेंशीअल्स ऑफ व्हेटर्नरी सर्जरीचा ठोकळा काढला. बराच वेळ वाचून जांभई देताना गेटबाहेर थार येऊन थांबली आणि तिचे डोळे चमकले.
तिने घड्याळाकडे नजर टाकली तर फक्त साडेबारा वाजले होते. ती उठेपर्यंत पलाश लांब ढांगा टाकत दारात पोचला. हातानेच तिला बस म्हणून इशारा करत त्याने आत येऊन हातातली पिशवी टेबलवर ठेवली आणि सनग्लासेस काढून जीन्सच्या खिश्याला लटकवले.
"आत्ता? पुन्हा कोणी पेशंट आणलाय का?" तिने हसत विचारले.
"तू विसरली असशील, सध्या तूच पेशंट आहेस. काय चाललंय? रमेश कुठाय, का आज पण दांडीयात्रा? "
"हाहा, नाही त्याला मी औषधं आणायला पाठवलाय."
"कूल!" त्याने तिच्या खुर्चीमागे जाऊन गळ्यात हात टाकून खांद्यावर हनुवटी टेकली.
"पलाश! रस्त्यावरून दिसतं इथलं."
"पण बघायला माणसं कुठे आहेत!" तो डोळा मारत म्हणाला.
"मी आलो, कारण एक गुड न्यूज आहे." तिच्या गालावर अलगद ओठ टेकून तो समोरच्या खुर्चीत जाऊन बसला.
"सोss द गुड न्यूज इज आपली फेज टू सक्सेसफुल झाली!" टेबलवर दोन्ही हात ठेवून तिच्याकडे झुकून तो म्हणाला.
"म्हणजे?" तिने न कळून विचारले.
"म्हणजे आपण परत आल्यावर थोड्या दिवसात अप्पानी वकीलाकडे जाऊन माझ्या नावाने गिफ्ट डीड केलं. काल ते रजिस्टर झालं. आता ब्लू लगून ऑफिशिअली माझं आहे!" तो उत्साहात बोलत होता.
"कूल! काँग्रॅटस!!" तिने त्याचा हात धरून जोरजोरात हलवला.
"तुझी सर्जरी आणि नंतर मी तुझी जेवढी काळजी घेतोय त्याने अप्पा इम्प्रेस झाले बहुतेक. हुश्श, आयम सो हॅपी!"
तिला दोन आठवड्यापूर्वी झालेला फायनल MRI आठवला. पहिल्याइतकाच ट्रॉमॅटिक अनुभव असला तरी पलाशने तिची खरंच खूप काळजी घेतली होती.
"हे, कुठे हरवलीस?" ती त्याच्याकडे बघून हसली.
"विकेंडमुळे अजिबात वेळ नाहीये म्हणून मी हे सगळं घेऊन आलो. लंच तरी एकत्र करू!" बोलता बोलता त्याने आणलेले डबे टेबलवर पेपर पसरून उघडले. "बटर चिकन आणि चपात्या. मी आधीच दोन पोर्शन करून आणलेत, प्लेट वगैरे भानगड नको." दोन काचेच्या डब्यात बटर चिकन, पोळ्या आणि लहान डब्यात रायता, कांदा लिंबू वगैरे होते.
"मी डब्यात कर्ड राईस आणला होता! " तिने कपाळावर हात मारला. "रमेश जेवला नसेल तर त्याला देईन नंतर."
"कशाला? बायकोच्या हातचा आहे ना, मी संपवेन तो. हे जेवण तसंही कमीच आहे माझ्यासाठी." तो लगेच म्हणाला.
तिने गालात हसत मान डोलावली.
तिची बडबड ऐकत मध्येच त्याने काहीतरी जोक्स करताना, जेवण कधी झालं त्यांना कळलंही नाही. हात धुवून तो शेवटी निघाल्यावर तिने त्याला मिठी मारली आणि गाडी रस्त्यावरून निघेपर्यंत दारात त्याला बघत उभी राहिली.
---
रात्री जेवून वाट बघत सोफ्यावर पडल्या पडल्या तिला झोप लागली. पाखरांच्या किलबिलाटाने जाग आली तेव्हा ती पलाशच्या मोठ्या बेडमध्ये होती. बाहेर अजूनही उजाडलं नव्हतं. खिडकीच्या काचेजवळ दोन रातकिडे हिरवट प्रकाशाचे ठिपके नाचवत उडत होते. पलाश तिच्या पाठीला चिकटून, पोटावर त्याचा जड हात टाकून झोपला होता. हुंह, लिटल स्पून इन अ लार्ज स्पून म्हणत ती हसली. त्याला जागं न करता उठण्यासाठी तिने जराशी हालचाल केली. त्याने हात पुढे करून तिला अजूनच जवळ ओढून घेतली.
"पलाश?" ती खांद्यावरून मागे बघत पुटपुटली. त्याने तिचा लूज स्वेटर घसरलेल्या उघड्या खांद्यावर ओठ टेकवले. ओह, तो आधीच जागा आहे म्हणत तिने पाठीवर वळायला बघितलं पण त्याच्या घट्ट मिठीतुन तेही शक्य नव्हतं. ती कशीबशी अर्धवट वळली. "काय झालं?" तिने झोपाळू आवाजात विचारलं. रस्त्यावरच्या दिव्याची बारीक तिरीप त्याच्या चेहऱ्यावर पडली होती. ती सोडता खोलीत अंधार होता. "झोप पुन्हा.." तो कुजबुजला. तिचा हात धरून त्याने त्याची उबदार बोटं तिच्या बोटात गुंफली.
"सांग ना.." तिने त्याची बोटं घट्ट धरली. "तू फक्त माझा हात धरून ठेवायला उठला नाहीस."
त्याने श्वास सोडला. "मी तुझ्या डॉक्टरांशी बोललो."
ती वळून त्याच्या जवळ सरकली. "कधी?"
"काल रात्री. जेवल्यावर मी त्यांना पर्सनल नंबरवर कॉल केला.
"मग?" तो थांबल्यावर तिने काळजीने विचारले. हल्ली तिला डॉक्टर शब्दच आवडेनासा झाला होता.
"त्यांनी लास्ट MRI आणि बाकी टेस्टचे रिपोर्ट बघून त्यांचा ओपिनियन मेल केला होता. त्यांच्या मते तू आता पूर्ण बरी झालीस. मेम्ब्रेनमध्ये टेअरचं नामोनिशाण नाहीये."
तिने उशीत डोकं रुतवून मोठा श्वास सोडला. छातीवरून मणामणाचं ओझं उचलल्यासारखं हलकं वाटलं.
"पण अजूनही तुला काळजी घ्यायला हवी, लक्षात आहे ना?" त्याने हळूच विचारलं.
"ऑफ कोर्स." परत कधीही लीक उद्भवू शकते हे डॉक्टरांचे शब्द तिच्या डोक्यात कोरले गेले होते. डोक्यावर कन्टीन्युअस प्रेशर नको आणि डोक्याला धक्का बसू न देणे हे तिला आयुष्यभर पाळावे लागणार होते.
डोळे उघडून तिने पलाशला मोठ्ठं स्माईल दिलं. "आय नो! पण तरीही मी खूप खूष आहे." पण पलाश इतका खूष दिसत नव्हता, काहीतरी विचारात पडलेला वाटत होता. "सगळं ठीक आहे ना? ही आठी का आहे इथे?" तिने त्याच्या हातातून हात सोडवून भुवयांमध्ये स्पर्श करत विचारले.
तिचा हात धरून त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकल्यावर तिचे डोळे आपसूक बंद झाले तरी बाकी शरीर जागं झालं. "पलाश!" ती पुटपुटली.
"मी आपल्याला सेक्ससाठी क्लिअर केलंय का विचारलं."
तिचं तोंड बंद झालं. हृदयाचे ठोके वाढले आणि खोलीत अचानक गरम व्हायला लागलं.
"मग?" तिने आवंढा गिळला.
त्याने तिचा हात छातीशी घट्ट धरून तिच्या डोळ्यात पाहिलं. "ते म्हणाले.. आपण नीट काळजी घेतली तर इट्स ओके! बट वी हॅव टू टेक इट स्लो."
हां! तिच्या तोंडून इतकंच निघालं. जीनियस नोरा! तिने मनातच कपाळावर हात मारला. ती पाठीवर सरळ झोपली.
"तू आधी का नाही सांगितलं?"
"मी आलो तेव्हा तू इतकी शांत झोपली होतीस की तुला उठवावंसं नाही वाटलं. आत्ताही सांगणार नव्हतो, मला वाटतं अजून शेवटचे दहा दिवस उरलेत तेवढं थांबू." त्याच्या उष्ण श्वास तिच्या गळ्यापाशी जाणवला.
"अम्म.." तिला बोलायला सुचत नव्हतं.
"तुला काय वाटतं?" कानापाशी तो सेक्सी घोगऱ्या आवाजात कुजबुजला. तिच्या हातावरचे सगळे केस उभे राहिले. "मला वाटलं तू वाट बघत होतीस. तुला हे हवं होतं ना?"
ती ओठ कुरतडत राहिली. तिला आजूबाजूचे सगळे बारीक बारीक आवाज जाणवत होते. त्याचा संथ, उष्ण श्वास तिच्या सगळ्या जाणिवांना गुरफटून टाकत होता.
"आय वॉन्ट टू.." ती त्याला ऐकू जाईल न जाईल अश्या आवाजात पुटपुटली.
बराच वेळाच्या शांततेनंतर त्याचा हळूच आवाज आला. "इट्स ओके नोरा, झोप आता."
तिने डोळे घट्ट मिटून प्रयत्न केला.
---
रविवारची सुरुवात इतक्या मस्त बातमीने झाल्यावर तिने नाचतच मुद्दाम पलाशला आवडतात तसे शेंगदाणे आणि भरपूर कोथिंबीर, खोबरं घालून पोहे केले. तो नाश्ता करून घाईघाईत ब्लू लगूनला गेल्यावर तिची आवडती प्लेलिस्ट लावून खूप वेळ टबमध्ये पडून राहिली. आंघोळ झाल्यावर मजा म्हणून इव्हाने गिफ्ट दिलेले टीनी टायनी कपडे घातले. लेट्स सी यू पलाश! म्हणून ती हसली. वरून सिल्क रोब घालून कंबरेपाशी पट्टा आवळला आणि खाली उतरली.
आज उत्साह ओसंडून वहात असल्यामुळे तिने चॉकलेट केकचा घाट घातला. सेलफोन स्पीकर्सना जोडला आणि स्वयंपाकघरभर उंडारत साहित्य जमवायला घेतले. बटर आणि क्रीम चीज व्यवस्थित घुसळून झाल्यावर त्यात पिठी साखर आणि कोको पावडर घालून बीटर पुन्हा सुरू केला. स्टेप बाय स्टेप शेवटी एकदाचं बॅटर भांड्यात ओतून अव्हनमध्ये टाकलं आणि सुरू असलेल्या मिस्टरी ऑफ लव्हच्या सुरात सूर मिसळत ती डायनिंग टेबलापाशी जाऊन बसली.
फील माय फीट अबव्ह द ग्राउंड.. गातागाता अचानक गाणं थांबून फोन खणाणला.
क्रमशः