रूपेरी वाळूत - ४६ (the end)

एक दिवस जेव्हा ते परत आलेले दिसले तेव्हा मी पळतच वरच्या मजल्यावर गेलो. बेडरूममध्ये मेहेरला सलाईन आणि ऑक्सिजन मास्क लावून झोपवलं होतं. डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स होती, तिच्यात बोलायचीही ताकद नव्हती. मागचा आठवडाभर ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. नंतर कळलं की तिच्या हार्टमध्ये जन्मतः डिफेक्ट होता. तिची एक वर्षाची असताना सर्जरीही झाली होती. तेव्हा ती पूर्ण बरी झाली पण इतक्या वर्षानंतर तिला लंग इन्फेक्शन झालं.

मी आजारपणातही कायम तिच्या शेजारी होतो. तिला धीर देत होतो, मदत करत होतो पण ते इन्फेक्शन वाढतच गेलं आणि ती वाचू शकली नाही... मी तिला काहीतरी वाचून दाखवत असतानाच तिने शेवटचे डोळे मिटले. ती गेल्यावर महीनाभरातच तिचे पेरेंट्स तो फ्लॅट बंद करून दुसरीकडे राहायला गेले. मेहेर, तिच्या आठवणी, तिचं घर, त्यात आम्ही एकत्र घालवलेले क्षण सगळं फक्त एका महिन्यात पुसलं गेलं. नाहीसं झालं होतं. इट रिअली हर्ट्.. मेहेर गेल्यावर माझं सगळं जग उलटंपालटं झालं आणि मी एकटाच लटकून राहिलो. न कोसळण्याचा प्रयत्न करत." लाटांकडे बघता बघता त्याच्याही डोळ्यात पाणी होतं. नोराला तिच्या आजारपणात तो किती घाबरला होता आणि तिला किती जपत होता ते आठवलं.

"मी बराच काळ डिप्रेशनमध्ये होतो. देवाला, नशिबाला बोल लावत होतो. जगण्यावरचा, नात्यांवरचा, सगळ्यातला विश्वासच उडून गेला होता. कसाबसा बी कॉम झालो आणि वर्षभर काहीच केलं नाही. घरी अप्पाना वाटत होतं, मी मुंबईला जाऊन फुकट गेलो. शेवटी एक मित्र थेरपिस्टकडे घेऊन गेला. बऱ्याच सिटिंग्जनंतर मी जरा बरा वागायला लागलो. काकीबरोबर पटत नाही म्हणून आधीच मित्रांबरोबर फ्लॅट शेअर करून रहात होतो. मग कॅट क्लिअर केली, mba झालं. मनासारखा जॉब, पैसा सगळं मिळालं पण मला माणसांची, नात्यांची, जगण्याची कसलीच शाश्वती वाटत नव्हती आणि मी भरकटत राहिलो. त्याच काळात ती बेट वगैरे प्रकार झाले. कदाचित मी तुझ्यात, तुझ्या कोवळ्या निरागसपणात मेहेरला बघत होतो. आय वॉन्टेड टू सेव्ह हर!"

त्याच्याकडे बघता बघता नोराच्याही डोळ्यात पाणी आलं होतं.

"मला तेव्हा खरंच तुला तुझं आयुष्य मोकळेपणाने, केतनशिवाय जगता यावं एवढंच वाटत होतं. दोन लाख तुला जास्त वाटत असतील पण तेव्हा मला पैशाची काहीच किंमत नव्हती. तसेही मी पार्टीज आणि मौजमजेत पैसे उडवतच होतो. त्याला पैसे मिळाल्यावर तो तुझ्यापासून लांब राहील याची खात्री होती कारण त्याला तुझ्यात फार इंटरेस्ट नव्हताच. जे पैसे मिळाले ते त्याच्यासाठी बोनस होते. कारण ना तू त्याला पुन्हा भेटणार होतीस, ना मला ब्लॅकमेल करता येणार होतं. त्याच घटनेनंतर मी हळूहळू आयुष्यात सिरीयस झालो. मी कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो ह्या विचाराने मला माझी वर्थ थोडी का होईना कळायला लागली. एका अर्थी माझ्यातल्या ट्रांझीशनला तू जबाबदार ठरलीस. मनातला मेहेरचा हळवा कप्पा कायमचा बंद करून मी कामाला लागलो."

"तुला गावातच पोस्टिंग मिळणं आणि आपण पुन्हा भेटणं हा खरंच योगायोग होता. तुला गायीला सोडवताना बघितलं तेव्हाच तुझ्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं होतं. पुढे जसजसा तुला ओळखत गेलो, तुझा आत्मविश्वास, कामावरचा फोकस, खोडकरपणा, मोकळं मन सगळ्याच्याच प्रेमात पडत गेलो. फक्त तुलाही माझ्याबद्दल तसं वाटायची वाट बघत होतो. सगळं छान चाललेलं असताना अचानक तू आजारी पडलीस आणि मी घाबरलो. इट वॉज देजा वू... मला वाटलं माझ्यासोबत पुन्हा तेच सगळं घडतंय. तुझ्या सर्जरीच्या वेळी खरंच माझं हार्ट फेल होणंच बाकी होतं." तिने न राहवून पुढे होत त्याला घट्ट मिठी मारली. काही मिनिटं गेल्यावर त्याने पालथ्या हाताने डोळे पुसले.

"तुझ्या मनात इतकं काही साठलं असेल याची मला कधी जराशीसुद्धा कल्पना आली नाही.." तिने मागे सरकून त्याचा हात हातात घेतला. "मी तुला नेहमी लाडावलेला, कायम प्रिव्हिलेज्ड आयुष्य मिळालेला असाच समजत होते.. तरीही मी जेवढी तुझ्याबरोबर राहिले तसतशी तुझ्या प्रेमात पडत गेले."

"सो आर वी इव्हन नाऊ? ऑन द सेम पेज?" त्याने डोळा मारत विचारले.

"पलाश!" तिने त्याच्या दंडावर एक गुद्दा मारला. "आणि ती जमिनीची काय भानगड होती?"

"हम्म.. यू नो, मी लहान असताना अप्पा खूप रागीट, कडक होते. मला, दादाला कुठेही काही चूक झाली तर बडवून काढायचे त्याउलट आई सारखी आमच्या चुकांवर पांघरूण घालून वाचवायला बघायची. दादाला काही वाटायचं नाही पण मला त्यांचा खूप राग यायचा. मी कितीतरी तास एकटा माडीवरच्या खिडकीत बसून असायचो, खाडीत रेंगाळलेल्या होड्या बघत... नंतर मला मुंबईला पाठवल्यावर तर मी मनाने त्यांच्यापासून अजूनच लांब गेलो. मी डिप्रेस होतो तेव्हा त्यांना माझं वागणं कळत नव्हतं. त्या काळात त्यांनी मला जवळपास डिसओनच केलं. पण नंतर मी जरा सुधारून परत आलो तेव्हा ते माझ्यावर थोsडा विश्वास दाखवायला लागले. इथे वाढल्यामुळे मला ह्या गावाचं, जमिनीचं प्रेम होतंच आणि काहीतरी स्वतःच्या पूर्ण मालकीचं असावं, फक्त माझं असावं असं वाटत होतं, जे आजपर्यंत मिळालं नव्हतं. मला पूर्वजांची तीच जमीन हवी होती, ज्यात मी वाढलो, बागडलो होतो. अप्पा जमीन देणार नाही म्हटल्यावर मला धक्का बसला आणि मी तुला लग्नासाठी हो म्हणालो."  तिने भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिले.

"तू सोडून गेल्यावर मला माझी चूक जाणवली आणि आत्ता तुला भेटल्यापूर्वी मी त्यांना सगळं खरं सांगून टाकलं!" डोळे विस्फारत तिने आ वासला.

"अँड इट सीम्स, त्यांना आधीच आपलं वागणं कळलं होतं तरीही त्यांना मी तुझ्याशी लग्न करावं अशी इच्छा होती म्हणून त्यांनी मला पुश केलं. कॅन यू बिलीव्ह इट!" तो हसत म्हणाला.

आपण किती वेळ आ करून ठेवलाय लक्षात येऊन तिने गपकन तोंड मिटले. त्याने तिच्या वार्‍यावर सैरावैरा झालेल्या बटा गालावरून अलगद कानामागे सरकवल्या. "काल माझं थोडं ऐकलं असतंस तर एवढा त्रास झाला नसता. पण वाटलं तुला थोडी स्पेस मिळेल... विचार करायला, क्लॅरिटी यायला.. तुझा राग ओसरला की बोलू."

"काल मी रागारागात बॅग भरल्या आणि इव्हाकडे आले. घरी आणि ममाला हे सगळं कसं सांगावं विचार करत होते. मी तर इथून बदली करून निघून जायचा पण विचार केला!" ती जीभ चावत म्हणाली. "तू केक खाल्लास? मी चिडचिड करत तळाशी थोडा जाळला पण चव ओके होती. आणि मासा? खायला घातलं का त्याला?"

"तू भांडून निघून गेल्यावर मला भूक लागेल, असं वाटतंय तुला! पण माश्याला भरपूर खायला घातलंय." कंबरेत हात घालून तिला जवळ ओढत तो म्हणाला. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. "आय लव्ह यू..." तो तिच्या डोक्यावर हनुवटी टेकत म्हणाला. "आय लव्ह यू टू." ती त्याच्या कानात कुजबुजली.

एव्हाना बीचवर थोडे टुरिस्ट उगवायला लागले. "एक मिनिट" म्हणत तो उठला. जीन्सवरची वाळू झटकून पळत रस्त्याकडे गेला. तो परत आला तेव्हा हातात एका छोट्याश्या ट्रे मध्ये रोस ऑम्लेटचे दोन झाकण लावलेले बोल, टिश्यू पेपर्स, चमचे आणि चहाचे दोन पेपरकप होते. "तू केक म्हटल्यावर मला भूक लागली!" तो ट्रे तिच्या हातात देऊन खाली बसला. "मलापण!" ती चहाचा कप उचलून म्हणाली. "मग? आज सुट्टी?" त्याने ऑम्लेट भरलेला चमचा तोंडात कोंबला.

"हो! तू थांबशील ना?"

"विचारायची गरज आहे? इथून जाताना आपण इव्हाकडे जाऊन बॅग्ज घेऊन जाऊ."  तिने ओठ चावत मान हलवली.

ऊन वाढायला लागताच ते खाणं संपवून निघाले. पलाश ट्रे द्यायला गेल्यावर ती गाडीत बसली. "All ok?" तिच्या फोनवर इव्हाचा टेक्स्ट चमकला.

"Perfectly ok!" तिने रिप्लाय केला.

"O Thank god! I told you so! What's next?"

तिने रिप्लाय करणं सोडून सरळ कॉल केला.
"सगळं सॉर्ट आउट झालं आणि मी घरी चालले. बॅग घ्यायला येते." नोरा हसऱ्या आवाजात म्हणाली.

तिकडून इव्हा गायलाच लागली, "आबोलीचो वळेसार टाळयेर गो! घो बोलयता माडेयर गो..."

"शटाप याss" नोरा हसत सुटली. तेवढ्यात पलाश खिडकीत डोकावला. तिने खुसखुसत फोन ठेवला. "इव्हाचा कॉल!" त्याने गाडी सुरू केली. "काय म्हणत होती?"

"काही नाही, असंच." तिने लाल झालेले गाल दिसू नयेत म्हणून तोंड खिडकीकडे वळवलं.

--
चार महिन्यांनंतर...

"आय एम सॉरी, काय म्हणालात?" पलाशने अल्ट्रासाऊंड टेक्निशियनकडे बघत विचारले. त्याच्या ऐकण्यात नक्कीच काहीतरी चूक होती.

ती हसली. "दोन हार्टबीटस् आहेत" तिने स्क्रीनकडे बोट दाखवलं.

"ओह माय गॉड!" नोराने त्याचा हात अजूनच घट्ट धरला.

"दोन हार्टबीट्स कश्या असतील?" तो गोंधळून म्हणाला.

"कारण दोन बेबीज आहेत! इथे पहा." तिने पॉइंटरचे टोक स्क्रीनला टेकवले. राखाडी पाण्यात दोन काळे फुगे तरंगत होते आणि दोन्हीमध्ये दोन हलते ठिपके होते.

"ही हार्टस् आहेत?"

"येस डॅडी!" नोरा हसत म्हणाली. त्याचं तोंड उघडंच राहिलं. "दोन?" तो अजूनही शॉकमध्ये होता. "दोन!" तिचाही शॉक अजून पुरता गेला नव्हता. "पण आम्ही एकच ऑर्डर केलं होतं" त्याने म्हटल्यावर त्या दोघीही हसायला लागल्या.

"डॅम! सो धिस टाईम आय हिट द टार्गेट!" तो हसला.

"प्लीssज! आय एम शुअर, इट्स हरेडिटी!" तिने डोळे फिरवले. तेवढ्यात डॉक्टर फोन ठेऊन पुन्हा आत आल्या. "ऑलरेडी टेन वीक्स! नोरा, तुला कळलं कसं नाही? आय एम सो सरप्राईज्ड!"

"कारण मी पिल्सवर होते, तुम्हीच प्रिस्क्राईब केल्या होत्या. त्यातून pcod.. ते तुम्हाला माहितीच आहे."

"तू मध्ये आजारी होतीस का, काहीतरी ऐकलेलं आठवतंय."

"हो, csf लीकसाठी सर्जरी झाली होती."

"हां! अँटिबायटिक्स घेत असशील?"

"हो. तीन महिने खूप गोळ्या घेत होते."

"वाटलंच! अँटिबायटिक्समुळे पिल्स काम करत नाहीत."

"ओह.." नोराने कपाळाला हात लावला. "एनीवे, आमच्यासाठी ही गुड न्यूजच आहे!" पलाश मधेच म्हणाला. नोराने हसून वर त्याच्याकडे बघितले आणि बाकीच्यांना दिसणार नाही असं अंगठा आणि बोट मिळवून कोरियन हार्ट साइन करून दाखवले.

"सगळं ठीक आहे ना?" त्याने डॉक्टरांना विचारले.

"परफेक्ट! सगळं व्यवस्थित आहे."

---

रात्री बेडवर पडल्या पडल्या त्याने तिच्या पातळ स्वेटरमधून किंचित दिसणाऱ्या पोटावर हात ठेवला. "माझा अजून विश्वास बसत नाही. दोन छोटी माणसं कशी मावणार इथे?"

ती खळखळून हसली. "मी भरपूर जाड होणार आहे."

"किती?" त्याने कोपर उशीत खुपसून तळहातावर डोकं ठेवलं.

"मॅसिव्ह! तुझ्या मिठीत मावणार नाही इतकी!"

"नो वेss" त्याने घाबरण्याची ओव्हर ऍक्टिंग केली.

"येस. तू तेव्हाही माझ्यावर प्रेम करशील?"

"इव्हन मोअर!" त्याने उठून तिच्या पोटावर डोकं ठेवलं.

"काय चाललंय?"

"आत्तापासून त्यांना स्टॉक करतोय."

"गर्ल्स ऑर बॉईज?" तिने भुवया उंचावल्या.

"बोथ! दोघे सध्या भांडतायत. बॉय सगळी जागा अडवतो म्हणून गर्ल त्याला एक रेष आखून त्याच्या आत रहायला लावतेय. आणि तो तिला पिडतोय."

"साऊंड्स राईट! गो गर्ल!" ती हसली.

"तू खूष आहेस ना?" त्याने वर सरकून तिच्या कपाळावर ओठ टेकले.

"खूप खूष आहे पण मला भीती वाटतेय. तू, फॅमिली, बेबीज सगळं मला इतक्या इझीली मिळालंय, असं काही मिळायची सवय नाहीये मला. सगळं नीट राहील ना..."

त्याने तिला स्वतःकडे ओढून कुशीत घेतलं. "इकडे ये.. नथिंग कॅन टेक अवे व्हॉट वी हॅव! काळजी करू नको."

"पण जर..

"श्श.. तू खूप बोलतेस, असं कधी सांगितलंय का मी?" तो नाटकी आवाजात म्हणाला.

"हो."

"आणि तू जिथे तिथे पुस्तकं ठेवतेस, किचनमध्ये पसारा करतेस, कपाटात कपडे कोंबतेस हे?"

"आणि तू ते लगेच आवरतोस. सॉरी!" ती जीभ चावत म्हणाली.

"डोन्ट बी!" तो हळूच तिला किस करत म्हणाला. "बीकॉझ यू आर माय मोस्ट फेवरीट पर्सन इन द वर्ल्ड! तू येऊन माझ्या आयुष्यातला सगळा अंधार नाहीसा केला आहेस."

होना लिखा था यूँही, जो हुआ
या होते-होते अभी
अनजाने में हो गया
जो भी हुआ, हुआ अजीब
तुझे चाहूँ बे-तहाशा ज़हनसीब...

त्याच्या डोळ्यांत बुडून जात नोरा हळूच गुणगुणली.

समाप्त.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle