दिवस ७
इतके दिवस आम्ही मेघालयच्या खासी भागात फिरत होतो. क्रँग सुरी हा धबधबा जैंतिया भागात येतो. हा तसा आडबाजूला आहे धबधबा. जास्त गर्दी नव्हती. मॉलिन्लाँग पासून २-२.५ तास लागले इथे पोचायला. दावकीवरूनच रस्ता आहे.
वाटेत लागलेला एक धबधबा -
क्रँग सुरीलाही पायर्या व्यवस्थित बांधलेल्या आहेत धबधब्यापर्यंत पोचायला.
काही ग्रुप्स ह्या पाण्यात पोहत होते. पाणी जिकडून पडतयं तिथे वरच्या बाजूस बोटींगची पण सोय दिसली.
वर येईपर्यंत १२ वाजत आले होते. तिथल्याच हॉटेल्स मधे खाऊन घेतलं आणि गुवाहाटीकडे प्रयाण केलं. जवळ जवळ ६ तासांचा प्रवास होता. वाटेत शिलाँगजवळ जिवा व्हेज नावाच्या साऊथ इंडीयन हॉटेलमधे थांबलो. २-३ दिवस भात-दाल खाऊन कंटाळा आलेला. इडली-डोसा मेनूवर वाचून जो आनंद झालाय.
६:३० ला वगैरे लिपीच्या घरी पोचलो - Giardino De Fiore Chandmari. तिथे स्विगीवरून चाट वगैरे ऑर्डर केलं.खाऊन गुडूप झालो.