काझीरंगा - मेघालय

गेली २ वर्षे घरात बसून काढली. त्यामुळे तिसरी लाट ओसरायला लागल्यावर सहलीला जाण्याचे वेध लागले. मला कधीपासून काझीरंगाला जायचं होतं. १ मे ला ते बंद होतं त्यामुळे एप्रिलमधे जायचं ठरवलं. आसाम बरोबर मेघालय करण्याचं ठरवलं. अजून एक मित्र-मैत्रीण कुटुंब पण बरोबर होते.

मग सुरू झाली सहलीची तयारी. सुट्ट्या टाकून दिल्या आणि मग सुरू झालं प्लॅनिंग. कुठे किती दिवस घालवायचे, काय काय बघायचं ह्यासाठी गूगल हाताशी होतचं. इ त के ब्लॉग्ज, व्लॉग्स बघितले की न जाताही सगळ्या ठिकाणांची खडानखडा माहीती गोळा झाली. ४-५ वीकांत चर्चा करून प्लॅन ठरला. मग हॉटेल, विमान, टॅक्सी बुकिंग्ज पार पाडली.

दिवस १ - पुण्याहून निघून विमानाने गुवाहाटी, तिथून काझीरंगा
दिवस २ - काझीरंगा सफारी
दिवस ३ - काझीरंगाहून निघून शिलाँग
दिवस ४ - शिलाँगच्या आसपास फिरणे
दिवस ५ - चेरापुंजी दर्शन करून चेरापुंजीला स्टे
दिवस ६ - डबल डेकर रूट ब्रिज ट्रेक
दिवस ७ - चेरापुंजीहून निघून दावकी, स्टे मॉलिन्लाँगला
दिवस ८ - क्रँग सुरी धबधबा करून गुवाहाटीला परत
दिवस ९ - गुवाहाटीमधे फिरणे, रात्रीच्या विमानाने परत

प्रवासाबद्दल आधिक माहीती - २०२२ एप्रिल मधील माहीती

आम्ही गुवाहाटी-पुणे डायरेक्ट विमानाने गेलो. इंडिगोचां विमान पहाटे ३ वाजता पुण्याहून आहे तर गुवाहाटीहून रात्री ११:३० ला आहे. अडीच तासाचा प्रवास आहे. वेळेची खूपच बचत झाली. व्हाया कल्कत्ता किंवा मुंबई असे पर्याय होते पण ऑड वेळ असली तरी आम्ही हा पर्याय निवडला.

तिकडे फिरण्यासाठी आम्ही जी गाडी बुक केली त्यासाठी गूगलवर शोधून guwahatitaxi18@gmail.com ह्यांना मेल केलं होतं. संजय काटकी हे मालक आहेत, त्यांनी अमर - ९९५७० ७२८७३ हे चालक म्हणून दिले होते. आपल्याकडे दिवसाला ठराविक किमी अशी गाडी मिळते तिकडे आम्ही पूर्ण आयटीनरी शेअर केली आणि पैसे ठरवले. ३९००० लागले. गाडी - इनोव्हा. चालकाची रहाण्याची व्यवस्था, खाणंपिणं, टोल तेच बघणार होते. अमरजी गेली १५ वर्षे त्या भागात हा व्यवसाय करत असल्याने त्यांच्या ओळखी खूप होत्या. सगळीकडे भाषेची अडचण वाटली तर ते मदतीला यायचे. वाटेतली ठिकाणं, व्हेज हॉटेल्स सुचवायचे. एकंदरीत अनुभव चांगला आला. त्या भागात एक आहे की हॉटेल्स ड्रायव्हर लोकांसाठी डॉर्म्स बांधून ठेवतात. त्यामुळे चालाकांची चांगली सोय होते. काझीरंगा, शिलाँग इकडे अमरजींच्या ओळखीचे कोण होते त्यांच्याकडे ते जायचे झोपायला. आम्ही दिलेल्या वेळेच्या आधीच घ्यायला हजर. चेरापुंजीचं हॉटेल , मॉलिंलाँगच्या एअर बीएनबी ह्या २ ठिकाणी त्यांची सोय आमच्या इथेच झाली. चेरापुंजीला फोन नेटवर्कची बोंब होती त्या पार्श्वभूमीवर हे बरं झालं.

काझीरंगा हॉटेल - विल्डरनेस्ट
एकंदरीत गूगल, मेकमायट्रिप आणि इतर तत्सम साईटसवर बराच अभ्यास करून हे हॉटेल निवडलं. हे काझीरंगाच्या २ मुख्य रेंजपासून जवळ होतं. खाणं ठिक होतं. पहीलच दिवस असल्याने आमच्याकडे खाण्याचा खूप स्टॉक होता त्यामुळे काही अडलं नाही. आसामी पद्धतीची थाळी छान होती. हिंदीची मात्र बोंब होती. स्टाफला आम्ही काय सांगतोय हे पटकन कळायचं नाही. मालक २ तरूण मुलं होती. ते हिंदी, इंग्लिश व्यवस्थित बोलत होते. कॉटेज छान होती, बाहेर जागाही भरपूर होती.

सफारी - सफारीसाठी ह्याच हॉटेलने आम्हाला बनमौलीजींचा नंबर दिला. बनमौली - ६००१०९११७४
ह्यांनी हत्ती सफारीसाठी अ‍ॅडव्हांस पैसे घेतले होते. बाकी जीपचे आयत्या वेळी दिले. जीप सफारीला त्यांची जीप हॉटेलवर आणा-पोचवायला यायची. त्यामुळे आपल्या गाडीने जा मग जीप शोधा असं काही झालं नाही. सकाळच्या सफारीचा चालक जास्त थांबत नव्हता वगैरे सांगितल्यावर त्यांनी दुसर्या सफारीला चांगला चालक दिला, ज्याला माहीतीही होती आणि तो थांबत होता, घाई करत नव्हता.

शिलाँग - The In Town Inn
हा बंगला छान स्पेशियस होता. जुन्या पद्धतीचा असला तरी चांगला ठेवला होता. मार्क, मालक अगदी बोलघेवडा होता.

चेरापुंजी - The Breiancy Inn
ह्या हॉटेलचं लोकेशन अप्रतिम होतं. जेवणही चांगलं होतं. फक्त जिओला रेंज होती मात्र.

डबल डेकर येथील गाईड - लुमलँग - ९३६६३५५७८८. तिकडे गेलात तर नक्की ह्याला हायर करा.

मॉलिन्लाँग - Verde Eco Lodge
हे ठिकाण कळलं एअर बीएनबी वरून पण काही विचारायला मालकाला मेसेज केला, पुण्याहून येणार वगैरे झालं मग त्याने नंबरच दिला. सचिन - ८६५२२२५७८५. त्याने थोडा डिस्काउंट दिला डायरेक्ट बुकिंग केलं त्याचा. रिमोट भागात असलं तरी घर छान आहे, सगळं बांबूने बांधलं आहे. मॉलिन्लाँग गावापासून अगदी २ मिनिटांवर आहे. आम्हाला गावतल्या हॉटेलने होम डिलिव्हरी दिली रात्री. मॉलिन्लाँग गावातही बरेच होम स्टे ज आहेत.

गुवाहाटी - Giardino De Fiore Chandmari
बाकी घर अगदी सजवलेलं पण किचन बकवास. आम्ही एकदाच होतो खायला, तेव्हा स्विगीवरून ऑर्डर केलं आणि हॉलमधेच बसून खाल्लं. बेडरूम्स, हॉल प्रशस्त पण किचनमधे पाऊलही ठेवू नये अशी अवस्था - कळकट भिंती, नीट लाईट नाही. ओनर लिपी नावाची मुलगी होती.

जाण्याचा चांगला सीझन -

पावसाळ्यात तर काझीरंगा बंदच असतं. मेघालयातही भरपूर पाऊस पडत असल्याने पावसाळा सोडून दोन्ही सीझन आयडीयल आहेत. हिवाळ्यातले व्हिडिओज पाहीले त्यात धबधब्यांना पाणी कमी वाटलं. मार्चपासूनच पाऊस सुरू होत असल्याने एप्रिल्,मे मधे धबधबे छान होते पण दावकीला क्लीयर पाणी नाही मिळालं. हिवाळ्यात दावकी जास्त छान असेल.

बाकी काझीरंगाची साईट, युट्युब वरचे बरेच व्लॉग्स रेफर केले आयटीनरी ठरवताना.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle