कौन्? डोन्ट ओपन द डोअर Updated (शेवटचा भाग अपटेटेड.)

चॅप्टर १ : स्ट्रेन्जर इन माय हाउस
साधारण १९९९-२००० च्या आसपास राम गोपाल वर्मा-उर्मिला मातोंडकर-मनोज वाजपेयी या जबराट कॉकटेलचा अत्यंत स्केअरी थ्रिलर मुव्ही आला होता, ‘कौन’ !
एका रात्री उर्मिलाच्या घरात एक स्ट्रेन्जर घुसतो आणि सुरु होतो एक लपाछपीचा ट्विस्टस ने भरलेला थरार.. नक्की कोण कोणाला थ्रेट आहे, कोण कोणाला घाबरतय..प्रेक्षक पार कनफ्युज होतात !
तसाच काहीसा थरार गेल्या शुक्रवारी आम्ही अनुभवला !
२२ मे २०२६
मेमोरिअल डे लाँग विकेन्ड असल्यामुळे शुक्रवार दुपार पासूनच सगळीकडे सुट्टीचं वातावरण होतं !
रविवार - सोमवार बाहेर जायचे प्लॅन होते म्हणून शनिवारी धुरन्धर मॅरॅथॉन करायचा प्लॅन केला !
आता चार तासाचे दोन धुरन्धर बॅक टु बॅक पहायला भरपूर स्नॅक्सही हवेत !
ट्रेडर जो या माझ्या आवडत्या दुकानातून भरपूर स्नॅक्स विकत घेऊन मी दुपारी एकच्या सुमारास घरी आले.
मी वरच्या फ्लोअरला होते आणि कपडे बदलून खाली जेवायला येतच होते इतक्यात नवरा ऑस्करला (आमच्या बेबी डॉग ला )घेऊन धावत वर आला, "किचन मधे मोट्ठा साप आला आहे "
काय ? साप ? घराच्या आत ? ? कसा ? ?? मी किंचाळले !
"मी आणि ऑस्कर गार्डन मधे खेळत होतो, बॅकयार्डचं दार उघडच होतं, इतक्यात प्रचंड वेगाने सळसळत एक साप घरात शिरला आणि मी काठी घेऊन येईपर्यन्तं तो वळवळत किचनच्या लेझी सुझॅन कॅबिनेट मधे शिरला , तिथेच लपलाय"
पण याच्या पुढचे जे स्केअरी घटनाक्रम घडले ते अ‍ॅडव्हेन्चर लिहिण्या आधी मी रहात असलेल्या लॉस अ‍ॅन्जलिसच्या 'पोर्टर रँच' या भागाची ओळख करून दिली नाही, तर या घटनेला जस्टिस मिळणार नाही !
……………………………………………………………………………………………
चॅप्टर २: अननोन थ्रेट्स इन द व्हॅली
व्हॅली एरीआ लॉस अँजलिस मधला वॉर्म एरीआ म्हणून प्रसिद्ध आहे , मी रहाते तो 'पोर्टर रँच' हा लॉस अँजलिसच्या नॉर्थ व्हॅली एरीआचा भाग आहे.
हा भाग डोंगरांचे व्ह्युज , ग्रीनरी, पार्क्स आणि अनेक सुंदर हायकिंग ट्रेल्सने सजलेला खूप सुंदर आणि रहायला सेफ एरीआ आहे , क्राइम रेट कमी आहे आणि मेजॉरीटी गेटेड कम्युनिटीज आहेत !
इथे लोक आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटिज / बॅकयार्ड पार्टीज अगदी वर्षाचे बारा महिने एन्जॉय करु शकतात असे दृष्ट लागण्या सारखे वॉर्म हवामान इथे असते !
इथल्या डोंगरातून दिसणारे सनराइज, सनसेट्स व आणि संधीप्रकाश तर फार खास असतो !
61e4054c-7326-414a-b2b5-20e775b72189_0.jpeg

इथे घरांच्या कम्युनिटिज सुद्धा डोंगर पायथ्याशी, काही डोंगरावर वसल्या आहेत !

img_4004_0.jpeg

पण म्हणतात ना , जगात परफेक्ट असे काही नसते, इव्हन मोस्ट ब्युटिफुल थिंग्ज डु कम विथ सम अनवॉन्टेड पॅकेजिंग , याला निसर्गही अपवाद नाही !
इथे कोरड्या गरम हवामानात हाय विंड्स सुरु झाला कि निसर्ग रुद्रावतार धारण करतो, जगभर सगळ्यांना माहित असलेले लॉस अ‍ॅन्जलिसचे ब्रश फायर्स/वाइल्ड फायर्स हजारो मैल निसर्ग उध्वस्तं करतात, आमच्या एरीयातही एक दोनदा इव्हॅक्युएशन वॉर्निंग आल्या आहेत ब्रश फायरमुळे, हा त्यावेळी माझ्या घरातून दिसणारा डोंगर !
60bfd334-3ec3-43ae-9abb-838a6eabd275_0.jpeg

Ironically आगीच्या होरपळीने पोल्युटेड झालेल्या आकाशातला सनसेट अजुनच कलरफुल दिसतो

0cc17d05-9a9f-4d1e-a947-4ec8e5c6b6b7_0.jpeg

आगीच्या वेळी डोंगरातली जनावरे मनुष्यं वस्तीत येण्याचे चान्सेस खूप वाढतत !
इथला निसर्गं एखाद्या सुंदर लँडस्केप सारखा रेखीव असला तरी डोंगरां वरच्या उरल्या सुरल्या जंगलातून येणार्‍या कायोटीज, कोल्हे, माउन्टन लायन्स, साप , सरडे, स्कन्क्स, रॅकुन्स अशा अनेक नकोशा पाहुण्यांची थ्रेट इथे नेहेमीच असते !
मला सरडे, पाली, साप अशा प्राण्यांची भयंकर भीती/किळस्/तिटकारा आहे , यामुळेच मला आमच्या किचन मधून बाहेर बॅकयार्डला जाणारे घराचे दार उघडं ठेवायला अजिबात आवडत नाही !
माझा नवरा आणि ऑस्कर यांना मात्रं बॅकयार्ड मधे जायचे भारी वेड आणि घरातून बॅकयार्ड मधे जाणारे ते दार उघडे ठेवायची वाईट सवय !
ऑस्कर आणि माझा नवरा कधी गार्डन मधल्या खारींच्या मागे किंवा सतत खेळायला तरी दार सताड उघडे जातातच !
त्या दिवशी २२ मे ला तसेच झाले होते आणि तो स्ट्रेन्जर घरात घुसला होता …
(क्रमशः)

Continued to Part 2

पायाखालची जमिन सरकणे, बोबडी वळणे, अंगावर काटा येणे ( नव्हे सुया येणे) म्हणजे काय याचा साक्षात अनुभव त्या एका क्षणात घेतला !
आमच्या ‘सोरॅन्टो ‘ हाउजिंग कम्युनिटी मधे गार्डन मधे साप दिसणे कॉमन आहे पण हा थेट घरात घुसला होता , असा घरात घुसणारा हा आमच्या कॉलनी मधल्या पहिलाच !

चॅप्टर ३ : शेर - ए- सोरॅन्टो

मे २०२४ मधे मी माझे जुने किचन पूर्णपणे डिमॉलिश करून रिनोव्हेट केले तेंव्हा २ गोष्टी नॉन निगोशिएबल होत्या, एक म्हणजे मिनि आयलंड ऑन व्हिल्स आणि दुसरे म्हणे कॉर्नर मधे लेझी सुझॅन !

screenshot_20260526_230222_gallery_0.jpg

screenshot_20260526_225926_gallery.jpg

आता हे लेझी सुझॅन म्हणजे काय हे ऑलरेडी बर्‍याच लोकांना माहितच असेल, तरी ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी : किचनच्या किंवा कुठल्याही कॉर्नर कॅबिनेटना जास्तीत जास्तं युटिलाइझ करण्यासाठी बनवलेले हे कॉर्नर कॅबिनेट असते, विथ रोटेटिंग ट्रे शेल्व्ह्ज , यामुळे कॉर्नरचा डेड झोन युटिलाझ होतो आणि शेल्व्ह्ज रोटेट होत असल्यामुळे अ‍ॅक्सेस करायलाही सोपा जातो !
img_3999.jpeg

पण त्यावेळी लेझी सुझॅन कॅबिनेटचा 'असा' वापर एक क्रिपी सरपटणारा प्राणी करेल असे माहित असते तर ?????
पण नवरा सांगत होता म्हणजे हे घडले होते !
आता करायचे तर करायचे काय !
मुळात तो बोट भर जाड, साडे तीन चार फुट लांब साप किचनच्या बन्द असलेल्या कॅबिनेटच्या आत गेलाच कसा ?
कॅबिनेट्स च्या दाराची फट अशी असते किती मोठी ? हे आता खाली जाऊन सॉर्ट करायचे होते !
सर्वात आधी ऑस्करला बेडवर झोपवले , बेडरुमचे दार लावले आणि घाबरत घाबरत जिना उतरून आम्ही खाली आलो !
काठी ऑलरेडी होती, एक जाळीची लाँड्री बॅग पण घेतली , नवर्‍याला म्हंटलं , तू काठीने त्याला ओढ मी पिशवीत भरते.
पण त्या लेझी सुझॅन कॅबिनेटचं दार कोण उघडणार ?
नवर्‍याने हिंमत करून हळुच ते दार उघडलं, दोघांनी सगळे बळ एकवटले , पाहिले तर साप गायब.. मग दिसले कि त्या कॅबिनेटला किचन कॉन्ट्रॅक्टरने तिथून प्लंबिंगचा पाइप जातो म्हणून एक ओपनिंग केले होते.. त्या भोकातून हा धुरंधर आत जाऊन लपला होता #कपाळबडवति
कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेही होते ते ओपनिंग मोठं झालय, ते लहान करून देतो म्हंटला आणि ते राहूनच गेलो, आमची चूक म्हणजे आम्हीही विसरून गेलो.. आता २ वर्षांनी लक्षात आलं तोवर ही त्या सापासाठी आयडिअल अंधारी सुरक्षित जागा बनली होती !

img_4007.jpeg

मग बाजुचे कॅबिनेट पण ओपन करून पाहिले, तर बाजुच्या कॅबिनेटलाही बॉटम रॅकला ओपनिंग .. कर्मं माझं.. म्हणजे या क्रिपी जनावराला २ कॅबिनेट्स बॉटमला लपून बसायला अ‍ॅक्सेस आहे , इट वॉज हिज लकी डे !
मग धीर करून ती दोन्ही कॅबिनेट्स आधी रिकामी केली आणि तिथली सगळी भांडी डिशवॉशरला लावली !
काठीने ठक् ठक् आवाज केला ज्यामुळे तो बाहेर येईल.. पण अ‍ॅब्सोल्युट्ली नो सक्सेस !
मग वाचलं कि या आवाजाने साप घाबरतो , म्हणजे बाहेरच येणार नाही घाबरून आतच लपेल !
आता मात्रं आम्ही दोघेही आपापल्या फोन वरून निरनिराळ्या सरव्हिसेस ना फोन लाऊ लागलो !
पेस्ट कन्ट्रोल, अ‍ॅनिमल रेस्क्यु, स्नेक रेस्क्यु, रेप्टाइल रेस्क्यु, काय काय नंबर शोधले, नवर्‍याने तर ९११ आणि फायर डिपार्टमेन्टलाही फोन लावले , त्यांनी फक्तं इथून तिथे फोन ट्रान्स्फर केले , बाकी सगळे मेसेजेस व्हॉइस मेसेज वर गेले.
शेवटी मला थोडेफार यश आले, एक नंबर लागला , ८०५ एरीआ कोड वरून तो सिमि व्हॅली एरीयाचा वाटला , एका बाईने फोन घेतला , ती म्हणे पोर्टर रँच म्हणजे लॉस अ‍ॅन्जलिस काउन्टी , आम्ही व्हेन्चुरा काउन्टी मधे व्हॉलेंटिअर वर्क करतो !
मी म्हंट्ल कि काउंटी वेगळी असेल पण सिमी व्हॅली पासून मी लांब नाही, ती बाई म्हणे ती सिमि व्हॅली नाही तर सॅन्टा पॉलाला रहाते म्हणजे बरीच लांब, तरीही तिने दिलासा दिला , ती म्हंटली आमच्या व्हॉलेंटिअर्स पैकी आज कोणी त्या एरीयात असेल तर तुला टेक्स्ट करते !
फोन ठेवला, फार काही आपेक्षा नव्हत्या पण तिने लगेच टेक्स्ट करून अ‍ॅव्हेलेबल माणुस येऊ शकतो पण २ तासाने असे सांगितले , ओके म्हणण्या शिवाय पर्यायच नव्हता !
तब्बल २ तास हिते त्या रेस्क्यु व्हॉलेन्टिअरला यायला.. तोवर तो असणार का तिथे ?
मिनव्हाइल नवर्‍याला त्या सापाची डार्क ब्राउन शेपुट कॅबिनेट मधून बाहेर येतेय असे दिसले , मलाही काहीतरी वळवळ त्या कॅबिनेटच्या बारीक फटीतून दिसली.. फार क्रीपी दृश्य होते !
आम्ही पुन्हा दबा धरून बसलो.. पण आमच्या पावलांचा आवाज झाला कि हा पठ्ठ्या पुन्हा कॅबिनेटच्या भोकात जायचा !

शेवटी ४ वाजता एकदाचा 'स्टिव्हन' नावाच्या व्हॉलेंटिअरचा फोन आला, अर्ध्या तासात येतो म्हंटला !
तोवर त्याने आधी फोनवर सापाचे वर्णन विचारले आणि पॉसिबल ब्रीडचा हा फोटो पाठवला :
64fb3f52-0e33-4f0f-80ff-c30049677649_0.jpeg
..........................................
हा शेवटचा भाग :
चॅप्टर ४ : ट्रायल बाय रेस्क्युअर्स
शेवटी एकदाचा तो स्टिव्हन आला पण साप कुठे लपून बसलाय काही पत्ताच नाही .. काही हालचाल नाही कि कॅबिनेट ओपनिंग पाशी काही व्हिज्युअल्सही नाहीत !
सापच दिसत नाहीये तर तो रेस्क्यु कोणाला करणार ?
तो म्हणे जर तुम्हाला तो दिसत नाहीये तर मलाही दिसणार नाही, पण दिसला तर नक्की पकडून देईन !
त्याने एक गोष्ट कन्फर्म केली कि हा ‘कॅलिफोर्निया रेसर ‘ स्नेक / व्हिप्डस्नेक आहे जो बिनविषारी, हार्मलेस आहे, माणुस आणि डॉग साठीही , साधे गार्डन ग्लोव्ह्ज घालून उचलून फेकावा इतका हार्मलेस !
अर्थात डेंजरस नसला, पॉयझनस नसला तरी साप तो सापच , आम्हाला त्याचीही भीतीच वाटते !
वर स्टिव्हनचे म्हणणे असे कि लपून बसलेल्या सापाला बाहेर यायला प्रवृत्त करणे सोपे नाही, त्याला जर बाहेर यायला थ्रेट वाटत असेल तर तो आठवडा भर सुद्धा त्या भोकात जीवन्त राहु शकतो इतका त्याचा स्ट्राँग सरव्हायवल इन्स्टिन्क्ट असतो कारण " हि इज मोअर स्केअर्ड ऑफ यु, दॅन यु आर स्केअर्ड ऑफ हिम"
झालं…..म्हणजे त्याला आमची भीती वाटते आणि आम्हाला त्याची.. हा खेळ संपणार तरी कधी ?
थोडा वेळ थांबला स्टिवन , पण मि.स्नेक कडून काहीच हालचाल झाली नाही त्यामुळे काही टिप्स देऊन शेवटी तो परत गेला , त्याच्या म्हणण्या नुसार साप दुपारीच बाहेर येतात आणि आता संध्याकाळ झाल्याने तो बाहेर यायची शक्यता कमी आहे, थोडक्यात साप पकडला जाण्याचा चान्स गेलाच !
नंतर अजुन एका ‘ स्नेक रेस्क्यु पेड सरव्हिस’ देणार्‍या माणसानेही व्हिजिट दिली पण त्याने सांगितले कि लपला असेल तर तो काही करु शकणार नाही.. तरीही सल्ले हवे असतील तर कल्न्सटन्सीचे $२५०, साप दिसलाच आणि पकडला तर $५०० अशीच कॉन्व्हर्सेशनला सुरवात झाली , नुसते सल्ले घेऊन काय करु ,! ते तर स्टिव्हननेही दिले होते , म्हणून आम्ही त्याला परत पाठवले !
साप डेंजरस नाही या गोष्टीने थोडा दिलासा मिळाला पण पुढे काय ?
तो त्या भोकाच्या आतच कायमचा राहिला तर ?
असे एक ना अनेक प्रश्नं पडत होते !
दुपार पासून अक्शर्शः इतक्या ठिकाणी फोन लावले होते, कशाचाच उपयोग झाला नव्हता !
किचन कॉन्ट्रॅक्टरलाही फोन केला आणि विचारले कि ती कॅबिनेट्स काढून देईल का, पण तो लाँग विकेन्ड असल्यामुळे आउटऑऑफ टाउन होता !
सगळ्यांना विचारून झालं, शेजार्‍यालाही सल्ल्ला विचारला , त्याने तर असा डेंजर सल्ला दिला कि बास रे बास !
म्हणे पेट्को मधून एक उंदिर आणा आणि उंदराचा पिंजरा किचन मधे ठेवा म्हणजे ,साप बाहेर येईल !
उंदराची तरी काय कमी भीती वाटते आम्हाला ? साप उंदिर दोन्ही डेंजर !
हे म्हणजे घरात ‘अर्शद पप्पु ‘लपलाय म्हणून ‘उझेर बलौचला ‘बोलवावे इतके डेंजर .. भीक नको पण कुत्रा आवर !
undir.jpeg

कुत्र्यावरून आठवलं , या सगळ्या गडबडीत एका व्यक्तीला काडीचाही फरक पडला नव्हता , अर्थात ऑस्करला, कम्प्लिटली अनबॉदर्ड !
img_4012.jpeg

त्याचे आपले नेहेमीची वेळ झाल्यावर वॉकला न्या, खेळायचा मुड झाला कि खेळा ,ट्रिट्स मागा ही भुणभुण चालुच होती , जणु काही घरात सापाच्या अस्तित्त्वाची याला सवयच आहे !
हेच जर घरात ससा किंवा खार घुसली असती किंवा शेजार्‍याच्या सल्ल्या प्रमाणे उंदिर आणला असता तर त्याने घर डोक्यावर घेतले असते, तांडव नृत्त्यं दाखवले असते नक्की !
आता फक्तं नगिना मधल्या पुंगी घेऊन येणार्‍या अमरिश पुरी टाइप सपेर्‍याला बोलवायचे तेवढे बाकी होते , जेणे करून लपलेला साप फिमेल असेल तर श्रीदेवी सारखा / मेल असेल तर 'नागिन' मधल्या जितेन्द्रं सारखा नाचत बाहेर येईल !

pungi.jpeg

थोडक्यात काय तर ६ तास झाले तरी कशाचाही काही एक उपयोग झाला नव्हता !
आता रात्रं होण्या आधी काहीतरी केले पाहिजे म्हणून शेवटी नवर्‍यानेच त्या किचन कॅबिनेटची बॉटमला असती ती स्कर्टिंग ची फळी ओढून काढली आणि पालथे पडून काही हालचाल दिसते का पहायचे ठरवले..पण नो लक !
img_4013.jpeg

थोडा वेळ तर फक्तं आम्ही त्या कॅबिनेट कडे बघत बसलो पण पाहुणा बाहेर यायची काहीच लक्षणं दिसेनात बघून शेवटी कंटाळून मी साप असलेल्या किचन मधे गेले , कॉफीमेकर उचलला, इन्स्टन्ट पॉट उचलला , खिचडीचं बेसिक सामान उचललं आणि डायनिंग एरीयात सेट्प मांडला !
एक कप कडक कॉफी मारून स्ट्रेस थोडा कमी झाला , लंचही स्किप केला होता, मग खिचडी लावली आणि गरम गरम जेवण करून थोडे पोटही शान्तं झाले !
तसेही आता आमच्या हातात काहीच नव्हते !

चॅप्टर ५ : स्लिपिंग विथ द एनिमी !

आता रात्रं झाली होती आणि खात्रीच पटली होती कि तो लेझी सुझॅन बरोबर वन नाइट स्टँड करून दुसर्‍या दिवशी दुपारीच बाहेर पडणार !
जणु काही त्याने ऐलानच केले होते ,
“ये नया पोर्टररँच स्नेक है, ये घरमे घुसेगा भी और सोएगा भी !”
आम्ही झोपायला जाण्या पूर्वी काहीतरी सेफ्टी अरेन्जमेन्ट करायला हवी होती ज्यामुळे रात्री साप बाहेर आलाच तर घरात इतरत्रं कुठे जाणार नाही !
नवर्‍याने होम डिपो मधे जाऊन ‘माउस ट्रॅप’ साठी असतात त्या स्टिकी प्लेट्स आणल्या, उंदिर पकडायचा असेल तर या स्टिकी प्लेट्स हमखास काम करतात, इथे कामी येतील कि नाही हे ट्रायल अ‍ॅन्ड एरर्स च प्रकार होता !
आपेक्षा हीच होती कि साप बाहेर आला तर त्या प्लेट्स ना चिकटून बसेल आणि त्याला बाहेर गार्डन मधे ढकलायला सोपे जाईल !
तसेही बेडरुम्स वरच्या मजल्यावर आहेत आणि आम्हाला शोधत तो साप स्टेअरकेसने वरती यायची शक्यता काही वाटत नव्हती , पण त्याचे डेअरींग झालेच तर ? म्हणून ही अरेन्जमेन्ट केल्या शिवाय झोपच आली नसती !
स्टिकी ट्रॅप प्लेट्स लेझी सुझॅन कॅबिनेट च्या आत, कॅबिनेट जवळ आणि किचन फ्लोअर वर सगळीकडे पसरल्या , किचनच्या बॉर्डर्स शक्यं होतील तितक्या सिल केल्या, गॅरेज मधल्या लाकडाच्या फळ्या, बॉक्सेस जे दिसेल त्याने !
लाइफ इज सो अनप्रेडिक्टेबल…. रेप्टाइल्स चा फोबिया ,किळस, तिटकारा सगळे विसरून , आज माझ्या घरात साप लपला असताना मी शान्तपणे वर झोपायला निघून गेले, शेवटी काय सरव्हायवल ! आमचे आणि सापेचेही!
झोपतानाही विचार चालु होतेच.. तो साप कधीच सापडला नाही तर ? तिथेच मेला आणि वास सुटला तर ? नव्याने केलेले हे किचन कॉन्ट्रॅक्टरला बोलावून पूर्णच डिसमेन्टल , झालच तर डिमॉलिशच करावे का ? का सरळ घरच विकून टाकावे ? घर विकायचे कारण काय द्यायचे ? कि गुपचुप सापा बद्दल काही न सांगता सापासकट घर विकावे ?
असे विचार चालुच होते पण प्रचंड दमल्यामुळे नंतर गाढ झोप लागली !
नवरा मात्रं रेस्टलेस होता , दर थोड्या वेळाने खाली जाऊन बघायचा काही हालचाल आहे का, साप स्टिकी प्लेट्सला चिकटलाय का !

चॅप्टर ५ : धुरन्धर
२३ मे २०२६
दुसरा दिवस उजाडला पण सकाळी दहा वाजे पर्यन्तं काहीही हालचाल नाही !
मग अचानक त्या लेझी सुझन कॅबिनेट्सच्या बॉटम पाशी कडकड आवाज आला, तो आवाज वाढु लागला, मग आम्ही पुन्हा हिंमत करून ते दार उघडलं , आता सापाने त्या भोकातून डोकं बाहेर काढलं होतं आणि त्याचं डोकं त्या प्लेट्सना चिकटल्यामुळे तो हालचाल करत होता !
झालं, पुन्हा धावपळ, नवर्‍याने पालथे झोपून त्य कोनाड्यातला सापाला प्लेट सकट ओढायचा प्रयत्नं केला, पण तो समहऊ साप सटकला आणि त्या कॅबिनेटच्या भोकात गेला.. प्रचंड निराशा , चिडचिड , थयथयाट झाला !
त्या माउस ट्रॅपच्या प्लेट्स खूप चिकट असतात आणि त्यातून सोडवून घेणे सोपे नाही, पण हि मॅनेज्ड इट !
मग लक्षात आहे कि ३ ते ४ इन्चाचा छोटा उंदिर त्या प्लेट्स्ला चिकटणे वेगळे आणि साडे तीन फुट लांब सापाचे फक्तं डोकं चिकटणे वेगळे !
मग आम्ही त्या कॅबिनेटच्या भोकापासून प्लेट्स थोड्या लांब ठेवल्या, ज्यामुळे तो साप थोडा पुढे येईल आणि त्याची जास्तं बॉडी प्लेटला चिकटली तर ओढायला सोपे जाईल !
शेवटी दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा आवाज झाला.. पुन्हा कॅबिनेट उघडले.. यावेळी मात्रं तो पुढे आला होता आणि जास्तं चिकटला होता, पुन्हा नवर्‍याने धीर करून प्लेट काठीने खेचली , आता काम होतय असं वाटतच होतं , पण……. तो महामूर्ख साप पुन्हा सटकला .. कसा ते त्याचे त्याला ठाउक !
आता मात्रं पेशन्स संपला, काल येऊन गेलेल्या स्टिव्हन ला फोन करून घरी रहायला बोलवावे अशी इच्छा होत होती.. पण हे शक्यं नसले तरी त्याला अजुन काय करता येईल विचारले घेतला, त्याने साप पुढे ओढण्या साठी पकडी सारखे एक मोठे गॅजेट सांगितले , ते कुठल्या दुकानात जनरली मिळत नाही , तरी रेप्टाइल्स स्पेशल शॉप्स मधे शोधले तर सापडु शकेल असे कळले !
या शिवाय स्टिव्हनच्या म्हणण्यानुसार साप स्टिकी प्लेट मुळे इन्ज्युअर होऊ शकतो, त्या पेक्षा त्या काढून टाका , ते मात्रं आम्हाला मान्यं नव्हतं आत्ता या प्लेट्समुळे निदान त्याच्या हालचालीचा आवाज तरी येत होता, तो कुठे आहे हे तरी समजत तरी होतं !
स्टिवनने सांगितलेले गॅजेट मिळते का पहायला नवरा लग्गेच बाहेर गेला , मी लो व्हॉल्युम वर टि.व्ही. लाऊन बसले , सो दॅट सापाचा आवाज झाला तर समजेल , पण बराच सगळ कसं शान्त शान्तं !
इतक्यात सुमारे साडेतीनच्या आसपास पुन्हा कडकड आवाज झाला, मी आधी ऑस्कर सोफ्यावर झोपलाय याची खात्री केली आणि हळुच उठले.. आता ‘कडकड’ आवाज सरपटल्या सारखा येऊ लागला !
पटकन किचन मधे गेले तर तो साप ऑलरेडी सगळे अडथळे पार करून कॅबिनेट मधून बाहेर आलाच होता आणि चक्क किचन मधून बॅकयार्ड मधे जाणार्‍या काचेच्या दारापाशी एका जागी वळवळत होता !!!!!!!!!
जणु काही मला सांगत होता ‘दार उघड बये दार उघड‘ !
दॅट वॉज द मोमेन्ट……… नाउ ऑर नेव्हर.. मी गेले , सापा जवळ.. ते दार उघडले आणि तो धुरन्धर काही क्षणात सळसळत गवतातून निघूनही गेला आणि मी ते दार घट्ट बन्दं केले !!!!!
हे सगळे इतके फ्रॅक्शन ऑफ सेकन्द्स मधे घडले, ना मी आरडाओरडा केला, ना सापाचे फोटो काढले , somehow I just knew what to do and so did he !
ऑस्कराही जागा झाला होता, मागे बसून तो हे शान्तपणे बघत होता, जसे काही हे तो रोजच बघतो, साप गेल्यावर सोफ्यावर जाऊन पुन्हा झोपला.. सुखी प्राणी Happy
आमचे घर आता सर्पमुक्तं झाले होते आणि तोही मुक्तं झाला होता, त्याला त्याच्या नॅचरल वस्तीत जाण्याचा मार्गं मिळाला होता !
आमचा आणि त्या सापाचा हा २६ तासाचा ट्रॉमॅटिक एपिसोड अशा प्रकारे फायनली संपला होता !
खरं तर सगळी रिस्की कामं, धावपळ नवर्‍याने केली पण सुटका मात्रं माझ्या हातून झाली !
तो गेला तरी २ मिनिटं मला काही सुचलच नाही, बन्द दारातल्या काचेतून मी त्याला गवतातून पुढे कुंपण्याच्या फटीतून बाहेर जाताना शान्तपणे बघितल !
भानावर आल्यावर शेवटी आनंदाची बातमी फोन करून नवर्‍याला दिली, त्याला इतका आनंद झाला, खरेच वाटेना॓
.पण खरोखर त्या घटनेचा ‘दी एन्ड ‘ झाला होता, मुख्य म्हणजे without hurting the snake !
स्टिव्हनलाही अपडेट दिले, त्याने शाबासकी दिली, " गुड वर्क, यु अ‍ॅक्चुअली रेसक्युड हिम"
मी रेस्क्यु केले ? अरे खरच , मीच केले कि, पण त्या सापानेही सुटका करून घेण्याचे १००% दिले, इन फॅक्ट त्याला हवं तेंव्हा तो आला आणि हवं तेंव्हा गेला, मी फक्तं दार उघडून जाऊ द्यायला निमित्तं झाले .. कदाचित त्याचा ट्रॉमा माझ्यापेक्षा जास्तं असेल !
क्लिअर फोटो घ्यायला चान्सच नाही मिळाला , लांबून तो लॉन वरून सरपटत जातानाचा घेतलेला हा फोटो, झुम करून पहावा लागेल!

img_4011.jpeg

आज ती घटना घडून ८ दिवस झाले, आम्ही इथेच रहातो, आमच्या पोर्टर रँच मधे, 'त्यांची ' जंगल तोडून बांधलेल्या कॉलनी मधे. !
असे पाहुणे पुन्हा येणारच नाहीत असे नाही , पण काळजी घेणे आपल्या हतात आहे !
तुम्हीही लॉस अ‍ॅन्जलिस, सदर्न कॅलोफिर्निया मधे रहात असाल तर पुढील काळजी नक्की घ्या :
स्नेक रिपेलन्ट पावडर मिळते ती बॅकयार्ड मधे, कुंपणावर झाडांवर मारा.
घरात येणारे बॅकयार्डचे सगळे एन्ट्रन्स बन्द ठेवत जा, व्हेन्टिलेशन साठी खिडक्या असतात !
तुमच्या पेट्सना कधी अनअटेन्डेड बॅकयार्ड मधे सोडु नका !
बॅकयार्डचे दार उघडताना आधी कानोसा घ्या, आजुबाजुला कोणी पाहुणे नाहीत याची खात्री घेऊन मगच बाहेर जा आणि लगेच दार लावा !
पण………. जर दारा बाहेर सळसळ , खुडबुड जाणवली तर….. डोन्ट ओपन द डोअर !
फार लांब नाही कुंपणाच्या बाजुच्याच झाडीत किंवा तुमच्याच लॉन मधे एखादा साप, नाग, रॅकुन , कायोटी किंवा कोल्हा लपला असेल आणि जर तो घरात घुसलाच तर आपण पूर्णं हतबल होतो !
तो साप तर जणु इशाराच देऊन गेलाय ,
"पडोसमेही रहते है, गुदेभरका दम लगालो और बिगाडलो जो बिगाड सकते हो "
…………………………….. समाप्त …………………………….
'द एन्ड ' नंतर सिनेमा चालु रहायची ट्रेन्ड आहे ना, मग हे घ्या बोनस :
सगळे घडल्यावर मग मित्र मैत्रीणी , नातेवाईक यांना सांगितले.. त्यावर आलेले व्हॉट्सॅप मेसेजेस एक से एक एन्टरटेनिंग होते !
*शंकरजी भी न जाने कौनसे रुपमे दर्शन देते है "
*शिवजी कि कृपा समझके भुल जाओ
* सापाला मारले असते तर सर्पदोष येतो, बरं झालं न मारता पुण्याचं काम केलस !
* The Karma of the Rescue :
Saving a snake from harm or relocating it safely away from human settlements is believed to generate immense Punya (good karma). Hindus view rescuing an animal in distress as the ultimate practice of Ahimsa (non-violence)
* In Hindu culture, rescuing a snake is considered a highly virtuous act.
It signifies respect for all forms of life, alignment with the concept of cosmic harmony (Dharma), and adherence to the belief that you are protecting a divine creature that embodies eternity, wisdom, and spiritual rebirth.
……………….. द एन्ड ……………..
विशेष आभार : ‘मै’ चित्रां साठी मैत्रेयी !

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.