करू तो क्या करू ?

मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही.

तर झाल काय एकदा मी मोठ्या कानातल्या रिंगा अशाच खरेदी केल्या . त्या रिंगा बर्याच म्हणजे अगदी बर्याच मोठ्या होत्या आणि तीन चतुर्थावश्य होत्या म्हणजे पूर्ण गोलाकृती नव्हे. घेतल्या घेतल्या आणि लगेच दुसर्या दिवशी ऑफिस ला जाताना घातल्या पण . काय ती हौस ताबडतोब वापरण्याची. जाताना स्टेशन पर्यत रिक्षानीच गेले त्यामुळे काहीच घडल नाही किव्वा काहीच जाणवलं पण नाही पण स्टेशन वर मी पाऊल ठेवलं काय आणि गाडीची वाट बघत उभी राहिले काय तर सगळे जण माझ्या कडे बघताहेत अस जाणवलं. पहिल्यांदी सगळ ठीक ठाक आहे ना चेक केल. सगळ तर व्यवस्थित होत मग लोक अशी सेलिब्रिटी कडे बघाव अशी का बघत होती माझ्याकडे ? सगळ्यांच्या नजरा माझ्या कडेच होत्या. विचारच करत होते रातोरात काय बदल झाला माझ्यात . एकाच रात्रीत मी काय माधुरी दीक्षित सारखी वगैरे दिसायला लागले कि काय ? एखाद मिनिटच काय झाल असेल तेवढ्यात लांबच्या एका बाईने कानाला हात लाऊन काय? अस हातानी विचारल . मला काहीच कळल नाही. खरच नाही . कानाला कशाला हात लावतेय ? पण मग लगेच दोन मिनिटातच उलगडा झाला . एक कॉलेज कुमारनी जवळ येउन सांगितलं "म्याडम तुमच्या कानातली रिंग पडायला आलेय". त्याला काय सांगणार ती तशीच आहे म्हणून. दुसर्या साईड ने दुसरा मनुष्य कानाला हात लाऊन "म्याडम तुमच्या कानातली रिंग पडणार आहे आत्ता."अस सांगत आला . आत्ता मला उलगडा झाला मला अचानक प्राप्त झालेल्या सेलिब्रिटी पणाचा.तेवढ्यात जवळच्या बाईने पण सांगितलं " कानातल पडणार आहे तुमच्या " हे सगळं गाडी येण्याच्या मधल्या वेळात.अरे रामा. इतक का लक्ष असत लोकांच ?

मला वाटल धावत स्टेशन मास्तरच्या केबिन मध्ये जाव आणि "अनाउन्समेंट" करावी "माझ्या कानातल आहे ना ते खोट आहे आणि ते तसच "तीन चतुर्थांश" आहे. ते जरी आत्ता पडणार आहे कि काय अस वाटत असल तरी ते पडायला आलेल नाही. ते तसच आहे .तेव्हा समस्त पब्लिक ला काळजी नसावी ".पण मी तो विचार क्यान्सल केला ( हाहाहाहा )आणि कानातले काढून निमूटपणे पर्स मध्ये टाकले. तेवड्यात गाडीही आली आणि ऑफिस मध्ये पोचले . हुश्य . सही करून स्वताच्या सीट वर स्थानापन्न झाले काय आणि शेजारी बसणारीने विचारलं "अग कानातल आहे कुठे तुझ्या ? विसरलीस कि काय घालायला?" मी दिग्मूढ."
अरे " कानमे डालो तो भी मुश्किल और न डालो तो भी . जिये तो जिये कैसे ":)

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle