वय वर्ष दहा

वय वर्ष दहा पर्यंत (म्हणजे पाचवीत हो )आम्ही दोघी अगदी जीवश्च्य कंठश्च्य मैत्रिणी.दोघी हातात हात घालून शाळेत जाणार. एकमेकींचे डबे वाटून खाणार. मला लागल की तिच्या डोळ्यात पाणी तिला लागल की माझ्या डोळ्यात पाणी वगैरे. सहावीत असताना तिच्या वडिलांची बदली झाली पुण्याला. जाताना आम्ही अगदी गळ्यात गळे घालून भरपूर रडून घेतलं.आपल तिच्याविना यापुढे कस होणार म्हणून दोघींचा जीव अगदी कासावीस झाला आणि ती पुण्याला निघून गेली. मला तिच्या शिवाय करमेना तिला माझ्या शिवाय. एकदम उदास उदास वाटायला लागल.रोजची काम आवरत होतोच पण त्यात मजा येत नव्हती.पण शेवटी नाईलाज पण होता. आणि आमच्या दोघींच स्वतंत्र आपापल आयुष्य सुरु झाल. वर्ष भराभर सरत होती.आयुष्यात भरपूर स्थित्यंतर घडली.

त्यानंतर काही वर्षांनी अचानक तिची आई रस्त्यात भेटली.तिला इतका आनंद झाला इतका आनंद झाला .म्हणाली " चल आत्ता तुला तिच्या घरी घेऊन जाते. तुला बघून तिला खूप आनंद होईल ". मला अक्षरशः ओढतच घेऊन गेली. मी पण आनंदाने गेले इतकी अचानक मिळालेली संधी मला थोडीच सोडायची होती? मला पण तिला डोळे भरून पाहायचंच होतच. तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या.मी तिच्याकडे कडे गेले आणि चक्क बघतच राहिले माझी मैत्रीण बालपणीची मैत्रीण अचानक भेटत होती.एकदम गलबलून आल. डोळे भरून आले.अक्षरशः कडकडून भेटले.मग तर काय गप्पांना उधाणच. भरभरून भरभरून लहानपणच्या गप्पा मारल्या. आपण कसे बावळसारखे वागायचो ना. ती माझ्या सुंदरश्या(?)कंपास बॉक्सला जपायची आणि मी तिच्या बाहुलीला.शाळेत घेऊन जायचो दाखवायला आणि कुणा कुणाला हात लावायला द्यायचा नाही. बघा आमच्या कडे किती सुंदर बाहुली आहे. तुमच्या कडे आहे का? अस मैत्रीणीना चिडवायच असायचं.जळवायच असायचं. सगळाच वेडेपणा.काय तो बावळट पणा. खूप आठवणी काढून हसलो अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत..

खूप आनंदात घरी आले आणि विचार करायला लागले .बालपणच्या मैत्रिणीला भेटण्याचा आनंद होताच पण तरी काही तरी हूर हूर लागली होती. काही तरी वेगळ जाणवत होत. काही तरी निसटल्या सारख.अस का बर व्हाव ?. आम्ही दोघी एकमेकीना शारीरिक दृष्ट्या भेटलो तर होतो.पण मानसिक दृष्ट्या आमच्या दोघींमध्ये काही दरी होती का?
विचार करता करता जाणवल . हो नक्कीच होती. अगदी होतीच होती.आम्ही दोघी वय वर्ष दहा मध्येच अजून थिजलेल्या होतो पण वय वर्ष दहा मात्र आमच्या पासून बरच दूर निघून गेल होत Sad

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle