नाक वर करुन जगताना, पावसात बागडताना, हिरवाईने नटलेली सृष्टी पहाताना,
जो दिवस आपण उपभोगतो तो हा आपला स्वातंत्र दिवस. ह्या दिवसासाठी ज्यांनी बलिदान दिले अश्या स्त्री स्वातंत्र सेनानींच्या आठवणीसाठी हा असा एक तिरंगा. व त्यांना मानवंदना आत्ताच्या स्त्रीयांकडुन / मैत्रीणींकडुन.
केशरी, पांढरा ,हिरवा! ... आपल्या एकोणसत्तर वर्षे तरुण राष्ट्रध्वजाचे तीन रंग!
१५ ऑगस्ट, म्हणजेच आपल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी हा तिरंगा जागोजागी अभिमानाने फडकत असेल. मग मैत्रीणवरही झेंडावंदन व्हायला हवंच ना! आणि होणारच आहे, अगदी मैत्रीण स्टाईलने!