आज दिवाळीनंतर तब्बल एक आठवड्यानंतर मी याबद्दल लिहितेय. :P
या लेखात दिव्यांचे, रोषणाईचे कसलेही फोटो, वर्णन नाही. त्यामुळे हा लेख या उपक्रमात फिट होईल की नाही माहीत नाही. मात्र, या वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अंधारातून प्रकाशा कडे नेणार्या एका अनोख्या जगाशी ओळख झाली माझी. स्वतःला काही अंशी तरी समॄद्ध करणारा हा माझा अनुभव, मैत्रिणींसह शेअर करावासा वाटला, म्हणून लिहितेय इथे.
लेकीने रंगवून बनवलेलं टी लाईट होल्डर. तिने माझी एक काचेची चांगली वापरात असलेली बरणी ढापली त्यासाठी पण एन्ड प्रॉडक्ट चांगलं दिसत होतं तर जरा माझं दुःख कमी झालं
ऑफिसात दिवाळी निमित्त रांगोळी, पोस्टर आणि पॉट पेंटिंग स्पर्धा झाल्या.थिम होती फेस्टेव्हल ऑफ लाईट्स....
रांगोळी आणि पोस्टरात पहिला नंबर आला. पॉट मधे का नाही मिळालं ही एक मिस्टरीच आहे. सगळे पॉट्स माझ्या पॉट पुढे बेक्कर दिसत होते खरं तर :sigh:
पोस्टरचा फोटो मिळत नाहीये... सापडला की एडिटते..
असो....! हे बघा... शेवटून तिसऋया फोटोतली रांगोळी प्रितीने घरी काढलिये... त्यानंतर माझी अमेरिकेतली लक्ष्मी पुजा आणि घरा बाहेर लावलेले दिवे (हे दोन फोटो टाकायला हवेत असं काही नाही पण माझंच मला बळंच कौतुक म्हणुन टाकतेय् )
ऑफिसच्या गडबडीत काही रंगवणं शक्य नव्हतं, म्हणून एक फटाफट डूडल करायचा प्रयत्न केला.
हे माझं पहिलं डूडल :)
सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! अश्याच चमकत रहा