आज अशक्य थंडी आहे. पण आता इम्युनिटी वाढलीय. नाहीतर मागच्या वर्षी याच दिवसात मी अनेक शारिरिक आणि मानसिक ताणातून जात होते. जरा काही झालं की अंथरूण धरावं लागायचं. पळण्याची कपॅसिटी वाढलीय. मला न दिसताही, कसलाही मेकपचा स्ट्रेक नसताना माझी मीच पळताना स्वतःला छान दिसतेय. म्हणजे मला छान वाटतंय. पॉवरफुल. एक मार्ग , एक ठरलेला मुक्काम. आता कुठलं वळण घ्यावं हा विचार करायचा नाहीय हे किती बरंय. किती वेळ लागतोय हेही एक अॅप सांगतंय, मोजतंय तुमची पावलं, गती आणि प्रगती. माझ्या मैत्रिणी पुढंमागं आहेत. एकटं पळण्याचे फायदे तोटे आहेतच. आत्ता मिळून पळण्याचे फायदे दिसतायेत.