रोमन आणि ग्रीक इतिहासाबद्दल मला फार पूर्वीपासून अतिशय उत्सुकता वाटत आली आहे. इतिहासाची आवड आणि खास करुन या प्राचीन युरोपियन महासत्तांबद्दल उत्सुकता यामुळे ग्रीकांची लोकशाही, रोमन लोकांचे प्रजासत्ताक, ज्युलियस सिझरनंतर वाढीस लागलेली साम्राज्यवाद, रोमन साम्राज्यसत्तेचा अस्त इत्यादींबद्दल मी पूर्वी थोडेफार वाचन केले होते. गेल्या डिसेंबरच्या सुटीत कुठे जायचे हे ठरवत असताना ग्रीस ठरता ठरता राहिलं आणि एकमताने इटलीवर शिक्कामोर्तब झालं. इटलीला गेलो आणि आम्ही दोघं (आणि मुलंही) इटलीच्या प्रेमात पडलो.