संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' हा चित्रपट २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.
गावागावातून वाहणार्या नद्या वाचवायला हव्यात. या नद्यांच्या पाण्यावरच शाश्वत विकास (sustainable development) अवलंबून आहे. स्थानिक पातळीवरचे छोटे उद्योग व प्रयत्न यातूनच नदी काठ स्वयंपूर्ण होऊ शकतो व विकासाचा तोल राखला जाऊ शकतो. हा चित्रपट म्हणजे सामान्य माणसांनी स्वयंपूर्णतेसाठी, नदी वाचवण्यासाठी केलेल्या सकारात्मक आणि विधायक संघर्षाचा एक प्रवास आहे.