" .... जीव असह्य दमला आहे. पायांच्या चिंध्या झाल्या आहेत. शरीराचा कण अन कण दुखतो आहे. पाणी संपत आले आहे. पाठीवरचे ओझे सहन होत नाही...." कुठल्या तरी मधल्याच शिखरावर बसून दम खाणार्या शेरीलची शारीरिक अवस्था बरी म्ह्णावी इतकी मानसिक अवस्था वाइट आहे. अशातच एक बूट घसरून दरीत पडतो. ती प्रचंड वैतागून शिव्या देते व दुसराही बूट फेकून देते. आता पुढील ट्रेक कसा पूर्ण करायचा ही चिंता देखील तिच्या मनाला शिवत नाही. ह्या पॉईंट वर सुरू झालेला चित्रपट नक्की कुठे जाउन संपेल हे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. इथून सुरू होते एक शोधयात्रा. कसला शोध? स्वतःचा...